गुडघ्याला बांधायचे हे पाने.! मग तुमचेपण गुडघे दगडासारखे मजबूत बनतील.! कितीही म्हातारपण आले तरी पण दुखणार नाही.!

आरोग्य

गुडघेदुखी होणे सध्याच्या परिस्थितीत खूपच चिंताजनक बाब बनत चालली आहे. जसे आपले वय वाढत जात असते तसे आपल्याला सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी इत्यादी प्रकारचे दुखणे सुरू होत असते. अशा वेळी यावर कोणते उपाय करायला हवे हे आपल्याला समजत नसते. गुडघेदुखी ची समस्या अतिशय सामान्य असली तरी यामुळे भयंकर असा त्रास होत असतो.

यासाठी वेगवेगळे उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला गुडघेदुखीवर अतिशय रामबाण असा सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून यामुळे कोणतेही साइड इफेक्ट शरीरावर जाणवत नाही. हा उपाय जर तुम्ही तीन ते चार दिवस केला तरी तुम्हाला गुडघेदुखीवर भरपूर फरक झालेला दिसेल. तुमची गुडघेदुखी कमी झालेली दिसेल.

चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करावा लागेल हा उपाय. या उपायासाठी आपल्याला रुई या वनस्पतीच्या पानांची आवश्यकता भासणार आहे. ही वनस्पती आपल्याला कोठेही अगदी सहजपणे मिळून जाते. या वनस्पतींच्या पानांमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शारीरिक समस्यांवर उपयुक्त मानले जातात. घराच्या आसपास किंवा एखाद्या शेताच्या कडेला अगदी सहजपणे आपल्याला ही वनस्पती मिळून जात असते.

हे वाचा:   खायचा असेल तरी हा मासा खावा, ताकद जवळपास दुपटीने वाढली जाईल.!

या वनस्पतीच्या पानांमध्ये असे औषधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यांसाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. रुईच्या झाडाचे पान तोडल्यानंतर त्यामधून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर येत असतो. हा पांढरा पदार्थ अतिशय हानिकारक मानला जातो. याचा संपर्क चेहर्‍यावर किंवा डोळ्यावर कधीही येऊ देऊ नये. यामुळे डोळ्यांसंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

गुडघे दुखीवर व सांधेदुखीवर या पानांचा अतिशय अपायकारक अशा पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम तीन ते चार रुईची पाने घ्यावीत. याला पाण्याद्वारे चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर एक कढई घेऊन ही कढई गॅसवर उलटी करून ठेवावी. जेव्हा कढई चांगल्याप्रकारे गरम होईल त्यावर हे पाने ठेवावे. पाने चांगल्याप्रकारे गरम होईल याची काळजी घ्यावी.

हे वाचा:   मूळव्याध कसाही असला तरी या जबरदस्त वनस्पतीच्या साह्याने बरा होतो म्हणजे होतोच.! मूळव्याध वर रामबाण इलाज.!

पानांवर हलकासा काळपट रंग येत नाही तोपर्यंत याला गरम करत राहावे. त्यानंतर हे पाने घेऊन हलकेसे गरम असतानाच गुडघ्यावर दोऱ्याच्या साह्याने बांधून ठेवावी. हा उपाय रात्री करायला हवा जेणेकरून सकाळच्या वेळी तुम्हाला याचा रिझल्ट लगेच दिसून येईल. जर तुम्ही रात्री अशाप्रकारे गुडघ्याला पाने बांधून झोपला तर गुडघेदुखीचा त्रास कायमचा नष्ट झालेला दिसेल.

हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून तुम्ही घरगुती पद्धतीने करू शकता तेही अगदी कमी साहित्यामध्ये. यामुळे नक्कीच आराम मिळतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.