असा कोणताही आजार नसेल जो या समोर टिकेल.! आजपासून आयुष्य बदलून जाईल.! या वनस्पती ला जो पण घेईल त्याच्या शरीरात होईल असे काही बदल.!

आरोग्य

पाण्याच्या स्त्रोताच्या शेजारी तुम्ही अनेक लहान-मोठ्या वनस्पती पाहिल्याच असतील. परंतू यातील काही वनस्पती अत्यंत औषधी असतात व याची माहिती आपल्या पैकी खूप कमी जणांनाच माहित असते. आज आपण या लेखात अश्याच एका चमत्कारिक वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत. या वनस्पतीला सामान्य भाषेत पानफुटी असे म्हणतात. मात्र विविध ठिकाणी या वनस्पतीला वेग वेगळ्या नावाने ओळखले जाते.

याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत ते पुढे तुम्ही लेखात वाचणार आहात. पानफुटी वनस्पतीच्या पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि व्हायरल, अॅंटि फंगल असे गुणधर्म असतात. ज्यामुळे ते अनेक आजारांवर उपचारांसाठी वापरले जाते. आयुर्वेदात अनेक समस्यांवर पानफुटी वनस्पतीचा उपयोग कसा करावा याबाबत अनेक संदर्भ आढळतात. प्रत्येक आजारावर पानफुटीचा वापर निरनिराळ्या पद्धतीने केला जातो.

काही आरोग्य समस्यांमध्ये पानफुटीची पाने चावून खाण्याचा सल्ला  दिला जातो. तर जखमा बऱ्या करण्यासाठी पानफुटीचा वापर करता येतो. पानफुटी एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. पानफुटी वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की या वनस्पतींच्या पानांमुळे तुमचा किडनी स्टोन म्हणजेच मू’तखडा निघून जातो. यासाठीच पानफुटीचे पान घ्या आणि ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा.

एक चमचाभर पानफुटीच्या पानाच्या रसामध्ये एक थेंब मध मिसळा. हा रस दिवसातून दोनदा घ्यावा किडनीतला स्टोन, मू’त्राशयाचे विकार या रसाने बरे होतात. मू’तखडा विरघळून मू’त्रावाटे बाहेर पडण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. पानफुटी वनस्पतीच्या पानांमधील अर्कामुळे तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास अशा लोकांना ह्रदयरोग होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   जेवण केल्याने वजन वाढत असते का? बऱ्याच लोकांना माहिती असते चुकीची माहिती.!

यासाठी ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला पानफुटी वनस्पतीचा वापर करु शकता. पाटावरंवट्यावर अथवा मिक्सरमध्येय पानफुटीच्या पानांना वाटून घ्या. या पानांचा अर्क दररोज चार ते पाच थेंब घ्या. दिवसातून दोन वेळा तुम्ही हा रस घेऊ शकता. ज्यामुळे काहीच दिवसांमध्ये तुम्हाला रक्तदाबाची समस्या कमी झाल्याचा अनुभव मिळेल.

शरीरातील रक्त अशुद्ध असते तेव्हा शरीराला अनेक आरोग्य समस्यांचा आणि त्वचेच्या समस्यांचा धोका निर्माण होतो. आजारपणापासून दूर राहण्यासाठी आणि  शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रक्त शुद्ध असणे गरजेचे आहे. पानफुटीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील वि’षद्रव्ये बाहेर टाकली जातात. दररोज सकाळी उपाशी पोटी पानफुटीची कच्ची पाने चावून खा.

ज्यामुळे तुमच्या रक्तातील वाईट पदार्थ बाहेर पडतात व रक्त शुद्ध होते. ज्यांना सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो अशा लोकांसाठी पानफुटी वनस्पती पाने फारच उपयुक्त आहेत. कारण या पानांमुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते. पानफुटीची पाने तोडा आणि ती तुमच्या कपाळावर ठेवा. या पानांचा लेपदेखील तुम्ही तुमच्या कपाळावर लावू शकता. ज्यामुळे काही मिनीटांमध्ये तुम्हाला डोके शांत झाल्याचे वाटू लागेल.

हे वाचा:   चेहऱ्यावरील नको असलेले केस कायमचे घालवण्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून बघा, खुपच सोपा उपाय आहे, घरगुती पद्धतीने अगदी सहजपणे केला जाऊ शकतो.!

बऱ्याचदा उष्णतेमुळे अथवा इतर काही कारणांमुळे अंगावर फोड अथवा पुळ्या येतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पानफुटीच्या पानांचा वापर करू शकता. पानफुटीची पाने गरम करा आणि कोमट झाल्यावर फोड आलेल्या जागी लावा. फोड आलेल्या त्वचेवर तुम्ही पानफुटीचा अर्कदेखील लावू शकता. दोन ते तीन चार दिवस सातत्याने हा उपचार केल्यास तुमच्या अंगावरील फोड आणि पुळ्या कमी होण्यास मदत होते.

यसोबतच मधूमेहाच्या उपचारासाठी देखील पानफुटी एक उत्तम औषध आहे. पानफुटीच्या पानांचा वापर तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करू शकता. पानफुटींच्या पानांमधील अर्क मधुमेहींच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी आहे. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा मधुमेहींनी पानफुटीची पाने चावून खावी अथवा त्याचा रस प्यावा.

ज्यामुळे मधुमेहींच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहिल व बाजारातील महागडया गोळ्या औषधे रोज घेण्यापासून तुम्ही मुक्त व्हाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.