हिवाळा ऋतू हा सर्वांच्याच पसंतीचा ऋतू आहे. थंड वातवरण गुलाबी थंडी व चोहीकडे छान पडलेले धुके. सृष्टी जणू झगमगून जाते. परंतू त्याच बरोबर हा ऋतू आला की अनेक आजार वर मान काढू लागतात. या ऋतू मध्ये आपल्या शरीराचे अवयव आतून कमकुवत होतात. हृदय हा मानवाचा महत्वाचा अवयव आहे. हृदय अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो.
स्नायूंनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते. इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदय संबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया हृदय शब्दाशी आहे. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय हृदयस्नायूनी बनलेले असते. हृदय स्नायू अनैच्छिक असून त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म दर्शकाखाली पट्टे दिसतात. हृदय प्रामुख्याने हृदय हे स्नायूंनी आणि थोड्या संयोजी उतीनी बनलेले असते.
सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. आपल्या या हृदयाला खूप जपाव लागतं. याला सुद्धा आपल्या आज कालच्या आपल्या बाहेरील अरबट सरबट व तेलकट तिखट चुकीच्या खाण्याचा त्रास होतो व आजार देखील होते. हिवाळ्यात आपल्या हृदयाची काळजी जास्त घ्यायला हवी.
या दिवसांमध्ये रक्त भिसरण नीट होत नाही. परिसारातील थंड तापमानामुळे रक्त गोठले जाते. अचानक जर तुम्ही सकाळी आपल्या शरीरावर दाब दिलात अथवा जास्त हालचाल केलीत व उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला असेल तर या थंड दिवसांमध्ये तुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. जास्त स्निग्ध पदार्थ हिवाळ्यात खाल्ले जातात जाने शरिरात गरमी प्रस्थापीत होईल व शरीर आपला आतला कार्यभाग सुरळीत पार पडेल.
आज या लेखात आपण हृदय विकाराचा झटका येण्याच्या आधी शरीर कोणते संकेत देते व या वेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे या बद्दल थोडी माहिती घेणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून लेख शेवट पर्यंत वाचा. मित्रांनो आपल्याला शरीरात हृदय विकाराचा झटका येण्या आधी पुढील इशारे देते. पुरुषांमध्ये सामान्यतः छाती दाटून येवू लागते आणि अस्वस्थ वाटू लागते.
महिलांमध्ये धाप लागते व छातीत दुखू लागते. याच बरोबर मानेच्या मागच भाग जोरात दुखू लागतो. मानेच्या मागची जी नस आहे जी आपला मेंदू व शरीर यांचा केंद्र बिंदू आहे व या दोन्ही भागांना जोडण्याचे काम करते त्यात वेदना होवू लागतात. अश्या तीव्र वेदना झाल्यास समजून जा तुमचे हृदय बेचैन आहे व त्याला त्रास होत आहे. त्याच बरोबर छातीत दुखणे जे जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटापर्यंत वाढत जाते.
हे संकेत देखील हृदय विकाराचा झटका येण्या पूर्वीची लक्षणे आहेत. ही लक्षणे सहा महिन्याच्या आधीच दिसयला सुरुवात होवू लागते. तसेच बधिरता ,हात आणि पायात अशक्तपणा येणे हे देखील हृदयाची प्रकृती ठीक नसल्याचे दर्शवते. अचानक हृदयाची स्पंदन वाढू लागतात, छातीत धडधडू लागते व चक्कर येते, टचकार्डिया म्हणजेच हृदयाचा वेग वाढू लागतो व ब्रॅडिकार्डिया म्हणजे हृदयाचा वेग कमी होतो व श्वास घ्यायला त्रास होतो.
या सर्व लक्षणांना तुम्ही तुमच्या शरीरात नोटिस करत असाल तर हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष्य देण्याची तुम्हाला फार गरज आहे. हे संकेत शरीरात जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी जावून भेट घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.