झोपते वेळी कांदा आपल्या उशी जवळ ठेवून झोपा.! दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल हा जबरदस्त बदल.! असे का केले जाते माहिती आहे का.?

आरोग्य

अनेक वेळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगितले जातात हे उपाय आपल्याला खूपच विचित्र वाटत असतात. याचे आपल्याला फायदे आहेत की नाही कधीकधी हेच आपल्याला समजत नाही. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की आपल्याला हे सांगितले जाते की झोपताना एक कांदा उशीखाली घेऊन झोपावे. नेमके यामागे काय लॉजिक आहे हे माहिती आहे का.?

माहित नसेल तर अजिबात चिंता करू नका आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याबाबतची सविस्तर अशी माहिती देणार आहोत. भाजीमध्ये कांद्याचा वापर असो वा सॅलडच्या स्वरूपात असो, बहुतांश भारतीयांचे जेवण कांद्याशिवाय अपूर्णच राहते. कांदा जेवढा आपला आहार रुचकर बनवतो तेवढेच त्याचे फायदेही आहेत. आता विज्ञानानेही हे मान्य केले आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला कांद्याच्‍या अशाच एका फायद्याविषयी सांगत आहोत, ज्‍याच्‍या विषयी अनेकांना माहिती नसेल आणि त्‍याचे फायदे जाणून तुम्‍ही हैराण व्हाल. असे मानले जाते की कांद्याचे तुकडे करून ते बेडजवळ ठेवल्याने खूप फायदा होतो. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. याचे कारण म्हणजे कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून आराम मिळतो.

हे वाचा:   सिगारेट पिणाऱ्यांनो दवाखान्यात जायचे नसेल तर, स्वतःचे शरीर अशा प्रकारे स्वच्छ करत जा.! सिगरेट पिऊन पिऊन खराब झालेले फुफुसे असे होतील रिकव्हर.!

प्राचीन काळी, लोक संसर्ग टाळण्यासाठी ही पद्धत वापरत असत. असे मानले जाते की कांदे कापून बेडजवळ ठेवल्याने देखील चांगली झोप येते. अनेक लोकांना रात्री काही केल्याने झोप लागत नाही अशा लोकांनी जर हा उपाय करून बघितला तर नक्कीच फायदा होईल. उन्हाळ्याची वेळ आहे आणि उन्हाळा आला की या काळात कीटक, पतंग आणि डास झोपेत खूप त्रास देत असतात.

कधी कधी हे कीटक आपल्या झोपेची पार वाट लावून टाकतात. अशा परिस्थितीतही बेडजवळ कांदा ठेवून झोपणे फायदेशीर ठरते कारण डास कांद्याच्या वासापासून दूर राहतात. जर तुम्हाला अशा कीटकांचा त्रास होत असेल तर तुम्ही हा कांद्याचा उपाय करायलाच हवा. पाय डिटॉक्स करण्यासाठी आणि त्यांच्यातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तळांवर कांदा चोळणे देखील चांगले आहे.

आपल्या आजूबाजूला अनेक किडे असतात अनेक वेळा हे चावले देखील जातात. यामुळे भयंकर अशी वेदना देखील होत असते. असे किडे चावले असेल तर त्यामुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी त्या ठिकाणी कांद्याचा रस लावणे खूप फायदेशीर ठरते. नाकातून रक्त येत असल्यास कांद्याच्या रसाचे २-३ थेंब नाकात टाकल्यानेही आराम मिळतो. असे मानले जाते की सांधेदुखीच्या समस्येमध्ये कांद्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून लावल्याने फायदा होतो.

हे वाचा:   केसातला कोंडा पिठासारखा खाली पडत आहे का.? केसात खूपच कोंडा झाला असेल तर आंघोळी आधी डोक्याला लावायची ही एक गोष्ट.!

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर कांद्याचे सेवन केल्याने फायदा होतो. यासोबतच ऑलिव्ह ऑईलमध्ये कांद्याचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते. याशिवाय कांद्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुमच्या आहारात कांद्याचा नक्कीच समावेश करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.