ईतके सोपे चिकन की २० मिनिटात पुरुष पण बनवू शकतील.! तोंडाला पाणी सुटेल एकदा नक्की वाचा साध्या सोप्या चिकन ची रेसिपी.!

आरोग्य

चिकन म्हटले की काही शाकाहारी व्यक्ती वगळता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. जगभरात लाखो-करोडो लोक चिकनचे चाहते आहेत. चिकन पचण्यास जरी हलके नसले तरी ही याच्या सेवनाने शरीराला प्रथिने, कर्बोदके व फॅट्स असे घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. वजन वाढवण्यासाठी देखील चिकन खाण्याचे सल्ले व्यायाम शाळेत दिले जातात.

या सोबतच आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चिकनचे सेवन आपण आवर्जून केले पाहिजे. एकांदरीत चिकनचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आपल्या भारतीय महिलांना सुगरण म्हटले जाते. याचे कारण म्हणजे जेवण बनवण्याच्या कलेत त्यांना महारथ लाभलेले असते. आपली पुरुष मंडळी देखील आता जेवण बनवण्याच्या बाबतीत मागे नाहीत.

रुचकर व चवदार पदार्थ हे देखील आता चुटकी सरशी तयार करु लागले आहेत. मित्रांनो आज आपण आपल्या या लेखात आपल्या सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे चिकन एका वेगळ्या पद्धतीने कसे तयार केले जावू शकते या बद्दल थोडी चर्चा करणार आहोत. या लेखात आम्ही साध्या सोप्या पद्धतीने परंतू थोड हटके व चवीष्ट चिकन कसे बनवायचे त्याला लागणारी सामग्री व कृती काय हे पाहूया.

हे वाचा:   चहा तर रोजच बनवता पण असा चहा बनवून समोरच्याला वेडे करून टाका.! असा झटकेबाज चहा तुम्ही तरी कधी घेतला नसेल.!

चला आता वेळ न दवडता पाहूया कसे बनवले जाते काहीच मिनिटात चवदार चिकन. मित्रांनो सर्व प्रथम चिकन बाजारातून बारीक करुन घेऊन या. घरी आणल्या नंतर या बारीक तुकड्यांना स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा. आता आपल्या या रेसिपीतला पहिला घटक म्हणजे कांदा घ्या. दोन ते तीन कांदे कापा व यांना चांगले भाजून घ्या. नंतर या कांद्याला एका भांड्यात टाका आता यात पुढे दालचिनी, जीरे-मोहरी व काडीपत्याची काही पाने टाका.

या नंतर या कांद्यात पुढे एक ते दोन टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करुन त्याची पेस्ट घाला. टोमॅटो व कांदा जलद एकत्र होण्यासाठी यात मीठ टाका. आता पाच ते दहा मिनिटे हे मिश्रण असेच गॅसवर शिजू द्या. स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आता या भांड्यातल्या मिश्रणात टाका. परंतू त्या आधी या चिकनला लिंबाचा रस चांगला लावून घ्या. तुमच्या आवडी नुसार तुम्ही याला दही देखील लावू शकता.

याने तुमच्या चिकनला एक वेगळीच चव येईल. असे करुन तुम्हाला अर्धा तास भर हे चिकन असेच ठेवायचे आहे. आता हे कांदा व टोमॅटो असलेल्या मिश्रणात टाका. आता यात तुमच्या चवी प्रमाणे तिखट मसाला टाका. तुम्हाला रस्सा आवडत असेल तर यात पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा जर तुम्हाला तुकडे आवडत असतील सुके चिकनचे तुम्ही चाहते असाल तर यात पाणी कमी ठेवा.

हे वाचा:   हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी हे पदार्थ खा, तीन दिवसात सर्व ठीक होईल...!

सोबतच हे चिकन शिजवताना तुम्ही अक्ख्या लसणी देखील यात टाकू शकता.लसूण आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून ही आपल्या शरीराचे रक्षण करते. या लसणी देखील चांगल्या शिजतात व खाण्यास रुचकर लागतात. अर्धा तास भर आता याला गॅसवर चांगले शिजू द्या. चांगली उकळी व सुंगध दरवळू लागला की समजा तुमचे चिकन तयार झाले.

आता पुढे कोथिंबिर चांगली धुवून व बारीक कापून चिकन वर घाला. असे चवीष्ट व अगदी साध्या व सरळ पद्धतीने आपण आपल्या सर्वांचेच आवडीचे चिकन बनवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.