मूळव्याध आता जास्त काळ टिकू देऊ नका.! त्यासाठी हा उपायच बेस्ट आहे.! कितीही जुनाट मूळव्याध याने केला आहे शांत.!

आरोग्य

मित्रांनो आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असतात. गु’द’द्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील सुजलेल्या आणि फुगलेल्या, दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात. यामध्ये विना रक्तस्राव व रक्तस्रावासहित असे दोन प्रकार पडतात. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेची आहे. भारतातील जवळपास चार कोटी लोकांना हा आजार आहे आणि इतर वर्षे नवे लाखोंनी लोकांची भर या त्रासात होत असते.

आज-काल अगदी तरुण वयात गटातील स्त्री-पुरुषांना देखील मुळव्याध होऊ लागली आहे. विस नोव्हेंबर रोजी जागतिक मूळव्याध दिन साजरा करण्यात येतो. मुळव्याध म्हणजे शौचाच्या जागी आग होणे, दुखणे, रक्त पडणे, खाज येणे, कोंब येणे. फिशर म्हणजे या जागे चिरा पडणे, जखमा होणे, शौ’चाला कडक होणे, रक्त पडून आग होणे, भगंदर म्हणजे शौ’चाच्या जागी पोळी येणे, बेंड येणे, त्यातून रक्त येणे, सूज येऊन तीव्र वेदना होणे.

आता जाणून घ्या त्याचे कारण आणि काही टिप्स व उपाय. अतिवेगवान वाहनातून प्रवास करणे, कठीण आसनावर बसणे. लघवी व शौ’चास आल्यावर अडवून धरणे. जोर लावणे, आंबट खारट तिखट जास्त प्रमाणात खाणे, जेवणाच्या वेळा अनियमित असणे, पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे, बद्धकोष्टता तसेच पित्ताचे आजार यावर व्यवस्थित उपचार न घेणे.

हे वाचा:   घरात एक पण उंदीर, घुस राहणार नाही, एक रुपयाची वस्तू करेल कमाल.!

अनेक स्त्रियांमध्ये गर्भ अवस्थेतील बाळंतपणामध्ये आहार-विहार न पाळल्याने अशा तक्रारींना तोंड द्यावे लागते. पोट नेहमी साफ राहील याकडे लक्ष द्यावे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या सॅलेड फळ यांच पुरेसे प्रमाण असावं. योग्य प्रमाणात पाणी प्यावे. खाण्यापिण्याच्या वेळा नियमित असाव्यात. बाळंतपणातील आहार हा सल्ल्यानुसारच द्यावा. शौ’चास आली असता वेळीच मोकळे व्हावे.

रक्त पडत असल्यास खजूर आवळ्याचे पाणी, दुर्वांचा रस, लोणी, मोरावळा, साजूक तूप, डाळिंबाचा रस असे पदार्थ घ्यावेत. आहारामध्ये गुलकंद साजूक तूप आणि मुगाची डाळ यांचे सेवन वाढवावे. याने तुम्हाला खूप फायदा होईल. रात्री झोपण्याआधी कोमट पाणी व दोन चमचे साजूक तूप घ्यावे. कोंब असल्यास, जखम खाज येणे ही समस्या असल्यास करा हा उपाय.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे चांगल्या प्रतीची हळदीचे पावडर आणि व्हॅसलीन जेली. एक चमचा व्हॅसलीन जेली घ्या त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घाला. हे पाच मिनिटं उन्हामध्ये ठेवून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा मलम झाला तयार. हा तयार केलेला मलम तुम्हाला जखमेवर लावायचा आहे. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि बसले मुळे त्वचा मऊ पडते.

हे वाचा:   एका फुलाने आणि एका पानाने अनेक लोकांना केले आहे टेन्शन मुक्त.! अनेकांना दवाखान्याचे तोंड बघायला लावले नाही या वनस्पतीने.! हे तीन आजार पूर्णपणे नष्ट होतात.!

खाज येणे यासारख्या समस्या देखील दूर होतात. हे मलम लावले आधी ती जागा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. दिवसातून दोन वेळेस हा मलम कापसाच्या मदतीने लावा. यासोबतच कोमट दुधामध्ये एक चमचा साजूक तूप पाव चमचा हळद घालून असे दूध सलग तीन दिवस प्या. आहारामध्ये फायबर युक्त अन्नपदार्थांचे सेवन वाढवावं.

सांगितलेले उपाय आणि टिप्स जर तुम्ही करून बघितले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्रासापासून तुमची सुटका होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.