आता पित्त कोणालाच होणार नाही.! या दोन पदार्थामुळे अनेक लोकांची पित्ताची गोळी खाण्याची सवय बंद केलीये.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद हे खूप मोठे मानले गेले आहे. त्यामध्ये सांगितलेली एक एक गोष्ट जर आपण आपल्या आयुष्यात आमलात आणली तर आपली आरोग्य हे खूप चांगले होईल. आपल्याला कुठल्याही आजाराचा सामना करावा लागणार नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती निरोगी केव्हा समजली जाते? ज्यावेळी आपल्या शरीरातील त्रिदोषांचे संतुलन योग्य प्रकारे राखले जाते.

त्या वेळेस ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी आहे असे म्हणता येईल. जर वात, कफ व पित्त या तीन दोषांपैकी कोणताही एक दोष शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढल्यास त्या व्यक्तींना असंख्य प्रकारच्या व्याधींनी जडलेले बघायला मिळते. यातील पित्त वाढल्यामुळे शरीरात असंख्य वेदना जाणवतात. आपल्या शरीरात पित्तदोष का वाढतो? याचे कारण चुकीच्या खाण्याच्या पद्धती, चुकीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या वेळा, जंक फूड फास्ट फूड, अपूरी झोप अशा अनेक कारणांमुळे ऍसिडिटी व अपचन होते.

हे वाचा:   फक्त एका दिवसात मूळव्याध ला करा गायब, खूपच रामबाण उपाय आहे.!

त्यामुळेच पित्त ऍसिडिटी अपचन बद्धकोष्ठता गॅस होणे पोट साफ नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्या पहायला मिळतात. यावर बरेच जण अनेक औषधोपचार करतात गोळ्या घेतात तरीही फरक जाणवत नाही. पारवार छातीत जळजळणे, ऍसिडिटी होणे, करपट ढेकरा येणे सुरूच राहते. याशिवाय एका आजारावर गोळी खाल्ल्यास दुसऱ्या नवीन आजार उद्भवतात. असा त्रास वेगळाच. अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय म्हणजे एक रामबाण उपाय आहे.

पित्त प्रकृती असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे माहीत पाहिजे की, आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थाचे सेवन असणे गरजेचे आहे. चहा चे प्रमाण कमी करा किंवा बंदच करा. तूरडाळ अथवा उष्णता वाढवणारे पदार्थ आहारातून कमी करा. मोठ्या प्रमाणात पित्त झाल्यास शहाळ (नारळ)पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यानी पित्तशमन होते. काकडी कलिंगड जास्त खा. आजच्या या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते फळ म्हणजे डाळिंब.

हे वाचा:   चालू न शकणारा याच्या सेवनाने पळू लागेल.! दिवसातून एकदा घ्या.! कंबर दुखी, सांधे दुखी, गुडघेदुखी सर्व दुखणे गायब.!

हे फळ आपल्या शरीरातील रक्त वाढवते रक्त शुद्ध करते. डाळिंबामध्ये फिनोलीक्स, विटामिन सी, फायबर, विटामिन के, व्हिटॅमिन बी, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड सारखे शरीराला अत्यंत पोषक असणारे घटक यात असतात. डाळींब दाणे काढून घ्या. या दण्यांचा मिक्सरच्या मदतीने ज्यूस बनवा. हा रस गाळून घ्या. हा रस चार चमचे घ्या यात साखर एक चमचा घाला.

मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण सलग सात दिवस सकाळी घ्यायच आहे. सोबत जे पथ्य असतील ते पाळा. टीप : डाळिंबाचे साल फेकून न देता स्वच्छ धुऊन वाळवावेत. त्याची पावडर बनवून ठेवावी आणि मधामध्ये जुलाब, पोट साफ करण्यासाठी, खोकल्यासाठी वापरता येते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.