मित्रांनो आपले आरोग्य हेच आपले धन बनले आहे. आजकाल यकृताचे आजार (liver diseases) लोकांमध्ये प्रचंड वाढताना दिसत आहेत. या परिस्थितीत यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी योग्य सकस आहार फार महत्वाचा आहे. यकृताची समस्या भारतामध्ये गंभीर बनली आहे. बाकी आजारांमुळे झालेल्या मृत्यूंपैकी यकृताचे आजार 10व्या स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत, वर्क फ्रॉम होम कल्चर हे रोग वेगाने पसरण्याचे मुख्य कारण बनत आहे.
घरी बसून किंवा तासन् तास काम केल्यामुळे लोकांची शारीरिक मेहनतीचे काम जवळ जवळ थांबल आहे. ज्याचा थेट परिणाम यकृतावरही होत आहे. यकृत आपल्या शरीराच्या सर्वात मोठ्या अवयवांपैकी एक असं अवयव आहे. यकृताचे कारम कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फॅट मॅनेज करणे हे असते. याव्यतिरिक्त ते शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करते.
अशा परिस्थितीत यकृताची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. विचार करा जर शारीरिक हालचाल च कमी झाली तर परिणमी लठ्ठपणा येऊन शरीरात मेदाचे प्रमाण वाढणार आणि सर्व शरीरावर त्याचा परिणाम होणार. आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम तर कराच शिवाय आहारात हिरव्या भाज्या, आंबट फळे, बीटरूट, सॅलड, लसूण यांचे प्रमाण वाढवा. बेरी, तुती ही फळं खास लाभ देतात.
तसेच चांगली पुरेशी वेळेत झोप आवश्यक आहे. तसेच, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची विशेष काळजी घ्यावी. याव्यतिरिक्त आपल्या दैनंदिन दिनक्रमात वर नमूद केलेल्या खाद्यपदार्थांचा निश्चितपणे समावेश करा. हे आपले यकृत निरोगी आणि सुरक्षित ठेवेल. याशिवाय आज आम्ही तुमच्यासोबत एक नैसर्गिक घरगुती पेय कस बनवायचं ते शेयर करणार आहोत.
ज्यामुळे विषारी घटक बाहेर पडून तुमच यकृत निरोगी तंदुरुस्त राहील. चला तर जाणून घेऊया ही रेसिपी… या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत ताजी पुदिन्याची पाने. लक्षात ठेवा, देठ नाही फक्त पान पान निवडून घ्या. एक लिटर पाणी एका भांड्यात घेऊन गरम करायला ठेवा. त्याला उकळी आल्यावर त्यात पुदिना पान घाला. हे पंधरा मिनिटे मंद आचेवर चांगले उकळू द्या.
चमच्याने मधन अधन हलवत रहा. पाण्याचा रंग बदललेला दिसेल. गॅस बंद करून दोन मिनिटे गार होऊ द्यावे. यानंतर गाळणीने हे पेय गाळून घ्यावे. यामध्ये एक लिंबू ची साल बारीक किसून घालावी. साधारण एक चमचा साल असावी. यानंतर एक चमचा लिंबू रस यात घाला. पुढे एक चमचा शुद्ध नैसर्गिक मध घाला.
अर्धा कप संत्र ज्यूस घाला. मिश्रण नीट एकजीव करा. आपले पेय तयार. हे पेय रोज सकाळी काही ही न खाता पिता प्यावे. त्यानंतर एक तास काहीही खाऊ पिऊ नये. हे पेय आपले लिव्हर (यकृत ) स्वच्छ करायला मदत करते. संपूर्ण विषारी घटक बाहेर टाकले जातात तेही कायमचे …!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.