खाजून खाजून त्वचा खराब करू नका.! गजकर्ण, नायटा, खरुज या एका उपायाने बरे केले आहेत.! कुठलाही खर्च नाही.!

आरोग्य

खाज आणि खरूज हे जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये अथवा पावसाळ्यामध्ये झालेले दिसून येतात कारण आपल्या अंगाला येणारा घाम, कधी कधी पावसामुळे आपले ओलेचिंब पाण्यामुळे झा अंग किंवा पावसात होणारे वायरल इन्फेक्शन या गोष्टींमुळे आपल्याला खाज येऊ शकते किंवा खरूज होण्याची देखील शक्यता असते. खाज अनेक कारणांनी सुटते. खरूज, नायटा इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह, घामोळया, ऍलर्जी किंवा वावडे व उवा ही खाज सुटण्याची प्रमुख कारणे आहेत.

वावडे हे सूर्यप्रकाश, धूळ, कपडे, औषधे, मासे, अंडी, गवत यांपैकी कशाचेही असू शकते. कोठल्याही पदार्थाचे वावडे येऊ शकते. यावर अनेक उपाय केले जाऊ शकतात पण नेमका तो उपाय आपल्या शरीरासाठी चांगला असतो का? आपल्या त्वचेला सूट करेल का? हे आपल्याला माहीत नसते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे जळजळ कमी होण्याऐवजी कधी कधी वाढू देखील शकते कारण ती आपल्या शरीराला सूट होत नाही.

म्हणूनच आज आपण असा काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपली खाज किंवा खरूज कायमची नष्ट होईल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला ग्रीन टी चा वापर करायचा आहे. ग्रीन टी ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते.

त्वचेला एक प्रकारचा थंडावा देते त्याचबरोबर याचा वापर त्वचेवर केला तर ती अँटिबायोटिक सारखी देखील काम करते त्यामुळे आपल्या शरीरावर कुठेही जखम झाली असेल किंवा कोणतीही जखम, व्रण झाले असेल तर ती लगेच भरून येण्यास मदत होते म्हणूनच आपण इथे ग्रीन टी चा वापर करणार आहोत. या टीचा वापर केल्यामुळे आपली खाज व खरूज हळूहळू बरे व्हायला लागेल शिवाय थंडावा देखील मिळेल.

हे वाचा:   ही चमत्कारी वनस्पती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.! या वनस्पतीला पृथ्वीवरील संजीवनी बुटी समजले जाते.!

आजचा साठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून आपल्याला भांडे गॅसवर ठेवायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा ग्रीन टी टाकायची आहे. ग्रीन टी टाकून झाल्यावर कमीत कमी पाच ते सात मिनिटे या मिश्रणाला व्यवस्थित रित्या उकळी येऊ द्यायची आहे. जेणेकरून ग्रीन टी चे औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये येतील. जर आपण एक ग्लास पाणी घेतले असेल तर ते निम्मे होईपर्यंत आपल्याला ते उकळवायचे आहे.

एकदा का पाणी उकळून झाले की गॅस बंद करून परत पाच मिनिटे आपल्याला हे पाणी थंड होण्यासाठी तसेच ठेवायचे आहे त्यानंतर या पाण्याला व्यवस्थित रित्या गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतल्यानंतर हे पाणी आपण तसेच बंद करून कोणत्याही भांड्यामध्ये याचा साठा करून ठेवू शकतो जेणेकरून आपण याचा उपयोग दोन ते तीन दिवसासाठी करू शकतो पण साठा करून याचा साठा केलेले भांडे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे.

जेव्हाही आपल्याला हे मिश्रण वापरायचे असेल तेव्हा एक ते दोन चमचे मिश्रण वेगळ्या पात्रामध्ये काढून त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून एका वेळेस सर्व मिश्रण खराब होऊ नये. त्यानंतर दिवसातून दोन ते तीन वेळा कापसाच्या मदतीने हे तयार केलेले मिश्रण आपल्याला आपल्या शरीरावर जिथे कुठे खाज किंवा खरूज झाली आहे त्या ठिकाणी लावायचे आहे, असे केल्यामुळे त्या त्वचेला आराम मिळेल.

त्वचेला थंडावा मिळेल व हळूहळू ती जखम म्हणजेच खाज किंवा खरूज हळूहळू बरी होऊ लागेल पण दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा या टी चा वापर करणे गरजेचे आहे. अजून आपण एका गोष्टीचा वापर करू शकतो ते म्हणजे एप्पल साइडर व्हिनेगर. हे आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये उपलब्ध असते. या व्हिनेगर चा वापर देखील आपण करू शकतो. या व्हिनेगर चा वापर करण्यासाठी दररोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा ॲपल साइडर विनेगर टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे.

हे वाचा:   मॅगी खाणारे एकदा हे पण वाचा.! खायला भारी लागणारी मॅगी शरीरात असेही काही घडवू शकते.! पुरुषांनी तर नक्की वाचा.!

जेणेकरून जर आपल्या अंगाला खाज येत असेल, चट्टे आले असतील तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होतात आणि याचा आपल्या शरीराला कोणताही वाईट परिणाम देखील होत नाही. हे देखील आपल्या त्वचेला एका मलम सारखे काम करते. असे केल्याने शरीरावर होणारी जळजळ कमी होईल व खाज खरूज असेल तर ती देखील लवकरात लवकर कमी होईल. सोबतच मेडिकल मध्ये उपलब्ध असणारी विटामिन ई कैप्सूल देखील आपण आपल्या त्वचेला लावू शकतो याचा वापर आपल्या त्वचेवर केल्यामुळे आपला खरूज आणि खाज हळूहळू पूर्णपणे नष्ट व्हायला मदत होते.

झोपण्यापूर्वी या कैप्सूलला आपल्या त्वचेवर लावून तसेच सोडून द्यायचे आहे आणि सकाळी गरम पाण्याने अंघोळ करायची आहे असे केल्यास हळूहळू म्हणजेच एका आठवड्यामध्ये आपल्या शरीरावर असलेली खाज किंवा खरूज जर घामुळे असेल तर ते देखील नष्ट व्हायला मदत होते त्यामुळे याचा वापरही आपण करू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.