तुळशीचे एक पान शरीरात गेल्यानंतर काय करते हे माहिती आहे का.! हा चमत्कारी बदल प्रत्येकाच्या शरीरात तुळशीचे पान घडवून आणत असते म्हणून प्रत्येकाने तुळशीचे पान खायला आहे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुळस ही हिंदू धर्मामध्ये माता मानली जाते. मित्रानो काय तुम्हाला माहित आहे का संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 100 पेक्षा जास्त तुळस उपलब्ध आहेत? तुळस एक अशी वनस्पती आहे की ज्यावर आजवर दहा हजार पेक्षा जास्त संशोधन कार्य झाले आहे. त्याचं कारण आहे यामध्ये सापडणारे Avtive Ingredients आणि Phytochemicals. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, ज्यावेळेस तुळशीचे एक पान आपल्या पोटात जाते त्यावेळेस यामधील 50 पेक्षा जास्त वेगवेगळे phytochemicals आपल्या शरीरावर तेजीने प्रभाव टाकण्यास सुरुवात करतात.

याचा प्रभाव आपल्या त्वचा, केस, मेंदू, हृदय, लिव्हर आणि रोग प्रतिकारक्षमता होऊ लागतो. आयुर्वेदातील सगळ्यात प्रमुख औषधीपैकी तुळस एक होय. म्हणून याला queen of herbs म्हटले जाते. तुम्ही अनुभवलं असेल जेव्हा आपण खूप आजारी असतो त्यावेळेस सर्वप्रथम घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये तुळस सगळ्यात अग्रगण्य असते.

बहुतेक लोक तुळशीच्या काही फायद्याबद्दल आणि योग्य पद्धतीबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. आपण बऱ्याच उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटक वापरल्याच्या जाहिराती बघत असतो. परंतु सरळ सरळ याच नैसर्गिक गोष्टी आपण डायरेक्ट वापरू शकु असा विचार कोणीच करत नाही. आजकाल तुळस अशी वनस्पती आहे की ज्याचा उपयोग काढा, चहापासून ते टॉनिक, गंभीर आजारातील औषधांमध्ये प्रत्येक जागी वापरले जाते.

तुमच्या अंगणी देखील तुळशीचे झाड असल्यास किंवा तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही देखील आज पर्यंत कधी ना कधी नक्की केला असेल. परंतु आता जाणून घेऊया त्याची योग्य पद्धत. रामतुळस आणि कृष्ण तुळस प्रामुख्याने सर्वत्र सहज आढळते. तुळस आपल्या TH1 आणि TH2 सेल्स चे काम सुधारते. दोनही आपल्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्तीचे महत्वाचे सेल्स आहेत.

हे वाचा:   लसणाची एक पाकळी रात्री झोपण्यापूर्वी खा, सर्व विषारी पदार्थ झटक्यात बाहेर येईल...!

जे आपल्याला गंभीर व्हायरस सोबत लढण्याची ताकद येते. तुळस प्रत्येक प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया, damaged सेल्स नष्ट करण्यात आपली मदत करते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट अँटिव्हायरस आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे आपल्याला सर्दी खोकला ताप आणि वर्तमानातील बदलांमुळे होणारे त्रास इन्फेकशन पासून वाचवते. गेल्या दशकापासून भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण ३०% वाढले आहे.

आजकाल अचानक तंदुरुस्त दिसणार्‍या व्यक्तीला देखील कॅन्सरचे निदान होत आहे. कारण आहेत, रसायनं, हेवी मेटल्स, हानिकारक विकिरण(Radiation).. पण दिवसभरात अनेक प्रकारच्या घातक रसायनांच्या संपर्कात येतो. त्याविषयी आपल्याला माहित देखील नसते. उदाहरण, कॉपर सल्फेट..आपण ज्या भाज्या खरेदी करतो त्यामध्ये हे रसायन भरपूर प्रमाणात वापरले जाते.

घरातील फर्निचर, वीज कामांमध्ये, रिपेरिंगच्या कामांमध्ये अनेक प्रकारचे रसायन वापरले जातात. या रसायनांचा आपल्या शरीरातील सर्व अवयवांवर अतिदुष्परिणाम होतो. तुळस अशा औषधी वनस्पती पैकी एक आहे ज्यामुळे असे विषारी दुष्पपरिणामांपासून आपल्या शरीराला वाचवते. तुळस मधील Eugenol घटकामुळे आपल्या श्वसनासंबंधी सर्व रोगांवर देखील अत्यंत फायदेशीर ठरते.

रोज स्मो’किंग केल्यामुळे खराब झालेले शरीर देखील रिकव्हर होते. पचनसंस्था सुधारते. तुळशीमुळे रक्त शुद्ध होते. शरीर डिटॉक्स करायचे काम तुळस करते. त्वचा केसं यासाठी तर वरदानच आहे तुळस. एका संशोधनातील अभ्यासानुसार सलग दोन महिने तुळशीची पान सेवन केल्याने नैराश्य आणि ताणतणावामध्ये कमालीचा फायदा होतो. डोकेदुखी आणि रात्री झोप न येणे यांसारख्या आजारातदेखील तुळस वरदान आहे.

हे वाचा:   बटाटे विकत घेताय? या तीन बाबी नेहमी लक्षात असू द्या आणि मगच बटाटे खरेदी करा.!

शुगर, रक्तदाब अगदी महिलांच्या पाळीच्या तक्रारी मध्ये देखील तुळस फायदेशीर ठरते. घरी तुळशीचे झाड नसल्यास मोठ्या प्रमाणावर तुळशीचे पान आणुन वाळवून त्याची पावडर बनवून ठेवू शकता. मंजिरी, पान यांचा काढा बनवून किंवा चहा मध्ये टाकून सेवन करावे. तुळस,जिरं, मध, आलं, लवंग, दालचिनी घालून काढा बनवतात.

बाजारात तुळशीचा अर्क तयार मिळतो, साध्या कोमट पाण्यात टाकून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. परदेशामध्ये तुळशीचे कॅप्सूल जास्त प्रसिद्ध आहेत. रोज सकाळी ताजी तुळशीचे दोन पाने धुवून खा. तुम्हाला मोजता येणार नाहीत इतके फायदे होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.