सर्वप्रथम आपल्याला ऍसिडिटी का होते? ऍसिडिटी होण्याची कारणे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. सतत जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणे, तेलकट पदार्थ खाणे, अनियमित जेवणाच्या सवयी, जेवण्याच्या अनियमित वेळा, जागरण, मानसिक ताण -तणाव, सततची काळजी व चिंता, सततची घाई, गडबड या कारणांमुळे ऍसिडिटी होऊ शकते. तसेच धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन यामुळेसुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. या अशा कित्येक कारणांमुळे आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते.
ऍसिडिटी होण्याची लक्षणे अन् करणे देखील भरपूर आहेत म्हणून आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे ऍसिडिटी होणार नाही. सर्वात पहिला उपाय आपल्याला येथे करायचा आहे तो म्हणजे दररोज जेवल्यानंतर आपल्याला बडीशेप चावून चावून खायची आहे. जर आपण दररोज बडीशेप चावून खात असू तर बडीशेप चावत असताना आपल्या तोंडामध्ये सलायवा म्हणजे लाळ निर्माण होते.
ही लाळ जेव्हा आपल्या पोटामध्ये जाते तेव्हा आपल्या ऍसिडिटी वर मात करण्यास मदत होते. त्याचबरोबर बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व ही बडीशोप आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. स्वादिष्ट चवी शिवाय बडीशेप खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. तज्ञांच्या मते, बडीशेप हे असेच एक सुपरफूड आहे, जे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होते.
दररोज जेवल्यानंतर आपल्याला बडीशेप चे सेवन करणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथे खायची आहे ते म्हणजे जिरे. जिरे जर तुम्हाला असेच खायला आवडत नसेल तर जिरे पाण्यामध्ये टाकून ते उकळून त्याचा काढा बनवून प्यायल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात.
जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. त्यामुळे जिरे आपल्या पचनसंस्थेला चांगले बनवते व आपल्याला ऍसिडिटी होत नाही. त्यानंतर दालचिनी काढा चे सेवन केल्यास आपली ऍसिडिटी चांगली होण्यास मदत होईल. जर दालचिनीचा काढा आपल्याला कडू लागत असेल किंवा तुरट लागत असेल तर त्यामध्ये थोडेसे मधे देखील आपण टाकू शकतो.
सोबतच जेवणानंतर दोन केळी खाल्ली तर आपली पचनक्रिया सुरळीत होते म्हणून केळ्याचे सेवन देखील आपल्या शरीरासाठी चांगले असते आणि ऍसिडिटी साठी उत्तम ठरते. जेवणामध्ये जास्त प्रमाणात दही, काकडी, कलिंगड या गोष्टींचे सेवन केल्यास आपल्याला ऍसिडिटी होत नाही. या सर्व गोष्टी शरीरासाठी थंड असतात त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाहीत आणि ऍसिडिटी देखील होत नाही.
ऍसिडिटी साठी आपण नारळ पाण्याचे सेवन देखील करू शकतो कारण नारळ पाण्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्याचे सेवन आपण केल्यामुळे आपले अन्न पचायला मदत होतेच त्यासोबतच आपल्याला ऍसिडिटी देखील होत नाही. पोटॅशियमने परिपूर्ण असलेल्या नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. पोटॅशियममुळे किडनी निरोगी राहायला मदत होते. नारळ पाणी शरीरातील अन्य अतिरिक्त द्रव्य वा लिक्विड बाहेर काढायला मू’त्रवर्धक म्हणून काम करत असते.
त्यामुळे मू’त’ख’डा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर ऍसिडिटी वरती देखील माफ करण्यास नारळ पाणी प्रभावशाली असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.