ना केला व्यायाम, ना डाएट.! तरी महिन्यात कमी झाले पंधरा किलो वजन.! वजन कमी करण्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला.! कोणी नाही सांगणार.!

आरोग्य

अनेक वेळा आपण वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतो. धावपळीमुळे आपले वजन कमी होण्याऐवजी वाढत जाते. आणि आपण कमी खाऊ लागतो. कमी खाता खाता आपण कमजोर पडतो आणि अशक्तपणा येऊ लागतो. अनेकवेळा वजन कमी करण्यासाठी दवाखान्यात जातो आणि त्या औषधांचा नको तो परिणाम दिसू लागतो. काहीवेळा या औषधांनी वेगळेच आजार तयार होऊ लागतात.
म्हणूनच आज आपण बघणार आहोत एक घरगुती उपाय.

अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्ही घरी करू शकता. यासाठी आपल्याला लागणार आहे सब्जा, पाणी, लिंबू आणि मध. आधी एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. पण हे पाणी खूप थंड किंवा खूप गरम असू नये. कोमट पाणी एक ग्लास घेऊन त्यात एक चमचा सबजाच्या बिया मिक्स करा. या एक चमचा बिया म्हणजे १०-१५ ग्राम बिया असल्या पाहिजेत. पाण्यात टाकल्यानंतर त्या चमच्याने ढवळत रहा. या बिया काळ्या दिसतात पण पाण्यात टाकल्यानंतर त्या सफेद रंगात दिसतील.

या बिया सगळ्यांना माहित आहेत. फालुदया मध्ये तुम्ही बघितल्याच असतील. या बिया पाण्यात टाकल्यावर थोड्या फुलल्यासारख्या दिसतील.
सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं.

हे वाचा:   फक्त एवढे एक काम करा, घरात एकही उंदीर राहणार नाही; उंदरांचा पूर्ण बंदोबस्त होईल.!

सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आता यात एक पूर्ण लिंबू पिळायचा आहे. एका लिंबाचा रस यात मिस्क करुन ते पुन्हा ढवळायचं आहे. लिंबामध्ये पेक्टीन नामक सॉल्युबल फायबर असते.

त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आहारात घेतलेल्या लिंबाच्या रसामुळे तुमची पचनसस्था सुरळीत राहते. शिवाय लिंबाच्या रसामुळे शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. सहाजिकच तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमचे शरीर सुडौल होण्यास मदत होते.
आणि एक चमचा मध यात मिक्स करून हे पाणी सकाळी प्यावे.

तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी फायदा होतो. तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी डॉक्टरदेखील तुम्हाला हा उपाय करण्याचा सल्ला देतात. इतकंच नाही तर तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्हाला तिथेदेखील हा सल्ला देण्यात येतो. आरोग्यासाठी मधाचा हा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे.  हे पाणी सकाळी नियमित प्यावे. यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि शरीर कमजोर पडणार नाही.

हे वाचा:   नॉर्मल ताप आल्यानंतर पुदिन्याचा हा उपाय कर; उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी आहे पुदिना वरदान, एकदा नक्की वाचा.!

हा उपाय फक्त एक किंवा दोन दिवस करून चालणार नाही. आपल्या शरीरातील जास्त असलेली चरबी लवकर कमी करण्यासाठी तुम्हाला एक ते तीन महिन्यांच्या कालावधीची गरज असतेच. म्हणून हा उपाय तुम्ही नियमित केला पाहिजे. याचा फायदा नक्की करून घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.