जेवण केल्यानंतर पोट फुगते का.? पोटात गॅस एसिडिटी चा प्रॉब्लेम आहे.! आता त्रास करून घेऊ नका, पोटाचा प्रॉब्लेम गेला म्हणून समजा.!

आरोग्य

अनेक लोकांना पोटाची समस्या वरचेवर उद्धभवत असते. जेवल्यानंतर पोट फुगणे, गॅस तयार होणे, पचन नीट न होणे , पोटात आग होणे, बद्धकोष्ठता होणे अशा अनेक समस्यांना रोज सामोरे जावे लागते. यासाठीच आज आपण एक घरगुती आणि लगेच होणार असा उपाय बघणार आहोत. २ चमचे मेथी दाणे आणि दोन चमचे ओवा आपल्याला लागणार आहेत. मेथी मध्ये व्हिटॅमिन सी, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात.

हे भारतीय मसाल्यांमध्ये समाविष्ट होऊन जेवणाची चव तर वाढवतेच पण याव्यतिरिक्त आरोग्यासाठी देखील याचे सेवन विशेष महत्वाचे ठरते. मेथीचे दाणे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. मेथीचे दाणे वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत. याचे सेवन केल्याने आपल्याला सारखी भूक लागत नाही आणि यामुळे आपण अतिरिक्त कॅलरी घेणे टाळतो.

कारण मेथीमध्ये फायबर असते ज्यामुळे आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. अशा प्रकारे मेथी वजन कमी करण्यास देखील मदत करते. तसेच पोटात वायू न होण्यासाठी सुद्धा मेथीचा फायदा होतो. मेथी दाण्यामुळे आरोग्य देखील नीट राहते. तसेच ओवा खाल्ल्याने पोट दुखणे थांबते. पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला हा ओवा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक तसेच रुचकर असतो.

हे वाचा:   चेहऱ्यावर कुठेही तीळ असूद्या.! एकदा उगळवून चेहऱ्याला लावा, तीन दिवसात होईल गायब.!

चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व लघू गुणांचा असला तरी यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. ओवा अग्नीला प्रदीप्त करतो, वात तसेच कफदोषाचे शमन करतो. पोटात वायू धरणे, उदररोग तसेच पोटात जंतू होणे यावर ओवा गुणकारी आहे. या उपायासाठी दोन चमचे ओवा आणि त्याचा दुप्पट म्हणजेच चार चमचे मेथी घ्या. आणि हे मिश्रण तव्यावर थोडे गरम करा. फक्त ते कुरकुरीत होन्याएवढेच गरम करा. आणि यात हिंग पूड टाका. एक चमचा हिंग यात मिक्स करून हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्या.

आरोग्य निरोगी ठेवून स्वस्थ्य जीवन जगण्यासाठी दररोज हिंगाचे सेवन करणे आवश्यक आहे. परंतु याचे प्रमाण मर्यादित असणे फार आवश्यक आहे. हिंग हे वेदनाशामक म्हणून पोटदुखीवर काम करते. हिंग मुळे पोटात गॅस होत नाही. पोटासाठी हिंग खूप गुणकारी असते पण याचा उपयोग प्रमाणातच करावा आणि योग्य वेळीच करावा. ही पूड एक दोन महिने साठवून ठेवू शकता. हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही सेवन करू शकता.

हे वाचा:   वजन कमी करणे पडू शकते महागात.! वजन कमी करण्याची अशी पध्दत कधीही करू नका.! वाढलेल्या वजनाला कमी करणारे नक्की वाचा.!

एक चमचा हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. या उपायाने तुम्हाला कोणताही पोटाचा त्रास असल्यास तो दूर होईल.
ज्यांना अनेक दिवसापासून बद्धकोष्ठता आहे त्यांनी हा उपाय रोज करावा. पण ज्यांना कधीतरीच गॅस किंवा पोटात जळजळ होत असेल त्यांनी हा उपाय त्याच वेळी करावा.

आपले पोट साफ आणि निरोगी राहिल्यास आपले शरीर सुद्धा सुदृढ राहते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.