हाडांची कमजोरी कधी जाणवली तर बघा.! जीवनात एकदा तरी हा उपाय करावा.! हाडे दुखी, गुडघ्याचे दुखणे होते एकदम गायब.!

आरोग्य

शरीरामध्ये वाताचे प्रमाण वाढले की हाडांचे दुखणे, गुडघेदुखी, कंबर दुखी असे आजार आपल्याला चालू होतात. आता वात वाढण्याची कारणे अनेक आहेत. आपण किती वेळा अनावश्यक ताण घेत असतो आणि त्यामुळे आपला वात वाढत असतो. अगदी सकाळी उठण्याचासुद्धा आपल्याला ताण जाणवतो मग प्रेशर देऊन मलविसर्जन करतो. हवेचे बदललेला दाब सुद्धा आपल्या शरीरातील वात वाढवायला कारणीभूत ठरतो.

त्यामुळे शरीराचे अनेकदा दुखणे वाढते आणि अशावेळी आपण आपल्या हाडांच्या दुखण्यासाठी, हाडांचे दुखणे बरे व्हावे म्हणून अनेक प्रयत्न करत असतो. जसे की महागडे औषधांचे सेवन करणे वैगरे अनेक उपाय करत असतो. पित्ताचा त्रास असला तरी देखील आपल्याला हाडांचे दुखणे कंबर दुखी हा त्रास जाणवतो. पित्त आणि एसिडीटीची मागे अनेक कारण असतात. मात्र पित्त उसळले की पोटातील जळजळ, छातीतील जळजळ, क्वचित कधी उलटी यांनी माणूस हैराण होऊन जातो.

रात्रीची जागरणे, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या आणि वेदनाशामक गोळ्यांचे सेवन ही पित्त वाढण्याची मुख्य कारणे सांगितली जातात त्यामुळे आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्याचा वापरामुळे आपल्या हाडांचे दुखणे पित्ताचे प्रमाण व वाताचे प्रमाण हा उपाय वापरल्यानंतर हळूहळू कमी होईल.

हे वाचा:   रोज पाण्यात जिरे आणि धने टाकून ते पाणी पिल्यास काय झाले? शरीरावर दिसून आला हा जबरदस्त बदल.! प्रत्येक व्यक्तीने नक्की वाचावी ही माहिती.!

आज चा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे म्हणजेच नारळाचे तेल. नारळाच्या तेलामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात त्याचा वापर आपण आपल्या हाडांवर केल्यामुळे आपली हाडे लवकरात लवकर मजबूत होण्यास मदत होते. वास्तवात खोबरेल तेलात अनेक प्रकारच्या फॅटी ऍसिडचे कॉम्बो असतात. या मुळे शरीरावर अनेक प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.

यामध्ये फॅट लॉस, हृदय निरोगी ठेवणे आणि बुद्धीला चालना मिळते. खोबरेल तेलाच्या या गुणांमुळेच त्याचा अनेक आयुर्वेदिक औषध निर्मितीमध्ये उपयोग केला जातो. अशा प्रकारचे अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले खोबरेल तेल आपल्याला इथे वापरायचे आहे. या उपायासाठी आपल्याला एक चमचा तेल एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे आहे पाण्याचे प्रमाण थोडे वाढवले तरी चालेल त्यामुळे दोन ते तीन चमचे आपण पाणी टाकू शकतो.

पाणी टाकून झाल्यावर हे मिश्रण आपल्याला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. एकदा का पाणी आणि तेल व्यवस्थित रित्या मिक्स झाले की त्यानंतर हे हे पाणी आपल्या तोंडाच्या आत कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवायचे आहे. एक काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे हे पाणी आपल्या पोटात जाऊ नये, फक्त आपल्या तोंडामध्ये ठेवायचे आहे.

हे वाचा:   कितीही भयंकर खोकला असुद्या मिनिटात बरा होईल, छातीतला साचलेला सर्व कफ सेकंदात बाहेर पडेल.!

असे दररोज एक आठवडा केल्यास हळूहळू आपल्या पित्ताचा त्रास व आपला वाताचा त्रास कमी होईल आणि त्याचबरोबर गुडघेदुखी कंबरदुखी हे आजार देखील नाहीसे होतील. सोबतच दररोज मोहरीच्या तेलाने आपल्या हातापायांवर मालिश केल्यामुळे मुख्यतः आपल्या तळव्यांवर मालिश केल्यामुळे आपल्या वाताचा व पित्ताचा त्रास कमी होईल. हे सारे उपाय आपल्याला झोपण्यापूर्वी एक तास करायचे आहे आणि नंतर झोपायचे आहे असे दररोज केले तर केवळ एका आठवड्यामध्ये आपल्या हाडांचे आजार कायमचे नाहीसे होण्यास मदत होईल.

वरील सांगितलेले उपाय हे औषधी व वापरलेले असल्यामुळे याचा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा हानिकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.