केसांच्या शंभर समस्या असू द्या.! हे तेल उपयोगी पडेल.! एकदा केसांना लावा केस दुपटीने वाढू लागतील.!

आरोग्य

आपल्या सर्वांना केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. आणि आपण सर्व यासाठी अनेक उपाय करत असतो. अनेक तेलांचा वापर करत असतो पण त्यामुळे आपल्या केसांवर काहीच फरक पडत नाही त्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपले केस काळेभोर व्हायला मदत होणारच आहे त्यासोबतच आपले केस वाढण्यास देखील मदत होणार आहे.

केस गळती देखील थांबणार आहे. मुख्यतः लहान मुलांचे केस वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे. आपण जे तेल बनवणार आहोत त्यामुळे लहान मुलांना अधिक फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे एक अशी वनस्पती वापरायची आहे जी खरोखरच सोन्यासारखी काम करते ती म्हणजे भृंगराज.

भृंगराज आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरते त्यामुळे जर तुमच्या परिसरामध्ये भृंगराज सापडत असेल तर तुम्ही कधीच या वनस्पतीला सोडू नका. ही आपल्यासाठी खरोखरच खूप फायदेशीर आहे. सोबतच आयुर्वेदामध्ये देखील भूंगराज या वनस्पतीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनवण्याची प्रक्रिया. सर्वप्रथम आपल्याला घरामध्ये उपलब्ध असणारी कढई घ्यायची आहे.

हे वाचा:   फक्त २१ दिवस सलग करा हा उपाय: केसांचे गळणे कायमचे बंद, केस काळे आणि लांब होतील...!

आपल्याला कोणत्याही धातूची कढई घ्यायची आहे. पण शक्य असेल तर लोखंडाची कढई घ्यायची आहे. या कढईमध्ये आपल्याला एक चमचा भूंगराज पावडर टाकायची आहे. जर आपल्याकडे वनस्पती असेल तर ती सुकवून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. त्याबरोबर यामध्ये चार ते पाच चमचे नारळाचे तेल टाका जे घरांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते. आता या मिश्रणाला मंद आचेवर शिजवू द्यायचे आहे.

जस-जसे भूंगराज पावडर तेलामध्ये शिजायला लागेल तेव्हा एक वेगळाच रंग दिसू लागेल. तेलाचा रंग हलका हिरव्या रंगाचा सारखा दिसेल. या मिश्रणाला थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत. मेथी दाणे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असतात. त्यामुळे एक चमचा मेथी दाणे वापरायचे आहेत. आणि या मिश्रणाला थोडावेळ मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे.

एक छोटीशी उकळी येईपर्यंत या मिश्रणाला व्यवस्थित रित्या शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करून हे तेल थंड होऊ द्यायचे आहे. तेल थंड झाल्यावर या तेलाला एखाद-दुसऱ्या पात्रांमध्ये गाळून घ्यायचे आहे. या तेलाचे तुम्हाला असंख्य फायदे आहेत त्याच बरोबर या तेलाचा वापर कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत या तेलाचा वापर करू शकता. या तेलाचा वापर आठवड्यामधून दोन वेळा वापर करायचा आहे.

हे वाचा:   पावसाळ्यात अशा खा भुईमुगाच्या शेंगा, चिकन, मासे, अंडी पेक्षा आहे जास्त प्रोटीन, जाणून घ्या खाण्याची योग्य ती पद्धत.!

हे तेल लावून झाल्यावर 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने डोक्यावर मसाज करायचे आहे जेणेकरून हे ते तुमच्या मुळांपर्यंत जाईल आणि केसांच्या समस्या दूर होतील. गरमीच्या दिवसांमध्ये देखील हे तेल लावल्यामुळे आपल्याला याचे कोणतेही हानिकारक परिणाम होणार नाहीत उलट यामुळे फायदाच होणार. त्याचबरोबर तुमचे केस पांढरे झाले असतील तर ते देखील काळे होण्यास मदत होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *