डास आता एकही घरात येणार नाही.! हा कांद्याचा उपाय केल्याने डास घरातूनच पळून जाईल, एकदा नक्की करून बघा.!

आरोग्य

आता एक जरी घरात डास आढळला तर करायचे हे एक काम.! एका कांद्याला घाबरून मच्छर असे पळून जातील.! त्या कांद्याला लावायचे फक्त हे पदार्थ.!

डासांची समस्या सर्वत्र सारखीच आढळुन येते. ऊन पाऊस असो वा थंडी.. डासांचा उपद्रव काही केल्या कमी होत नाहीये? जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नका. आरोग्यविभागाकडून वरचेवर औषध फवारणी होत च असते. आपण देखील बाजारातील वेगवेगळी उत्पादन वापरत असतो. ही उत्पादन महागडी तर असतातच याशिवाय हे आपले आरोग्याचे नुकसान हानी देखील करतात.

डास चावू नये म्हणून क्रीम लावून त्वचेचे नुकसान तसेच कोईल, अगरबत्ती च्या असह्य धुरामुळं श्वसनावर परिणाम. इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या उत्पादनामुळे वाढत्या वीजबिलाने खिशाला कात्री. आता काय करावे? सायंकाळी तर निवांत एक क्षण असे बसताच येत नाही. अतिझाडी च्या ठिकाणी पावसाळ्यात तर कहरच. घरात देखील दार लावून बसावं लागत.

इतकंच नाहीतर डास अनेक आजार पसरवतात. आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत जे आपले जुने लोकं फार पूर्वी पासून करत आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया आपल्या आजीबाई च्या बटव्यातील ही एक सोपी ट्रिक. ही एक वस्तू जी पूजेत हवन मध्ये वापरली जाते. ही वस्तू कापूर नाही, धूप नाही अगरबत्ती देखील नाही. हे नेहमी डासांना असं पळवून लावते की ते परत येणारच नाहीत होतील गायब.

हे वाचा:   मिरची विकत घेताना ही काळजी घ्या.! मिरची नेमकी कोणती विकत घ्यावी लाल की हिरवी.! आरोग्याच्या दृष्टीने कोणती मिरची सर्वात बेस्ट आहे.!

जुन्याकाळी हे गोवऱ्यावर ठेवून जाळलं जाई ज्यामुळे आसपासचे व झाडी झूडूपातील देखील सर्व मच्छर पळून जायचे. तर ही वस्तू आहे लोबान. ही एक पिवळ्या रंगाच्या दगडाप्रमाणे दिसते. हा एक प्रकारचा सुगंधित डिंक असतो. याच आपण तेल बनवणार आहोत. लोबान बाजारात पूजा सामग्रीच्या दुकानात कुठेही मिळेल परंतु याचे तेल बाजारात कुठेच मिळणार नाही. हे खूप स्वस्त असते.

आता पाहूया याचा उपयोग कसा करायचा. एक कांदा साल काढून घ्या. त्याला काटा चमच्याने जागोजागी छिद्र पाडून घ्या. कांद्याचा दर्प उग्र असतो. एक सुई धागा घ्या. दोऱ्याला खाली गाठ मारून घ्या. त्यात साल काढलेला कांदा ओवून घ्या. या कांद्यावर कापसाच्या मदतीने लोबानचे तेल पूर्ण लावून घ्या. लोबान चा प्रभाव कमी होत आहे असं वाटल्यास परत असंच कापसाने हे तेल कांद्यावर लावा.

हे वाचा:   आश्चर्य घडले.! फक्त दोनच दिवसात नसांची कमजोरी गायब झाली.! ना डॉक्टर ना कोणते औषध मग झाले तरी कसे.?

कांदा आणि लोबानचे तेल करतील डास गायब. हा ओवलेला कांदा दारात टांगा. पाहूया लोबान तेल बनवण्याची पद्धत : जुना फ्राय पॅन घ्या. यात थोडं मोहरीचे तेल घाला. कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता पण मोहरीचे तेल बेस्ट असते. ते गरम करा. गॅस बंद करून पॅन खाली घेऊन हलक थंड होऊन द्या. त्यात लोबान घाला. चमच्याने हे नीट मिक्स करा. हे थंड करून बाटलीत भरून ठेवा.

इथे एक गोष्ट लक्षात घ्या. लोबान अति गरम तेलात किंवा गॅस चालू असतानाच तेलात घालू नका कारण लोबान आग पकडते. ज्वलनशील असल्याने योग्य प्रमाणातच तेल गरम करणे महत्वाचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.