समोर आली आहे जगातील सर्वात चमत्कारी वनस्पती.! अनेकांचे मुतखडे केले आहे बरे.! लाख विकारांवर एकच वनस्पती पुरेशी आहे.!

आरोग्य

आपल्या भारत देशात अश्या अनेक जडी बुटी आहेत ज्यांच्या बद्दल आपल्याला काहीच माहित नसते. परंतू या वनस्पती आपल्याला होणारे अनेक मोठ-मोठे विकार बरे करण्याची शक्ती ठेवतात हो. काही वनस्पती आपल्या परिसरातच वाढत असतात मात्र आपले त्यावर ल्क्ष्य कधीच जात नाही. यातीलच एक आयुर्वेदीक व अत्यंत गुणकारी वनस्पती म्हणजे गुंज.

या औषधी वनस्पतीला भारतभर वेग वेगळ्या नावाने संबोधले जाते. गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी आहे. हिचा एक भला मोठा जमिनीलगद वेल असतो. गुंजेची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. गुंज ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे.

ही अनेक वर्षे जगते म्हणूनच बहूवर्षायू वनस्पती मानली जाते. उष्णकटीबंधात ही वेल सामान्यपणे उगवलेली आढळते. तसेच विरळ दमट जंगलांत सापडते. गुंज ही दुसऱ्या वनस्पतीच्या आधाराने साधारण पाच ते सहा मीटर पर्यंत वाढते. पाने संयुक्त व समदली असतात. फुले लहान व गुलाबी असून पावसाळ्यात येतात. वाटाण्याच्या शेंगासारख्या शेंगा येतात.

त्या तडकल्या म्हणजे त्यात चार ते सहा बिया निघतात. त्यांनाच गुंजा म्हणतात. यामध्ये लाल व सफेद अशा दोन प्रकारच्या असतात.लाल गुंजेवर काळ्या रंगाचा ठिपका असतो. तो कधी-कधी संपूर्ण गुंजेवर असतो. गुंजा थोड्या लांबट, वाटोळ्या, गुळगुळीत व चमकदार असतात. मुळे व पाने मधूर असतात परंतू बिया विषारी असतात. कच्च्या बियांच्या सेवनाने जनावरांना वि’षबाधा होऊ शकते.

हे वाचा:   मासे खाणाऱ्यांनो आता भरपूर मासे खा.! काट्याची चिंता करू नका.! हा एक तुकडा तोंडात टाकायचा तो तुकडा काटा घेऊनच परत येईल.!

आयुर्वेदानुसार वनस्पतींमधील सात उपविषांमध्ये गुंजेचा समावेश होतो. गुंजेमध्ये कटु, तिक्त, शीत, कफ, पित्त, ग्रहपीडानाशक, कृमिघ्न, व्रणनाशक, कुष्ठनाशक, वाजीकर, रेचक गुणधर्म असतात. आता याचे अनेक औषधी गुणधर्म जाणून घेवूया. अनेक औषधे तयार करताना जेष्ठमधा ऐवजी गुंजेची मुळी वापरतात. गुंज वनस्पतीची मूळे अत्यंत गुणकारी आहेत यांना सुकवून बारीक पेस्ट करुन अनेक औषधांमध्ये वापरली जाते.

सर्प दंशावर सफेद गुंजेचे मुळ व सफेद जास्वंदीचे मुळ पाण्यात उगाळून पोटातून घ्यावे व व्रणावरही लावावे. मुखपाक झाल्यावर पाने चावून खावी. हो तोंड आल्यास अथवा तोंडात फोडी गरमी आल्यास याच गुंजेच्या पानांना चावून खा नक्की फायदा होईल. खोकल्यासाठी देखील या गुंज वनस्पतीच्या पानांचा रस ग्रहण करणे खूप फायदेशीर ठरते. त्याच बरोबर मू’त्ररोगात प्रयोजक औषधां बरोबर गुंजेचे मुळ द्यावे व काहीच क्षणात तुमचा हा विकार कमी होवू लागेल.

पाला वाटून व्रण शोधावर व व्रणावर बांधल्याने थंडावा मिळून सूज कमी होऊन व्रण रोपन होते. गुंजेचा पाला हा एक नैसर्गिक वेदना शमाक आहे त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. गुंजेच्या बिया आपल्या व सजीवांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. या खाल्याने वि’षबाधा होवून उलटी, जुलाब, मळमळ, धाप लागणे, यकृताचे कार्य बिघडणे आदी लक्षणे दिसतात. सोबतच उपचार न मिळाल्यास मृ’त्यू देखील होऊ शकतो.

हे वाचा:   आयुष्यात थक्क व्हायचे असेल तर एकदा हा उपाय करा.! पायाखालची जमीनच सरकली जाईल.! फक्त करा हा उपाय काळे पडलेले दात पुन्हा चमकतील !

केसांसाठी बाह्य उपचारामध्ये गुंजेचा पाला करुन उपयोग करावा. याने तुमच्या केसांची चमक परत येईल व केस गळत असतील तर त्या जागी नवीन केस उगण्यास मदत होते. रात्री झोपताना हा पाला आपल्या केसांना लावा सकाळी कोमट पाण्याने केस धुवा आणि काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या केसांत सकारात्मक फरक नक्कीच दिसून येईल.

या सोबतच अनेक लोक मानसिक स्वास्थ मिळावे म्हणून सफेद गुंजाची माळ गळ्यात घालतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.