नागिन झाल्यानंतर या चुका करणे टाळावे.! अन्यथा जीवावरही बेतू शकते.! अनेकांना याची माहिती नसेल एकदा अवश्य वाचा.!

आरोग्य

आपण आता एकवीसव्या शतकाकडे वळत आहोत आणि तरी ही जुन्या काही रुढी अजून आपल्या समाजातून जात नाही. नागीण हा आजार आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. मित्रांनो नागीण या आजाराविषयी गैरसमज अधिक आहेत. नागिणीने शरीराला विळखा मारला की जिवाला धोका असतो हा त्यापैकी मोठा गैरसमज. गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल.

उन्हाळा हा ऋतू सुरू झाल्यावर वाढत्या तापमाना बरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागीण हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या विषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते. एकदा कांजिण्या झाल्यावर पुन्हा होत नाहीत. काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे सूप्त असलेले विषाणू परत जागृत होतात आणि त्या व्यक्तीला नागीण होते.

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा काही वेळेला नागीण उद्भवू शकते. नागीण होण्याच्यबआधी काही वेळेला त्या भागामध्ये दुखायला लागते. हा त्रास छातीवर झाल्यास काही रुग्ण कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन गरज नसताना खूप तपासण्या करून घेतात. नागिणीच्या दुखण्यात प्रचंड आग होते आणि ठराविक अंतराने चमका मारतात. दोन-तीन दिवसांनंतर लालसर रंगाचे पुरळ येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोट सुरुवातीला लालसर असतात.

हे वाचा:   या एका गोळीने ११ आजार होतील मुळापासून नष्ट, दिवसभरातून कधीही खा ही घरीच बनवलेली गोळी.!

नंतर त्यात पाणी भरते. ज्या नसेवर हे फोड उमटतात, त्या ठिकाणी त्वचा लालसर होऊ शकते आणि फोडांचे समूह उठतात. दोन समूहांमधील त्वचा नेहमीसारखी असते. नागिणीने विळखा मारला किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळली की, जिवाला धोका असतो असा आपल्याकडे गैरसमज आहे. या गोष्टीत काहीही तथ्य नाही. कारण नागीण ही शक्यतो शरीराच्या एकाच बाजूला येते. आजाराची तीव्रता प्रत्येक पेशंटच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.

हा आजार पहिल्या दोन दिवसांच्या आत वैद्यकीय उपचार सुरू झाल्यास पाच-सात दिवसांत खपल्या येऊन आजार व्यवस्थित आटोक्यात येऊ शकतो. नागीण बरी झाल्यावरसुद्धा काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात चमक मारणं, दुखणं असा त्रास होतो. नागिणीवर औषध नाही, असा गैरसमज असल्यामुळे बऱ्याच वेळा रुग्ण इतर उपचार करू लागतो. नागीण हा आजार घरच्या घरीच बरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखात एक नैसर्गिक रामबाण उपाय सांगणार आहोत.

हा उपाय तयार करण्यासाठी रांगोळी काढण्यासाठी वापरले जाणारे गेरुची बारीक पावडर घ्यायची आहे. आता यात गायीचे शुद्ध तूप घालायचे आहे. हा लेप रोज संध्याकाळी सात ते आठ दिवस नागीण उठलेल्या शरीराच्या भागावर लावा. तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवू लागेल.आजार झाला असताना जास्त दगदग टाळावी, हलका आहार घ्यावा. आहारात या परिस्थितीत शक्यतो डाळ व भातच खावा.

हे वाचा:   जर कधी आला ताप सर्दी आणि खोकला तर किचनमध्ये जाऊन पटकन ही एक वस्तू तोंडात टाका.! पुढच्या 30 मिनिटात सर्दी ताप ताप गायब.!

हा आजार जास्त गंभीर नाही परंतु आपल्या चुकीच्या मानसिकतेनेमुळे हा आजार बळावतो व बरा होत नाही. या आजारात स्वतःला खंबीर व मजबूत बनवा. या सोबतच तुमचे कपडे व इतर सामान देखील नेहमी वेगळेच ठेवा नाही तर संसर्ग होवून हा आजार पसरू शकतो. जेव्हा ही आंघोळ घ्याय तेव्हा देखील जास्त थंड अथवा गरम पाणी नंतर घेता साधारणपणे कोमट पाणी घ्यावे. अंघोळीनंतर ती जागा टिपून घ्यावी.

स्वतःचे कपडे, साबण वेगळं ठेवावं. आज आम्ही या लेखात दिलेली माहितीच्या आधारे तुम्ही या आजारातून अगदी सहजपणे बरे होवू शकता. सोबतच शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढणारा आहारा नक्की घ्यावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.