बाहेरचे सतत काही ना काही जंक फूड खाल्यास तसेच रोज अरबट सरबट व तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यास व व्यायाम व वर्कआउट न केल्यास तुमचा पोटाचा घेरा वाढू लागतो. चार चौघात वावरताना तुम्हाला या समस्येमुळे अनेक आपत्ती येवू शकतात. त्याच बरोबर तुम्ही या धावत्या जगात मागे राहू लागता. प्रत्येक काम पार पाडण्यात तुम्ही खूपच मंद होवू लागता.
या साठी तुम्ही सुरवाती पासूनच एक संतुलीत आहार ग्रहण करणे खूप महत्वाचे आहे. पोटाची चरबी वाढली म्हणजे नक्कीच तुमचे वजन देखील वाढते. वाढत्या वजनासोबतच उच्च रक्तदाबाचा त्रास होवू लागतो. तुम्ही स्थूल होता आणि या मुळेच कोणते ही अवजड काम केल्यास तुम्हाला दम लागतो व थकवा जाणवू लागतो. सोबतच पोटाच्या बर्याच समस्या उद्भवू लागतात.
आता बाजारात व दूरदर्शनवर देखील सुटलेले पोट कमी करण्याचे अनेक उपाय व उत्पादने मिळतात. परंतू या सर्व गोष्टी अनैसर्गिक पद्धतीने तयार केल्या जातात. त्यामुळे या गोष्टींचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होवू शकतो. तुम्ही देखील या समस्येने त्रासलेले असाल व या तक्रारीवर एक कायम स्वरुपी समाधान शोधत असाल तर अभिनंदन हा लेख तुमच्यासाठीच आहे.
आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असा एक नैसर्गिक व रामबाण उपाय सांगणार आहोत जो फक्त सात ते आठ दिवसात पोटावर जमा झालेली नको असलेली चरबी गायब करुन टाकेल. हा एक आयुर्वेदीक व घरगुती उपाय आहे. त्यामूळे अगदी कमी खर्चाचा व शरीरासाठी निर्धोक असा हा उपाय आहे. स्वयंपाक घरातील काही सामग्री वापरुन तुम्हाला हा चमत्कारिक उपाय तयार करायचा आहे.
चला आता वेळ न दवडता पुढे पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला पहिला घटक जो आवश्यक आहे तो म्हणजे काकडी. काकडी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. काकडीच्या फळामध्ये अनेक गुणधर्म असतात जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. या काकडीला स्वच्छ धुवून मग सोलून घ्या. पुढे बारीक कापा व एका भांड्यात ठेवा.
दुसरा घटक जो आपल्या या उपायात आपल्याला लागेल तो म्हणजे लिंबू लिंबू हे एक बहूगुणी फळ आहे. लिंबात जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबू खूपच फायदेशीर असते. एका ताज्या पिवळ्या झालेल्या लिंबाचा रस काढून घ्या. तीसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे आले. आल्याला आयुर्वेदात खूप मोठे स्थान दिले गेले आहे.
आल्याच्या सेवनाने अनेक आजार बरे केले जावू शकतात. सर्दी खोकल्यापासून ते अगदी उलटी व पित्त गॅस पर्यंत अनेक आजार या आल्याने बरे होतात. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील याच्या सेवनाने वाढू लागते. त्यामुळे आले स्वच्छ धुवून बारीक करुन घ्या. आता पुढे या उपायासाठी काही कोथींबीरीची पाने घ्या. ही पाने देखील तुम्हाला पोटाच्या समस्येला नष्ट करण्यासाठी मदत करतील.
आता काकडी, लिंबाचा रस, आले व कोथींबीर यांना एका भांड्यात घ्या व छान एकत्र करा. पुढे या घटकांना मिक्सरच्या मदतीने वाटून घ्या. यापासून जो रस तयार होईल त्याला आधी गाळा व रोज सकाळी उपाशी पोटी प्या. याने तुमच्या पोटावर तयार होणारा घेरा अगदी आठवड्याभरात कमी होवू लागेल. आमचा हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या