अनेक वर्षाचा गजकर्ण खाज जातच नाहीये.? वैताग आलाय का.? ही एक सोपी टेक्निक खरूज तीन दिवसात गायब करेल.!

आरोग्य

या धरतीवर शेकडो छोटे मोठे जीव आहेत. काही हत्ती सारखे अवाढव्य तर काही मुंगी सारखे इवलेसे. या सर्व जीवांमध्ये सर्वात मोठा मेंदू हा मानवाचा. प्रकृतीने मानवाला विचार करण्याची शक्ती दिली आपले विचार व्यक्त करण्याची ताकद दिली. आपल्या हुशारीच्या जोरावर मानवाने अनेक आविष्कार केले आणि स्वतःचे आयुष्य खूपच सरल बनवले आहे. एवढे असून ही प्रकृती कोणाला ही सर्व काही देत नाही व जसे नाण्याला दोन बाजू असतात तसेच मानवाने केलेल्या प्रगतीला देखील दोन बाजू आहेत.

ही प्रगती करताना त्याने मोठ्या प्रमाणात झाडे नष्ट केली. याच कारणाने प्रदुषण वाढू लागले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे वातावरणात अनेक आजार पसरू लागले आहेत. प्रत्येक घरात आजारांनी एक व्यक्ती तरी त्रस्त असतोच. आज आम्ही अश्याच एका आजाराबद्दल थोडी माहिती देणार आहोत. खाज अथवा खरुज आज काल हा एक सामान्य आजार बनला आहे. याची लागण लागण्यास वेळ लागत नाही.

हा आजार पाणी अथवा या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही देखील या आजाराने ग्रस्त असाल तर आता चिंता सोडून द्या. आम्ही आमच्या या लेखात असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो खाज-खरुज कायमची गायब करुन टाकेल. चला तर वेळ न घालवता पाहूया हा उपाय. खरुजेचे बारीक किडे असतात ते साध्या डोळयांना दिसत नाहीत ते फक्त भिंगाखालीच दिसू शकतात.

हे वाचा:   सर्व आजारांचे बाप आहे ही एक वनस्पती, मिळेल तिथून घेऊन या, कसाही मुतखडा बरा होतो.!

हे किडे कपडयांतून, संपर्कातून एकमेकांकडे जातात. हे किडे शरीरात घरे करून, अंडी घालतात. ही अंडी फुटून नवीन किडे बाहेर पडतात व नवीन घरे करतात. सुरुवातीला खरजेची घरे नाजूक त्वचेत आढळतात. हळूहळू ती शरीराच्या इतर भागातही पसरतात. काळजीपूर्वक पाहिल्यास कातडीवर घरांच्या बारीक खुणा दिसतात. ती जागा लालसर दिसते. रात्रीच्या वेळी ही खाज जास्त जाणवते.

उपचार लवकर केला नाही तर शरीरावर इतर सूक्ष्मजंतूंची वाढ होवू लागते. खरुजेचे किडे खसखस ते मोहरी इतक्या आकाराचे असतात. नर लहान तर मादी मोठी असते. शरीरावर सरासरी बारा किडे आढळतात. हे कीडे र’क्त पिवू लागल्यास आपल्या शरीरावर खाज उठू लागते. त्रिफळा चूर्ण आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा पदार्थ आहे. त्रिफळा चूर्ण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभ दायक असते.

शरीरातील थकवा शीण दूर पळवण्याचे काम हे चूर्ण करते. सोबतच तुम्हाला गॅस, अपचन तसेच पित्ताचा विकार झाल्यास पाण्यातून रोज रात्री त्रिफळा चूर्ण नक्की घ्यावे याने तुम्हाला आराम जाणवू लागेल. हेच बहूगुणी त्रिफळा चूर्ण आपल्याला हा उपाय करण्यासाठी आवश्यक आहे. दुसरा घटक जो आपल्याला समाविष्ट करायचा आहे तो म्हणजे राईचे तेल. राईचे तेल शरीराला ऊर्जा देते सोबतच हे एक उत्तम नैसर्गिक वेदना शमाक देखील आहे.

हे वाचा:   १०० आजारांवर करावा एकच इलाज, कुठलाही आजार येऊद्या यापुढे नाही टिकणार, इम्यूनिटी पावर दुप्पट होणार.!

याचे अनेक आयुर्वेदीक फायदे आहेत राईच्या तेलाच्या रोज सेवनाने तुमचे शरीर धष्टपुष्ट होते. तुरटी हा भारतीय घरात हमखास मिळणारा घटक आहे. कापल्यास अथवा भाजल्यास ज’खम त्वरित बरी करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. पाणी साफ करण्यासाठी देखील तुरटीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. आपण हा उपाय करताना या तुरटीचा समावेश देखील करायचा आहे. चला सामग्री मिळाली आता कृती कडे वळूया.

त्रिफळा चूर्ण मंद वाफेवर गरम करण्यास ठेवा चार ते पाच मिनिटां नंतर यात राईचे तेल टाका हे हळुहळू ढवळून घ्या. नंतर तुरटीची बारीक पावडर करुन या मिश्रणात टाका आणि सर्व घटक एकत्रित होई पर्यंत ढवळत रहा. या पासून जी पेस्ट तयार होईल ती रात्री झोपण्या आधी शरीरावर खाज येणार्या ठिकाणी रोज लावा तीन ते चार दिवसात तुम्हाला नक्कीच आराम मिळू लागेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.