जेवल्यानंतर फक्त तोंडात टाकून द्यायचे.! असे केल्याने दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचू शकतात.! कसे ते एकदा नक्की बघा.!

आरोग्य

आपले मानवी शरीर एक यंत्र आहे. आपल्या शरीरात प्रत्येक काम करण्यासाठी एक विविध अवयव दिला गेला आहे. सतत काम करुन जसे यंत्रात बिघाड येतो तसेच काही आपल्या शरीराचे देखील आहे. आराम न करता सारखे काम केल्याने शरीरातील नैसर्गिक अवयवांची झिज होते व आपल्याला निर निराळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. आज काल उच्च रक्तदाब, आम्ल पित्त, शारीरिक दुखणी अथवा अशक्तपणा व छातीत धड धडणे या सर्व समस्या सामान्य झाल्या आहेत.

वय वर्ष पंचवीस उलटले की या सर्व शारीरिक तक्रारी शरीराला पोखरण्यास सुरवात करतात आणि आपण या सर्व आजारांसोबत जीवन जगण्याची शरीराला सवय लावून घेतो. बाजारात आता विविध प्रकारच्या आजारांना मात देण्यासाठी अनेक गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत. परंतू या गोळ्या औषधं कृत्रिम पद्धतीने तयार केली जातात आणि रोज यांचे सेवन करणे शरिरास हानिकारक ठरू शकते.

सोबतच प्रत्येक महिन्याला या गोळ्या व औषधांवर हजारो रुपये खर्च करणे आताच्या महागाईच्या दिवसातून प्रत्येकाला शक्य नसते. म्हणूनच आज आमच्या या लेखात शरीराच्या अनेक व्याधींसाठी एकच असा ‘स्वस्त पण मस्त’ घरगुती रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. याच्या वापराने तुम्हाला रोजच्या आयुष्यात असणार्या शरीराच्या बर्याचश्या तक्रारी काही दिवसातच गायब होतील.

हे वाचा:   सुक्या खोबऱ्याचे असे चमत्कारी फायदे, कधी विचारही केला नसेल या फायद्या बद्दल.!

हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे हा तुमच्या शरीरासाठी निर्धोक आहे. घरगुती उपाय असल्या कारणाने तुम्ही तुमच्या घरातील काही सामग्री वापरुन देखील हा तयार करु शकता. सामान्य माणसांच्या खिशाला परवडेल असा हा उपाय आहे त्यामुळे जास्त खर्चिक सुद्धा नाही. या उपाया बद्दल आयुर्वेदात देखील आपल्या महान वैद्यांनी लिहून ठेवले आहे. याच्या वापराने अगदी काहिच दिवसात तुमची रोगांशी लढणारी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल.

तरुणांपासून ते वृधांपर्यंत हा उपाय सर्वांसाठीच लाभदायक आहे. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन घटकांची आवश्यकता भासणार आहे. त्यातील पहिला घटक आहे धणे. धणे मसाल्यामध्ये वापरला जाणारा एक महत्वाचा घटक आहे. धणे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. धण्याच्या सेवनाने शरिरातील वाईट घटक हे शरीरातून निघून जातात. आपली पचन संस्था योग्य रित्या कार्यरीत होते.

शरीरातील वाईट पित्त देखील याच्या सेवनाने दूर होते. खोकल्यावर धणे खाणे हा एक अतिशय चांगला उपचार मानला जातो. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला अक्खे धणे घ्यायचे आहेत. धण्याच्या वरचे जे आवरण असते त्यात देखील मोठ्या प्रमाणात लोह व मग्नेशियम असते. धण्याची डाळ न घेता अक्खे धणे घ्या. धणे तुम्हाला जवळच्या कोणत्या ही किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध होतील.

हे वाचा:   कधी जळाले तर ह्या चुका चुकूनही करू नका, खूप महागात पडेल या चुका.!

या उपायासाठी आपला दुसरा घटक आहे पीठी साखर. साखरेत ग्लुकोज मोठ्या प्रमाणात असते. मात्र पीठी साखरेत हे सामान्य साखरे पेक्षा जास्त प्रमाणात असते. साखरेच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणा त्वरित दूर होतो. पीठी साखर तुम्हाला तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल. आता पीठी साखर व धणे आपल्या अंदाजाच्या अनुसार एकत्र करा.

रोज रात्री जेवणाच्या नंतर या दोन्ही घटकांना मुख शुद्धी करणाप्रमाणे खा. या दोन्ही घटकांना एकत्र करुन सेवन केल्यास सकाळी तुमचे पोट साफ होईल. शरीरात ऊर्जा प्रस्तापित होईल व छातीत धडधडणे देखील थांबेल. पित्त व खोकला देखील तुमच्या आस पास फिरकणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.