अंड्याबद्दलच तेे सत्य जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.! आयुष्यात अंडी खाताना या दोन गोष्टींचा विचार करूनच अंडी खा.!

आरोग्य

मित्रांनो अंडे खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे असे अनेक लोकांचे मानणे आहे मात्र काही लोक अंडे खाणे आपल्या शरीरासाठी अपाय कारक आहे. खरे काय आणि खोटे काय याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखा द्वारे देणार आहोत. अनेक लोक अंड्यांच्या सेवनाबाबत चिंतेत असतात. समाजात अंड्यात असणार्या चांगल्या व वाईट घटकांबद्दल अनेक लोक आपली अनेक वेगवेगळी मते मांडताना दिसतात.

चला तर सदर लेखात नक्की कोणत्या गोष्टी आहेत खर्या आणि कोणती आहेत फक्त तथ्य हे आपण पाहूया. अंडे हे एक पूर्ण अन्न आहे. अंड्याचे कवच, पांढरा बलक आणि पिवळा बलक असे तीन प्रमुख भाग असतात. अंड्याच्या एकूण वजनापैकी १०% वजन कवचाचे, ५८% वजन पांढर्‍या बलकाचे, ३२% वजन पिवळ्या बलकाचे असते. पांढर्‍या बलकात पाणी ८७% व प्रथिने १३% तर पिवळ्या बलकात पाणी, मेद व प्रथिने असतात.

अशी अंड्याचे अंड्या रचना. चला तर आता आपला मूळ मुद्दा म्हणजेच अंडे खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घेवूया. सर्व प्रथम पाहूया अंडे खाण्याचे फायदे. अंड्याच्या सेवनाने आपला आहार हा पोषकतत्वांनी भरतो. अंडे खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते यात अनेक प्रकारची जीवनसत्वे व खनिजे असतात जी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

हे वाचा:   इम्युनिटी मजबूत करायची आहे का? मग घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला सांगा हा काढा, बनवण्यासाठी अत्यंत सोपा कोणीही बनवू शकतो

त्याच बरोबर अंडी खाल्ल्याने वाईट कॉलेस्ट्रॉल वाढत नाही या उलट आपल्या शरिरात अर्थात चांगल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते व या चांगल्या कोलेस्टेरॉलच्या मदतीने आपले शरीर जीवनसत्व ड आपल्या शरीरात उन्हाच्या मदतीने तयार करते. अंडी मेंदूसाठी आवश्यक पोषकतत्व आणि कोलीनचा चांगला स्त्रोत आहे. होय अंड्याच्या सेवनाने मेंदूला पौष्टिक आहार मिळतो मेंदूच्या विकासाठी लागणारे प्रत्येक घटक हे अंड्यात असतात त्यामूळेच अंडे स्मरणशक्ती वाढण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

आपल्या डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देखील अंडी खाणे उपयुक्त मानले जाते. शास्त्रज्ञांच्या शोधाच्या अनुसार अंड्याच्या सेवनाने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. सोबतच अंडे एक प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. अंड्याममध्ये असणारी प्रथीने आपल्या शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. केसांसाठी तसेच वजन वाढीसाठी प्रथीने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

चला आता अंड्याच्या सेवनाने होणारे काही दुष्परिणाम आपण पाहूया. अंड्यातील पिवळे बलक हे गरम असते व खूप जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यास शरीरात गरमी वाढू लागते ओठांवर, डोक्यात अथवा हातांवर फोड्या उठणे हे सर्व प्रकार शरीरात गरमी वाढल्याने होतात. त्यामुळे अंड्यात असणारे सफेद बलक हे आपण कोणत्या ही ऋतूमध्ये खावू शकतो मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिवळे बलक जास्त खाणे शरिरास हानिकारक ठरू शकते.

हे वाचा:   पिवळे पडलेले कपडे होतील पांढरे शुभ्र.! पाच रुपयात सगळे कपडे चमकू लागतील.! हा असा सोपा उपाय प्रत्येक गृहिणीला माहिती हवा.!

सोबतच ग’रोदर महिलांनी देखील अंडे खाणे टाळावे अंडे गरम असल्यामुळे याचा पोटात असलेल्या बाळावर वाईट परिणाम होवू शकतो. मित्रांनो खूप जास्त प्रमाणात अंडी खाल्याने खूप जास्त अंडी खाल्याने लकवा, नं’पुसकता, पायात दुखणे, वजन वाढणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकता. जे व्ययाम शाळेत रोज मेहनत करतात व ज्यांच्या अंगातून सारखा घाम वाहत असतो त्यांनी अंड्याचा पिवळा बलक खाण्यास काही हरकत नाही.

तसेच ज्यांचे वजन कमी आहे ज्यांना वजन वाढवायाचे आहे त्यांनी देखील सफेद व पिवळे हे दोन्ही बलक खावे. मित्रांनो अंडे शरीरासाठी एक उत्तम आहर आहे मात्र कोणती ही चांगली गोष्टी प्रमाणाच्या बाहेर केल्यास त्याचा अपायच होतो. म्हणून अंडी देखील आहारा प्रमाणेच घेतली गेली पाहिजेत तरच त्यातील सर्व गुणधर्म व घटक तुम्हाला मिळतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.