काहीही खाल्ले, कितीही खाल्ले, तरी पण वजन वाढतच नाहीये.! फक्त चार दिवसात फरक बघायचा असेल तर एकदा ही काजूची टेक्निक करून बघा.!

आरोग्य

आपण समाजात राहतो वावरतो आणि समाजाप्रमाणे राहणीमान हे आपल्याला ठेवावेच लागते. प्रत्येकाला सुंदर शरीर हवे हवेसे वाटते. वजन संतुलित असल्यास आपले आरोग्य देखील चांगले राहते. आज काल आपण आपल्या आसपास अनेकांचे वजन खूप कमी असल्याचे पाहतो. वजन कमी असल्या कारणाने तुमची तब्येत देखील कमकुवत व अतिशय बारीक दिसू लागते.

चार-चौघात गेल्यास आपण इतरांपेक्षा अतिशय सामान्य दिसतो व यामुळे आपला आत्मविश्वास चांगलाच ढासाळतो. तब्येत बारीक असल्याने तुम्ही जास्त अवजड काम करु शकत नाहीत. थोडेसे देखील मेहनतीचे काम केल्यास तुम्हाला दम लागू लागतो. तुम्ही अशक्त दिसू लागता. मित्रांनो तुम्ही देखील या अश्या समस्येने ग्रस्त असाल तर आता निर्धास्त होवून जा. आज आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी अशी माहिती घेवून आलो आहोत.

ज्याने तुमचे जीवन बदलू शकते. तुमची दुबळी व बरीक काया बळकट व मजबूत होईल. वजन झपाट्याने वाढू लागेल. आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो तुम्ही कुठेच ऐकला अथवा वाचला नसेल. हा उपाय संपूर्ण नैसर्गिक व निर्धोक आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची ही काही गरज नाही आहे. म्हणून हा रामबाण उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्कीच वाचा.

सर्व प्रथम जाणून घेवूया वजन न वाढण्याची कारणे नक्की काय आहेत. मित्रांनो संपूर्ण आहार न ग्रहण करणे हे वजन कमी असणे याचे मूळ कारण आहे. तुमच्या रोजच्या अहारात सर्व घटक, जीवनसत्वे, कर्बोदके आणि खनिजे जर असतील तर तुमचे आरोग्य तर नीट राहीलच मात्र वजन व तब्येत देखील उत्तम राहिल. सोबतच जर तुमचे पाचन तंत्र जर मजबूत नसेल अथवा तुम्ही खाल्लेल अन्न व्यवस्थित जर पचन होत नसेल तरी ही तुमच्या शरीराला योग्य ते पोषण मिळणार नाही.

हे वाचा:   आज पासून चपाती ला म्हणा बाय-बाय, वजन कमी करण्यासाठी करा या धान्याच्या भाकरीचे सेवन.!

म्हणूनच पाचन तंत्र निरोगी असणे आवश्यक आहे. पाचन तंत्र उत्तम बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पाले भाज्या व कंदमुळे घेवू शकता. काजू या फाळ आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. काजू मध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके, कॉपर, आयरन तसेच विविध प्रकारचे पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणूनच आपण आज आपला हा उपाय करण्यासाठी काजूच्या काही गरांचा वापर करणार आहोत.

सर्व प्रथम सात ते आठ काजूचे गर एक ग्लासात आपणास रात्र भर भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. या काजू गरांच्या ग्लासावर झाकण ठेवणे विसरु नका. सकाळी पाणी वेगळे करुन भिजलेले काजू एका भांड्यात काढून घ्या. या नंतर हे काजूगर मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. वाटण तयार झाल्यावर या पेस्ट मध्ये अर्धा ग्लास दूध घाला. दूध देखील आपले वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असते.

दूधात कॅल्शियम व फोस्फेट मुबलक प्रमाणात असते जे शरीरात चरबी वाढवते व हाडे देखील मजबूत करते. या दोन्ही पदार्थांना एका ग्लास मध्ये छान एकत्रित करुन घ्या. या नंतर या मिश्रणाला गोडवा मिळावा म्हणून यात तुम्ही अर्धा चमच मध देखील टाकू शकता. नैसर्गिक मधात अनेक पोषक घटक आहेत. जो तुमचा कफ तसेच पित्ताचा त्रास त्वरित कमी करतात. म्हणून तुम्ही मधाचा देखील वापर करा.

हे वाचा:   आला आहे नवीन घरगुती 100% असरदार उपाय.! जो तुमच्या टकलावर सुद्धा उगवेल केस.! आयुष्यात खूपच टक्कल पडत चालले असेल तर पटकन करावे हे एक काम.!

आता या मिश्रणाला तुम्ही सकाळी काही न खाता घ्यायचे आहे. तुम्ही चहा अथवा कॉफी पीत असाल तर त्या जागी तुम्हाला आता हा आज आम्ही सांगितलेला उपाय घ्यायचा आहे. हे पेय तुम्ही नियमित महिनाभार घ्यायचे आहे. याच्या सेवनाने तुमचे वजन नक्कीच वाढू लागेल. तुमच्या तब्येतीत तुम्हाला चांगला फरक जाणवू लागेल व शरीरावरची त्वचा देखील मुलायम होईल.

बाजरात मिळणारे रसायनयुक्त भेसळ मिळणारे पदार्थ खाण्या पेक्षा हा नैसर्गिक व साधा सोपा उपाय एकदा नक्की करुन पाहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.