साधे, ताजे भरलेले पाणी कुठल्याही खर्चा शिवाय मिनिरल वॉटर कसे बनवावे.? आता कोणताही रोग आजार होणार नाही.! देशी जुगाड नक्की करून बघा.!

आरोग्य

‘पाणी हेच जीवन’ हे वाक्य आपण अगदी पहिली वर्गापासूनच शिकत आलो आहोत. पाणी हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात मोठ्या प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते.

पाणी हे सजीवांच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन रूपाला बर्फ म्हणतात आणि वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्यांचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात.

पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणद्वारे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

हे वाचा:   खाज खरुज नायटा दोन तीन दिवसात गायब होत गेले.! हा चमत्कार बघून डॉक्टर सुद्धा हैराण झाले आहेत.!

वाढत्या प्रदूषणामुळे आपण जे पाणी पितो तो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असते व याने आपल्याला अनेक रोग तसेच जिवित हानि देखील होवू शकते. परंतू आपल्याकडे येणारे पाणी आता आपण घरच्या घरीच स्वच्छ करु शकतो. आज आम्ही या लेखात तुम्हाला पाणी शुद्ध करण्याचा एक साधा सोपा मात्र अत्यंत उपयुक्त असा उपाय सांगणार आहोत. आज कालच्या दूषित जगात हा उपाय कोणत्या संजीवनी प्रमाणेचे मानला जावू शकतो.

पाण्यात असणारे वाईट केमिकलयुक्त घटक व सूक्ष्म जीव समूळ नष्ट करण्यास हा उपाय तुम्हाला मदत करेल. त्याच बरोबर हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे म्हणूनच याचा तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. होय हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आमचा सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. मित्रांनो तुम्ही जे पाणी रोज ग्रहण करता ते फक्त मातीच्या घड्यात टाका व मग प्या.

होय हाच आहे आमचा उपाय रात्री तुमच्या घरात असणारे मटके चुलीवर अथवा चुल नसल्यास गॅसवर दहा ते पंधरा मिनिटे गरम करा व हे मडके थंड झाल्यास यात पाणी भरुन ठेवा. या पाण्याचे सेवन पुढिल दिवशी करा. या मातीच्या मडक्यातले पाणी अतिशय शुद्ध होईल. आपले शरीर हे माती पासून तयार झाले आहे जे पाणी आपण नदीत, विहिरीत व ओढ्यात पाहतो ते देखील मातीच्या संपर्कातीलच असते.

हे वाचा:   ही मुद्रा जो दररोज करेल त्याची पचनसंस्था होईल जबरदस्त मजबूत, कधीही होणार नाही आम्लपित्ताचा त्रास.!

मडक्यातील पाणी पिल्यास पाणी शुद्ध तर होईल मात्र त्याचे सर्व गुणधर्म व घटक तुम्हाला मिळतील. सोबतच मडक्यातील पाणी पिल्यास आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाणी फार उपयुक्त मानले जाते. ज्यांना पित्त, अपचन तसे गॅसची समस्या आहे त्यांनी देखील माठातील पाणी आवर्जून प्यावे. पोटाच्या सर्व बाधा ठीक करण्याचा रामबाण उपाय आहे हे माठातील पाणी.

होय शीतकपाटे आल्यापासून आपण माठ वापरणे बंद केले आहे. परंतू आता माठातील थंड पाणी प्या व आजारांना देखील पळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.