रोगराईने भरलेल्या शरीराला अशा प्रकारे साफ केले जाते.! शरीराची साफ सफाई आहे खूप गरजेची.! दवाखाना आणि गोळ्या औषधांपासून दूर राहायचे असेल तर हे काम कराच.!

आरोग्य

जर तुमचे शरीर आतून स्वच्छ होत नसेल तर तुम्ही कितीही पोषक पदार्थ सेवन केले तर त्याचा प्रभावी परिणाम आपल्या शरीरावर होत नाही परंतु जर तुमचे शरीर स्वच्छ होत असेल तर त्याचा सर्व परिणाम तुमच्या पचन संस्थेवर होत असतो. तुमची पचन संस्था पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात कार्य करू लागते. आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपल्या शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपली पचन संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

ज्या व्यक्तीची पचन संस्था चांगली असते खाल्लेले आल्याबद्दल अन्नपदार्थ लवकर पचतात त्या व्यक्तींना भविष्यात कोणतेच आजार होत नाही त्याचबरोबर अन्नपचन लवकर झाल्याने शरीरामध्ये ऊर्जा देखील निर्माण होते आणि म्हणूनच संपूर्ण दिवस आपला चांगला देखील जातो परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाही.

म्हणूनच अनेकदा पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, मूळव्याध, त्वचेचे विकार, डोकेदुखी, गॅस, ऍसिडिटी असे अनेक गंभीर आजार लोकांना होत असतात आणि त्या लोकांना नेहमी थकल्यासारखे वाटते. कोणतेही काम करण्यामध्ये इच्छा राहत नाही. कितीही खाल्ले तरी शरीराला लागत नाही असा अनेक समस्या असतात आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या पोटाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या शरीरामध्ये कोणतेही विषारी घटक जमा झाले असेल तर ते घटक दूर करण्यासाठी आवश्यक असणारे वेगवेगळे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे एका दिवसात तुमचे शरीर पूर्णपणे स्वच्छ होणार आहेत. शरीराला आतून व बाहेरून मजबूत करण्याचा हा उपाय अत्यंत लाभदायक ठरणार आहे, चला तर मग जाणून घेऊया आज आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याबद्दल…!

ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये विषारी घटक जमा झालेले असते, त्या व्यक्तींना भविष्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते त्याच प्रकारे कावीळ, त्वचा विकार, पित्त, ऍसिडिटी असा विविध समस्यांमुळे व्यक्तीचे जीवन नरकमय होऊन जाते म्हणूनच या सगळ्या समस्या जर आपल्याला मुळापासून दूर करायच्या असतील तर आज आपण एक उपाय करणार आहोत. हा उपाय आपल्याला सकाळी उठल्यावर करायचा आहे.

हे वाचा:   खाज, खरूज साठी इतर गोष्टी करणे बंद करा.! आजच करा हा साधा सोपा उपाय.! खाज खरुज पासून मुक्ती मिळवा.!

आपल्याला सकाळी उठल्यावर एक ग्लासभर कोमट पाणी सेवन करायचे आहे आणि त्यामध्ये लिंबू सरबत मिक्स करायचे आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, लिंबू मध्ये आपल्या शरीरातील भयंकर आजार दूर करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळी उठल्यावर लिंबू सरबत सेवन करायचे आहे. वीस ते पंचवीस मिनिटं व जितका वेळ शक्य होईल तितका वेळ उन्हामध्ये बसायचं आहे यामुळे तुमच्या शरीराला कोवळे ऊन मिळेल आणि तुमच्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा कमी झालेली आहे ती भरून निघेल.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपल्या हाडाचे आरोग्य मजबूत राखण्यासाठी नैसर्गिक रित्या मिळवलेले ऊन अत्यंत लाभदायक ठरते. असे केल्यानंतर तुम्ही आपल्या सेवेचे आरोग्य व तोंडाचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल एक एक चमचा मिक्स करून आपल्याला तोंडामध्ये फिरवायचे आहे म्हणजेच गिळायचे नाही असे केल्याने तुमच्या जिभेवर कोणताही प्रकारचे विषाणू, जिवाणू असतील तर ते नष्ट होऊन जाईल.

तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपले जीभेचे आरोग्य जर सुंदर असेल तर निरोगी असेल तर आपल्याला किडनी, हृदय, मणक्याचे आजार अजिबात होत नाही कारण की जिभेचा थेट संबंध शरीरातील अनेक अवयवांवर येत असतो. तोंडामध्ये या दोघे तेलाचे मिश्रण मिक्स केल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला गुळण्या करायचे आहे, असे केल्याने तुमच्या तोंडामध्ये असणारे सर्व विषाणू लवकर दुर होतील त्यानंतर आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की, आपल्या आहारावर आपले नियंत्रण असायला हवे.

हे वाचा:   पायाला खूप सूज येते का.? यामागे काय कारण आहे तेच समजेना.? खूपच थकवा आल्यासारखे वाटत आहे का.? अशा वेळी साखरेत टाकायचा हा एक पदार्थ.!

रात्रीचे जेवण आपल्याला लवकर करायचे आहे आणि सकाळी उठल्यावर असे ते उशिरा करायचे आहे बहुतेक वेळा आपण रात्री उशिरा जेवतो आणि यामुळे आपले अन्नपचन व्यवस्थित होत नाही. व्यवस्थित अन्न पचन न झाल्यामुळे सकाळी आपल्याला आंबट, ढेकर, पित्त, ऍसिडिटी गॅस अशा अनेक समस्या सतावत असतात म्हणून रात्रीचे जेवण शक्यतो लवकर सेवन करायला हवे. जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपले खाल्लेले अन्न व्यवस्थित पचायला हवे तर त्यासाठी रात्री जेवण झाल्यावर आपल्याला एक अदरकचा तुकडा आणि गूळ सेवन करायचे आहे.

असे केल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतील तर ते दूर होऊन जातील त्याचबरोबर आपण जे काही अन्नपदार्थ सेवन केलेले आहेत त्यांच्या पचन क्रियेमध्ये देखील हातभार लागेल आणि म्हणूनच शरीराला ऊर्जा लवकर मिळेल. आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्यामुळे सकाळी लवकर ऊर्जा निर्माण होईल आणि दिवसभर तुमचा उत्साह देखील टिकून राहील, अशा प्रकारे आपण काही छोटे-मोठे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवू लागेल त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने दिवसभरातून काही वेळ चालायला हवे.

जर तुमच्या शरीरातून घाम निघत नसेल तर अशावेळी देखील तुम्हाला खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये घाम निर्माण होणे म्हणजेच विषारी घटक बाहेर पडणे याचे संकेत असते आणि म्हणूनच प्रत्येकाने दिवसभरातून थोडा वेळ का होईना चालायला हवे यामुळे तुमची ऊर्जा देखील वाढणार आहे. तुमच्या शरीराचा व्यायाम देखील होणार आहे आणि तुमचे मन नेहमी निरोगी राहील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.