या कारणामुळे पोट आणखी फुगत जाते.! त्यामागचे खरे कारण तुम्हाला कोणीही सांगणार नाही.! असा लावावा लागेल तपास.!

आरोग्य

आपल्या शरीराला रोजची कामे करण्यासाठी ऊर्जेची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते. ही गरज भागते ती अन्नाच्या मदतीने. आपले शरीर निरोगी असेल तर आपण पडेल ते काम करू शकतो. मात्र शरीरात काही बाधा असतील तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज काल सामान्य होत असलेली तक्रार म्हणजे पोट वाढणे. पोट वाढण्याची अनेक कारणे असू शकतात.

याचे पहिले कारण म्हणजे, जर तुमचे जेवण योग्य नसेल आणि तुमची जीवनशैली योग्य नसेल तर तुमचे पोट वाढू लागते आणि तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होईल. आहार योग्य नसेल तर अन्न पचवण्याची शक्ती नष्ट होते. त्यानंतर जमा होणारी चरबी जाळणे कठीण होते त्यामुळे पोट वाढू लागते. या शिवाय आजकालच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण सतत बसून काम करतात. शरीराला कोणताही व्यायाम मिळत नाही आणि हेदेखील पोट वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

अजिबातच शरीराला व्यायाम दिला नाही तर पोटातील चरबी वाढण्यास अधिक हातभार लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा. तळलेले अन्न जास्त खाणे, साखरयुक्त पदार्थांचे अधिक सेवन, एरेटेड पेये – कॅन , ज्यूस या सर्वांचा दैनंदिन जीवनात अतिवापरामुळे वजन वाढते. पुरेशी झोप न मिळणे. काही वेळा आनुवंशिकतादेखील लठ्ठपणाचे कारण असू शकते आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जर तुम्ही जास्त प्रमाणात म’द्य सेवन केले तर तुमच्या यकृताला सूज येऊ शकते.

हे वाचा:   फक्त या पदार्थाचा वास घ्या..! हिवाळ्यात सर्दी आणि थंडीमुळे बंद झालेले कान, नाक आता दहा मिनिटात खुले होतील.!

ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोटात पाणी भरते आणि तुमचे पोटही वाढू शकते. आणि फक्त दा’रू प्यायल्याने सुद्धा तुमचे वजन वाढू शकते. तिसरे आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीराचा व्यायाम नसणे. वर्क फ्रॉम होम, दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसणे आणि व्यायाम न केल्यामुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होईल, ज्यामुळे लठ्ठपणा किंवा पोट वाढू शकते. या कारणास्तव आपण जितके खातो तितक्या कॅलरीज बर्न करणे देखील आवश्यक आहेएक सामान्य कारण म्हणजे तणाव.

जास्त तणावाखाली राहिल्याने तुमचा कोर्टिसोल हार्मोन वाढतो जो तुम्हाला तणावाचा सामना करण्यास मदत करतो आणि जेव्हा तुमची तणावाची पातळी वाढते तेव्हा हा हार्मोन तुमच्या चयापचयाचा वेग कमी करतो, ज्यामुळे तुमच्यामध्ये जास्त कॅलरीज राहतात. पोट आणि चरबी जळत नाही, त्यामुळे ती विशेषतः पोटात राहते, त्यामुळे लठ्ठपणा अथवा पोट वाढू शकते. साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा.

हे वाचा:   कोल्हापुरी चिकन थाळी बनवून त्याच्या स्वादाने सगळ्यांना वेड करून टाका.! हॉटेल मध्ये जाऊन पैसे वाया घालवत बसू नका, एकदा घरी अशी चिकन थाळी बनवली तर वेडे व्हाल.!

पोट कमी करण्यासाठी वेफर्स, एरिट्रेड ड्रिंक्स, केक, जंक फूड यांचा समावेश आपल्या आजारातून वर्ज्य करून टाका. रोज घरचा संतुलित आहार ग्रहण करा. या अन्नामध्ये जास्त प्रथिने असणेअधिक पोषण मिळेल ऐसे पदार्थ भाज्या, फळे जास्त प्रमाणात खावीत.ज्या पदार्थां मध्ये फायबर जास्त प्रमाणात आहेत त्यांना देखील आहारात घ्या. दा’रूचे सेवन करू नका. सोबतच चांगली 7 ते 8 तास झोप नियमित घ्या. तणावामध्ये राहू नका.

तणाव कमी करण्यासाठी ध्यान तसेच योगा करू शकता आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला देखील हा त्रास होत असेल तर वेळीच सावध व्हा आणि स्वतःकडे लक्ष द्यायला लागा. एकदा पोट वाढलं की ते कमी करण्यासाठी खूपच त्रास होतो. त्यामुळे तुम्ही वेळीच लक्ष द्यायला हवे. व्यायाम रोजच्या रोज करा किती ही बिझी शैली असेल तरी ही आपल्या आहाराकडे नक्की लक्ष्य द्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.