प्रत्येक हिंदू घरात तुळस असतेच. तुळस हे श्रद्धेचे प्रतीक आहे. तसेच तुळशीला परंपरेने आयुर्वेदात फार महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात तुळशीला पाणी घातल्याशिवाय घरातील स्त्रीचा दिवस सुरू होत नसे.
अशी ही तुळस! लागोपाठ तीन दिवस उपाशीपोटी तुळशीची तीन पाने खावीत आणि त्याचे फायदे अनुभवावे. तुळशीची पाने खाली असता अक्षरशः चमत्कार घडतात.
तुळशीची पाने खाणे हा अनेक रोगांवर रामबाण इलाज आहे. तुळशीला रामा तुळस आणि शामा तुळस म्हणतात. कारण, तुळशीचे दोन प्रकार आहेत. यात एक साधी हिरवी तुळस आणि दुसरी, कृष्ण तुळस म्हणजे जीची पाने काळपट हिरवी असतात ती तुळस होय. कृष्ण तुळस म्हणजे काळपट दिसणारी तुळस जास्त उपयोगी आहे आयुर्वेदात याच तुळशीचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो.
आपल्याला आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर आपण आपल्या रोजच्या जीवनात येणारे छोटे छोटे विकल्प टाळू शकतो. ते विकल्प टाळण्यासाठी तुळशीची पाने खाणे फायदेशीर आहे. तुळस खाल्ली असता काय काय फायदे होतात? हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तुळशीची उपाशीपोटी म्हणजे अनसळ्या पोटी रोज तीन पाने खावी.
यामुळे सर्दी, खोकला, अंगातली बारीक तापाची कणकण कमी होते. यासाठी आल्याचा छोटा तुकडा, तुळशीची पाने, थोडे धने जिरे एकत्र करावे. ते दोन कप पाण्यामध्ये उकळवावे दोन कप पाणी घेऊन त्याचे एक कप पाणी करावे. यालाच काढा असे म्हणतात. तो गाळून त्याच्यात साखर किंवा आवडीप्रमाणे गूळ घालून प्यावा. यामुळे तब्येत चांगली राहते. आजारपण दूर राहते.
जर शरीरावर कुठे खाज सुटत असेल किंवा बारीक पुरळ आले असेल. यावरही इलाज आहे तो तुळशीच्या पानांचा आहे. तुळशीच्या पानांचा रस काढून तिथे लावावा त्यामुळे खाज थांबते. पुरळ कमी होते. तसेच जर का कुठे कापले आणि रक्त येऊ लागले तिथेही तुळशीच्या पानांचा रस लावावा रक्तप्रवाह थांबतो आणि हळूहळू जखम बरी होऊ लागते शरीरावर कुठे जखम झाली असेल तिथे तुळशीची पाने कुटून त्याची पोटली करावी.
पोटली करणे म्हणजे, ती कुटलेली पाने एका सुती फडक्यात बांधावीत . मग ती पोटली जखमेवर बांधावी. यामुळे जखम दोन-तीन दिवसात बरी होते. जर का दात दुखत असतील तरीही तिथे तुळशीच्या पानांचा रस काढून दोन-तीन थेंब घालावा किंवा कापसावर तुळशीचा रस शिंपडून तो छोटा कापसाचा बोळा दातात धरावा. यामुळे दात दुखी कमी होते. याशिवाय ज्यांना डायबिटीस आहे, तसेच हृदयरोगाचा त्रास आहे.
त्यांनीही रोज तुळशीची पाने खावी. तुळशीची पाने योग्य दृष्ट्या खायची असतील तर ती रात्री पाण्यात भिजत घालावी आणि ती न चावता पाण्यासकट गिळावीत. पाण्यात भिजत घालण्यापूर्वी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. गॅस, अपचन, ऍसिडिटी, कॅन्सर याच्यासारखे रोग तुळशी खाण्याने दूर राहतात. कधीकधी तुळशीच पानाच्या अतिरिक्त सेवनामुळे दातावरचे इनामल जाऊ शकते.
यामुळेच ती वरील प्रमाणे पाण्यात भिजवून खावीत. तुळशी ही हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच ती प्रत्येक हिंदू घरात असतेच असते. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक घरात तुळस लावावी हे सांगितले आहे. याने मुख्य फायदा होतो तो कार्बन डाय-ऑक्साइडच्या ऐवजी तुळशी ऑक्सिजन सोडते. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते असे तुळशीचे अनेक फायदे आहेत. तर अशी फायदेमंद तुळस प्रत्येक घरात तयार असणे किती फायदेशीर आहे हे आज आपण इथे जाणून घेतले.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.