वर्षभर साठलेला घाशातला कफ, बेडका, चिकट पदार्थ सगळं बाहेर येऊन छाती एकदम ठणठणीत मोकळी करा.! याचा फक्त एक घोट सुद्धा कमाल दाखवेल.!

आरोग्य

सध्या थंडी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर तुम्हीसुद्धा संपूर्ण थंडीमध्ये खोकला सर्दीताप येणे यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तिचा हा उपाय तुमच्यासाठीच. या उपायाची खास गोष्ट म्हणजे तुम्ही हा उपाय बनवून लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या पर्यंत सगळ्यांना देऊ शकता. स्त्रिया पुरुष कोणीही घेऊ शकते. हे बनवायला देखील सोपे आहे आणि रोजच्या याच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढणार नाही केवळ तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.

यांसोबत कमजोर शरीर देखील मजबूत होईल. जर तुम्हाला आत्ता सर्दी खोकल्याचे समस्या असेल तरीदेखील तुम्ही हा उपाय करू शकता. सर्दी ही संसर्गजन्य आजार असते. ती नेमकी कशाने होते हे १०० टक्के नेमकेपणाने सांगता येणार नाही. परंतु सर्दी होण्यास अनेक प्रकारचे व्हायरस कारणीभूत ठरू शकतात.

त्यातील बहुतेक व्हायरसपासून होणारी सर्दी ही फार घातक नसते आणि कसलीही गुंतागुंत न होता आपोआप दुरुस्त होऊन जाते. सर्दीची काही लक्षणे आणि फ्ल्यूची लक्षणे जवळपास सारखी असतात. आजकाल तर कोविड आणि त्याचे व्हेरियंट बद्दल तर आपण सर्वश्रुत आहातच. अशात असल्या रोगांचा लवकरात लवकर प्रतिबंध करणे आवश्यक ठरते.

हे वाचा:   कितीही खा प्या, पण लिव्हर साफ नक्की करा.! लिव्हर ची स्वच्छता अशी केली जाते.! नक्की वाचा.!

तुम्ही नेहमी दूध पिताच. पण त्याऐवजी अशा पद्धतीने रोज दूध पिऊन बघा. तुम्हाला नक्की फायदा होईल. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. यात एक चमचा गाईचे साजूक तूप घाला. दोन ग्लास दूध बनवण्यासाठी यामध्ये एक चमचा बेसन घाला. हे तुपावर मंद आचेवर चांगले भाजून घ्यावे. हे दूध चवीला जबरदस्त लागते. बेसन भाजून झाल्यावर यामध्ये थोडं दूध घालून चमच्याने मिश्रण ढवळत राहावे.

सगळे दूध एकदम टाकल्यास गाठी होतील. हे मिश्रण हलवत रहा, गाठी होऊ देऊ नका. राहिलेले सर्व दूध यात घालून बेसनच्या गाठी पूर्ण विरघळून घ्या. यात ¼ चमचा विलायची पावडर घाला. ¼ चमचा सुंठ पावडर घाला. 8-10 केशर काड्या घालून हे दूध चमच्याने एकजीव करा. यामध्ये गोडीसाठी धागेवाली खडीसाखर गोडीप्रमाणे घाला. छातीत कफ किंवा खोकला असल्यास यामध्ये ¼ चमचा हळद घाला.

हे वाचा:   घश्यात खव-खव आहे, सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात ? मग करुन पाहा ना हा उपाय ! फक्त एकदा हा पदार्थ खा सर्दी व खोकला त्वरित विसरुन जा !!

या सर्व गोष्टी एकत्र करून झाल्यावर कमीत कमी सात ते आठ मिनिटे चमच्याने हे मिश्रण गॅसवर ढवळत राहावे. बेसन असल्यामुळे हे नीट शिजवावे लागेल. गॅस बंद करुन ग्लासमध्ये हे गरम गरम ओतून प्यावे. सर्व प्रकारचे सर्दी-खोकला, कफ आता होईल गायब.. कोरडा खोकला वर तर हा उपाय वरदान आहे. रात्री जेवणानंतर एक ते दीड तासाने हे दूध प्यावे. त्यानंतर तासाभराने झोपावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.