कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याआधी रात्री करायचे फक्त एवढे एक काम.! दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला अशी चमक येईल जी कोणतेच प्रोडक्ट आणू शकणार नाही.!

आरोग्य

गोंडस व आकर्षक चेहर्याचे मालक असणे हे आपल्या पैकी प्रत्येकाचेच स्वप्न असते. आपला चेहरा सुंदर व देखणा असल्यास आपल्यात एक वेगळा आत्मविश्वास भरलेला असतो. तुम्ही चार-चौघात न घाबरता आपली मते मांडू शकता. त्याच बरोबर आता सुंदरतेची दुनिया दिवानी आहे. अनेकांना निसर्गाकडून याची मोठी देणगीच मिळालेली असते. मात्र अनेकांचा चेहरा निस्तेज व काळपट झालेला असतो.

आज कालच्या युगात तर सुंदर चेहर्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. अज अनेक तरुण व तरुणी या चेहर्याच्या समस्यांनी त्रासलेले आहेत आणि या अनेक व्याधींवर एक कायमचा उपाय शोधत आहेत. आज काल बाजारात चेहर्याचे तेज परत मिळवण्याची हमी देणारी अनेक उत्पादने आली आहेत. परंतू या मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल रसायने व कृत्रिम घटक टाकले जातात. यामुळे आपला चेहरा त्याचे तेज कायमचा घालवू शकतो.

मात्र आता चिंता सोडा या लेखा द्वारे आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. हा एक उत्तम नैसर्गिक व फायदेशीर उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या चेहर्याच्या त्वचेवर काही अपाय होत नाही. आयुर्वेदात देखील महान वैद्यांनी या उपाया बद्दल लिखाण करुन ठेवले आहे. हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे घरच्या घरी बनवू शकता व खर्चिक देखील नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय.

हे वाचा:   थोड्याशा जरी पायऱ्या चढल्या आणि लगेच थकवा येत असेल तर याला साधारण समजू नका.! हात जोडून विनंती हे एक काम त्वरित करा.!

हा उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या चेहर्याला गरम पाण्याची वाफ द्या. याने तुमच्या चेहर्याची त्वचा मुलायम होईल. या नंतर कापसाच्या मदतीने चेहर्यावर गुलाब पाणी लावा. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे हळद. हळद एक उत्कृष्ट व नैसर्गिक वेदना शमाक आहे. आपल्या चेहर्यावरचे डाग व काळपटपणा दूर करण्यासाठी हळद एक चांगला घटक आहे.

अगदी सुरवाती पासूनच चेहर्यावर हळद लावली जाते. म्हणूनच 20 ग्राम हळद पावडर घ्या. दुसरा घटक जो आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबू आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते. आपल्या चेहर्याच्या आरोग्यासाठी हे उपयुक्त असते म्हणूनच 10-15 मि.ली. ताज्या लिंबाचा रस देखील घ्या. आपला पुढील घटक आहे गव्हाचे पीठ.

होय चेहर्यावरचे तेल काढून टाकण्यासाठी गव्हाचे पीठ खूप फायदेशीर मानले जाते. वर्षानुवर्ष पुरळांमुळे तयार झालेले खड्डे व काळे दाग देखील या पीठाच्या प्रभावाने कमी होवू लागतात. म्हणूनच या उपायासाठी 30 ग्राम गव्हाचे पीठ घ्या. या उपायातला चौथा घटक आहे काकडी. काकडी स्वभावाला अतिशय थंड असते. चेहर्याला थंडावा देण्यासाठी अनेक फेस वाॅशमध्ये देखील काकडी टाकली जाते.

हे वाचा:   जवळपास ३८ रोगांचा बाप आहे हा उपाय, आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही या समस्या.! फक्त करावे लागेल असे सेवन.!

आपल्या शरीरासाठी देखील काकडी उत्तम मानली जाते. याच एका ताज्या काकडीला किसणीच्या मदतीने किसून त्याचा बारीक रस तयार करुन घ्या. आता पुढे हळदीची पावडर, लिंबाचा रस, गव्हाचे पीठ, काकडीचा कीस या सर्व घटकांना एका पात्रात एकत्रीत करुन याचे छान मिश्रण तयार करुन घ्या. आता या मिश्रणात 20 ग्राम एवढ्या मात्रेत दही टाका. आता या मिश्रणाला रात्री झोपण्याच्या आधी आपल्या चेहर्याला लावून ठेवा व सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

मित्रांनो हा उपाय तुम्हाला आठवड्यातून फक्त तीन वेळा करायचा आहे. या नैसर्गिक उपायाने तुमचा चेहरा परत तेज मिळवू लागेल. चेहर्यावरचे डाग व पूरळे-पिंपल्स देखील गायब होतील आणि चेहरा चमकदार दिसू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.