आपल्यापैकी अनेकांना केसांच्या वेगवेगळ्या समस्या दिवसेंदिवस सतवत असतात. केस गळणे, केस तुटणे, केस पातळ होणे, केसांची लांबी न वाढणे, अकाली टक्कल पडणे, केस वारंवार तुटत राहणे तसेच केसा मध्ये गुंता हो, सरळ असलेले केस वाकडेतिकडे होणे अशा विविध समस्या सतावत असतात. अशावेळी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे उपाययोजना करत असतात.
खूप सारा पैसा खर्च करून देखील हवा तसा काही फरक जाणवत नाही. आपल्यापैकी अनेक जण केस सरळ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करतात. हेअर स्ट्रेटनिंग, कॅरेटिन अशा विविध ट्रीटमेंट पार्लरमध्ये सहज उपलब्ध असतात. या ट्रीटमेंट मुळे केस सरळ तर होतात परंतु केसांचे आरोग्य धोक्यामध्ये येते. खूप सारे रासायनिक पदार्थांचा वापर केल्याने केसांचे नैसर्गिक तत्व नाहीसे होते आणि भविष्यात अनेक वेगवेगळ्या समस्या सतावू लागतात.
जर तुमचे देखील केस वाकडे तिकडे झाले असतील तर चिंता करू नका. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला केस घरच्या घरी सरळ करण्याचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते सहजरीत्या घरी उपलब्ध होतात, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला भेंडी लागणार आहे. भेंडी ही बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते.
आपल्यापैकी अनेक जण भेंडीची भाजी देखील बनवतात. भेंडी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, तसेच प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण देखील अधिक असते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला भेंडी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. आता भेंडीचे केलेले बारीक बारीक तुकडे आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचे आहेत.
पातेल्यामध्ये टाकल्यानंतर एक ते दोन ग्लासभर पाणी ओतायचे आहे. पाणी उठल्यावर हे पातेले गॅसवर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे, जोपर्यंत मिश्रण व्यवस्थित उकळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला भेंडीमध्ये जेल तयार होईल तोपर्यंत हे मिश्रण चालू ठेवायचे आहे आणि तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून जे लवकर तयार होईल.
एकदा का जेल तयार झाल्याने नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट बनवल्यानंतर कॉटन कापण्याच्या मदतीने आपल्याला गाळून घ्यायचे आहे. आता आपल्याला कॉर्न स्टार्च पीठ लागणार आहे आणि यामध्ये थोडे पाणी मिक्स करायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला भेंडीचे बनवलेली पेस्ट आहे त्या पेस्टमध्ये टाकायचे आहे.
आता पुन्हा आपल्याला हे मिश्रण गॅसवर ठेवायचे आहे त्यानंतर जोपर्यंत व्यवस्थित रित्या हे मिश्रण गरम होत नाही क्रीम तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस मंद आचेवर चालू ठेवायचा आहे. ही पेस्ट गाळून घ्यायची आहे जेणेकरून या पेस्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या निर्माण होणार नाही ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला खोबरेल तेल मिक्स करायचे आहे.
खोबरेल तेलामुळे आपल्या केसांना पोषक तत्व मिळतात आणि आपले केस नैसर्गिक रित्या चमकू लागतात. आता आपल्याला केसांचे वेगवेगळे भाग करायचा आहेत आणि केसांच्या मुळापासून ते केसांना हे मिश्रण लावायचे आहे. हे मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास तसेच ठेवायचे आहे आणि केस त्यानंतर धुवायचे आहे, अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी सहज कॅरेटिन करू शकता.
हा उपाय केल्याने तुमचे केसांचा आरोग्य खराब होणार नाही उलट तुमचे केस नैसर्गिक रित्या चमकू लागणार आहेत आणि भविष्यात कधीच केस वाकड तिकडे होणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.