मानवी शरीराला वेगवेगळ्या समस्या अनेकदा सत्तावत असतात, त्यामध्ये सर्दी, खोकला, सांधेदुखी, गुडघेदुखी यासारख्या अनेक समस्या दिवसेंदिवस सतावत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना एक गोष्ट माहिती नसते ती म्हणजे जर आपल्या शरीरात वात, पित्त, कफ या तिघांचे प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपल्याला कोणत्याच प्रकारचे आजार उद्भवत नाही परंतु या तिन्ही घटकांचे जर प्रमाण कमी जास्त झाले तर अनेक समस्या आपल्याला उद्भवतात.
त्याचबरोबर वात, पित्त, कफ हे त्रिदोष आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हे निर्माण झाले की अनेक आजार उद्भवत असतात. एखाद्या व्यक्तीला वाताची समस्या उद्भवण्यामागे सांधेदुखी, गुडघेदुखी हे कारणीभूत ठरतात तसेच जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी, पोट खराब होत असेल तर हे पित्त मुळे होते तसेच छातीमध्ये कफ साचणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फुफ्फुसे योग्य पद्धतीने कार्य न करणे या सगळ्या समस्या कफ मुळे निर्माण होते.
आणि म्हणूनच आपल्याला या तिन्ही दोषांवर मात मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्ही या तिन्ही दोषांवर मात केली तर तुम्हाला भविष्यात कोणतीच आजार होणार नाही म्हणूनच या तीन दोषांवर उपयोग करण्यासाठी आपण एका औषधी वनस्पतीचा उपयोग करणार आहोत. ही औषधी वनस्पती अनेकदा आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते.
परंतु या औषधी वनस्पती बद्दल फारशी कल्पना नसल्याने त्याचा वापर केला जात नाही, चला तर मग जाणून घेऊया या औषधी वनस्पती बद्दल…. आजच्या लेखामध्ये आपण ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे गिलोय. गिलोय ही एक वेल वर्णीय वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये अनेक औषधी तत्व उपलब्ध असतात. ही वनस्पती मनी प्लांट सारखी दिसायला असते.
या गिलोय वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरातील अनेक विषारी तत्व या वनस्पतीच्या सेवनाने दूर होतात. या वनस्पतीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सल्फर असे अनेक खनिज तत्व देखील उपलब्ध असतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. या वनस्पतीचे पान, फांदी व मूळ अत्यंत लाभदायक मानले गेलेले आहे.
या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटीसेप्टिक व कॅ’न्स’र विरोधी पेशी तत्व असतात आणि म्हणूनच या वनस्पतीच्या सेवनाने आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होतात. या वनस्पतीच्या सेवनाने सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, ऍसिडिटी, पोटाचे आजार हृदयाचे विकार तसेच ताप, कावीळ असे अनेक आजार लवकर बरे होतात. या वनस्पतीचे पाणी तुम्ही जर चावून चावून खाल्ले तर तुम्हाला ऍसिडिटी पित्त समस्या उद्भवणार नाही.
वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग करतात परंतु योग्य पद्धतीने उपयोग न केल्याने आपल्या शरीराला फारसा फायदा होत नाही म्हणूनच आता आपल्याला या वनस्पतीचा व्यवस्थित उपाय करून घ्यायचा आहे, यासाठी आपल्याला या वनस्पतीच्या काही काड्या लागणार आहेत. या काड्या आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला पातेल्यामध्ये टाकून उकळू द्यायचे आहे.
जोपर्यंत पाण्यामध्ये सारे मिश्रण उतरत नाहीत तोपर्यंत हे मिश्रण उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर गाळणीच्या मदतीने मिश्रण गाळून सेवन करायचं आहे. हे मिश्रण जर तुम्ही उपाशीपोटी सेवन केले तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.