काहीवेळा आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य वाढवण्याची उत्पादने वापरली तरीही आपले सौंदर्य खुलत नाही. आणि यातल्या काही उत्पादनांचा आपल्या चेहऱ्यावर तसेच शरीरावर सुद्धा वाईट परिणाम दिसून येतो. अनेक जण पार्लर मध्ये जाऊन वेगवेगळे रासायनिक उपचार करून चेहरा चांगला करण्याचा प्रयत्न करतात. पण हे कधी कधी महागात पडत.
म्हणूनच आज आपण बघूया घरीच फेशियल, फेसपॅक कसा तयार करायचा. तुम्हाला पार्लर मध्ये जायची गरज लागणार नाही. कोणताही फेसपॅक लावताना सर्वात आधी आपण चेहरा स्वछ धुऊन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावर असलेली घाण, मळ निघून जाईल. म्हणूनच पहिली पायरी म्हणजे चेहरा स्वच्छ धुणे. यालाच सिलिंझिंग म्हणतात. यासाठी आपल्याला लागणार आहे मध आणि गुलाबजल.
मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. आपल्या शरीरातील रॅडिकल्ससह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. आणि गुलाबजल आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करून थंड करत. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होतो. चेहऱ्यावरचे डाग कमी होतात. म्हणून याने चेहरा स्वच्छ धुवावा.
यानंतर मध आणि कॉफी पावडर एकत्र करून याचा स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार मालिश करा. चेहऱ्यावरील मुरुम, उन्हामुळे पडणारे डाग आणि सुरकुत्या घालविण्यासाठी कॉफी उत्तम आहे. कॉफीमुळे तुमचा चेहरासुद्धा फ्रेश होतो. कॉफी ही चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. याची पेस्ट लावल्याने चेहरा मुलायम होतो तसंच चेहऱ्याला कांती येते.
मालिश केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या नंतर तिसरी पायरी म्हणजे फेसपॅक. यासाठी आपण वापरणार आहोत पपई. पपईमध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. पपई आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई बारीक करू त्यामध्ये मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा.
किमान 30 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. हे मिश्रण लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमं बरे होतील. आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. पपईमध्ये व्हिटामिन ए, आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावताना व्यवस्थित मालिश करा. गोलाकार मालिश केल्याने पपईचे तत्व चेहऱ्यात उतरतील आणि तुम्हाला चांगले परिणाम जाणवतील.
अशाप्रकारे वरील पद्धतीने जर तुम्ही चेहऱ्याची काळजी घ्याल तर नक्कीच तुमचा चेहरा खुलून दिसेल. चेहऱ्यावरचे सगळे डाग, पुरळ दूर होतील. चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातील. मग नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.