हिवाळ्यातील सर्दी खोकला, यापासून मिळेल कायमची सुट्टी.! थोडी जरी सर्दी किंवा खोकला झाला तर झटपट करायचे हे एक काम.!

आरोग्य

आपल्या भारत देशाला तीन ऋतू लाभले आहेत. ते म्हणजे उन्हाळा पावसाळा व हिवाळा. हिवाळा आपल्या पैकी अनेकांचा आवडीचा ऋतू आहे. गुलाबी थंडी व सोबतच परिसरातील वातवरण देखील साजरे तयार होते. मात्र हा ऋतू आपल्या सोबत अनेक आजार देखील घेऊन येतो. हिवाळ्यात आपल्या आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते व अनेक आजारांना आपण बळी पडू लागतो.

आपण खाल्लेले अन्न देखील योग्य प्रमाणात व योग्य वेळी पचन होत नाही. आता हिवाळा सुरु झाला आहे आणि सोबतच अनेकांना सर्दी, खोकला व ताप अचानक व वारंवार भरु लागतो. सोबतच अंग दुखी व जुनाट आधी लागलेले शारिरीक मार या थंडीच्या दिवसात दुखू लागतात. अश्या वेळी सारखे इस्पितळात धाव घेणे बरे नाही आणि या साठी आता वेळ देखील आपल्याकडे नसतो.

जर तुम्ही या समस्यांवर चांगला नैसर्गिक व रामबाण उपाय शोधत आहात तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला असा एक चमत्कारिक व गुणकारी उपाय सांगणार आहोत ज्याच्या एका वापराने तुम्ही हिवाळ्यात कधीच आजारी पडणार नाहीत. फक्त एकदा हा उपाय आचरणात आणलात की शरीराची रोग प्रतिकार शक्ती चांगलीच वाढेल.

सर्दी ताप व खोकल्यासारखे आजार तुमच्या व परिवाराच्या आस पास भटकणार सुद्धा नाहीत. हा उपाय एक आयुर्वेदीक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम होत नाही. सोबतच हा एक घरगुती उपाय असल्याने तुम्ही हा कमी पैशात घरच्या घरीच तयार करु शकता. म्हणूनच हा सामान्य लोकांच्या देखील खिशाला परवडेल. चला आता वेळ न दवडता सदर लेखात पुढे या उपायाला लागणारी सामग्री व याला बनवण्याची कृती जाणून घेवूया.

हे वाचा:   मूळव्याधला कायमचे नष्ट करायचे असल्यास या पानाचा उपयोग करा.! ही पाने तुमचे लाखो रुपये वाचणार लिहून घ्या.!

मित्रांनो खरं तर आपल्या भारतीय महिला हा उपाय अगदी सुरुवाती पासूनच जाणतात. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यक आहे खारिक. खजुराच्या फळाला सुकवून त्याचे रुपांतर खारिक मध्ये केले जाते. प्र’सूती नंतर महिलेला खारिक दिले जाते याचे कारण म्हणजे खारिक आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात उर्जा प्रदान करते. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवते.

त्याच बरोबर खारिकाच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील चांगलीच वाढते म्हणूनच या उपायासाठी या बहुगुणी खारिकाचे एक फळ घ्या. या उपायासाठी दुसरा घटक आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे काळी मिरीचे दाणे. काळी मिरी आपल्या भारतीय घरात मसाल्यांमध्ये वापरला जाते. आपल्या शरीरासाठी काळी मिरी फार उपयुक्त मानली जाते.

शरीरात असणारी सर्दी तसेच खोकल्यावर काळी मिरी एक रामबाण औषध आहे. त्याच बरोबर घसा लाल होणे व घसा बसणे अश्या वेळी देखील काळी मिरीचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील याने वाढते. या उपायासाठी काळी मिरीची चार ते पाच फळे खलबत्याच्या मदतीने बारीक करुन घ्या. आता एक पुढे एक खारिक त्यातील बी काढून घ्या.

हे वाचा:   पोटातली सगळी घाण काही सेकंदात मोकळी होईल.! पोटातले सर्व आतडी मोकळी होतील.! डॉक्टर देखील हैराण आहेत.!

या नंतर चार ते पाच बारीक केलेली काळी मिरीची फळे घ्या. या दोन्ही घटकांना तव्यावर साजूक तुपात वाटून घ्या. तूपाच्या ऐवजी तेल वापरु शकता परंतू तुपात हे घटक चांगले भाजले जातिल. आता हे दोन्ही घटक पुढे दूधात टाका व एक ग्लास दूध चांगले ढवळून घ्या. आता या मिश्रणाचे सेवन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रोज रात्री झोपण्यच्या आधी करा. याने तुम्हाला वारंवर होणारा सर्दी, खोकला व ताप सोबतच अंगदुखी या सर्व समस्यांतून आराम मिळेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.