प्रत्येक जण चहा बनवताना ही एक चूक करतो म्हणजे करतोच.! ही चूक जर टाळता आली तर तुमचे खूप पैसे वाचतील बघा कसे.?

आरोग्य

चहा म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभा राहते. भारतामध्ये सर्वात जास्त वेळा पिले जाणारे पेय म्हणजे चहा. भारतात सर्वात जास्त चहा प्रेमी आढळतात. सकाळच्या वेळी गरम चहा असेल तर काही बातच और असते. चहाचा पहिला घोट घेतला की सर्व अंगात शहारे येत असते. चहामुळे पुढील सर्व कामे करण्यासाठी एनर्जी येत असते. तसेच कामगार लोक सायंकाळच्या वेळी आपला थकवा घालवण्यासाठी चहाचा आस्वाद घेत असतात.

भारतामध्ये सर्वात जास्त चहा पिला जातो. परंतु अनेक जण घरांमध्ये चहा चुकीच्या पद्धतीने करत असतात. होय मित्रांनो जवळपास 99 टक्के लोक चहा चुकीच्या पद्धतीने बनवत असतात. यामुळे चहाची चव तर जातेच सोबत रंग सुद्धा जात असतो. चहा प्रेमींसाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही चहा बनवण्याची योग्य अशी पद्धत सांगणार आहोत.

चहा बनविण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक पातेले ठेवावे. या पातेल्यामध्ये थोडेसे दूध टाकावे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की दूध कसे टाकायचे तर, तुम्ही दूध कच्चे देखील टाकू शकता किंवा उकळलेले दूध देखील यासाठी चालेल. त्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे पाणी स्वच्छ असायला हवे.

हे वाचा:   या दोन गोष्टी पाण्यासोबत खाल्ल्याने नसा झाल्या एकदम मोकळ्या.! सांधे दुखी, कंबर दुखी कायमची थांबली.! रक्त पातळ होण्याच्या गोळ्याच फेकून द्याव्या लागतील.!

याला चमचा च्या साह्याने थोडे एकत्र करून घ्यावे. दुधातून जोपर्यंत वाफा निघत नाही तोपर्यंत याला मंद आचेवर उकळू द्यावे. त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे चहा पावडर टाकावी. याला काही वेळा पर्यंत उकळू द्यावे. मध्ये-मध्ये याला चमचा च्या साह्याने हलवत राहावे जेणेकरून त्यातून निघणारा फेस हा बाहेर पडणार नाही.

त्यानंतर यामध्ये साधारणता अर्धा इंच अद्रकाचा तुकडा घेऊन याला चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यावे व त्यानंतर हे अद्रक चहा मध्ये टाकावे. अनेक लोक चहामध्ये अद्रक टाकताना एक चुकी करत असतात ती म्हणजे लोक अद्रक खूपच लवकर चहात टाकत असतात. त्यामुळे याचा गंध चांगल्या प्रकारे चहा मध्ये उतरत नाही.

हे तर सर्वांना माहीतच आहे की अद्रकामुळे चहा खूपच सुंदर व पिण्यासाठी देखील स्वादिष्ट लागत असतो. त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये साखर टाकायची आहे. जर तुम्ही तीन कप चहा बनवत असाल तर साखरेचे तीन चमचे त्यामध्ये टाकावे. अनेक लोक साखर सर्वात आगोदर टाकत असतात त्यामुळे चहा खूपच गोड लागत असतात.

हे वाचा:   नागीण माणसाच्या शरीरावर कशी वेढा टाकते.! नागीण झाल्यावर काय करावे आणि काय करू नये.! खूप महत्वाची माहिती आहे कोणीही सांगणार नाही.!

त्यानंतर हा चहा गाळणीच्या साह्याने गाळून घ्यावा, तुम्ही पाहाल की चहाचा रंग बदललेला दिसेल. चहाचा स्वाद देखील आणखी वाढला जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.