अंड्याचे सेवन अनेक लोक करत असतात. परंतु अंड्याचे उपयोग किती आहे माहिती आहे का? अंडी ही तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. अंड्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर केसांचे सौंदर्य हे आणखी खुलले जाऊ शकते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अंड्याचे काही फायदे सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे सौंदर्य आणखीन सुंदर बनवू शकता.
अंड्याचा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला काही साहित्याची आवश्यकता भासणार आहे. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला लागणार आहेत दोन अंडी. दोन चमचे ऑलिव्ह ऑइल, दोन चमचे मध, एक चमचा लिंबाचा रस, एवढे सर्व पदार्थ तुम्ही जमा करून हे उपाय करून केसांना सुंदर बनवू शकता. चला तर पाहूया याची कृती काय असेल.
एका वाटीमध्ये अंडी फोडून त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यावे. त्या वाटीमध्ये ऑलिव्ह ऑइल, मध आणि लिंबाचा रस टाकून याला चांगल्या प्रकारे एकत्र करावे. हे मिश्रण आता तुमच्या केसांना मुळापर्यंत लावावे. केसांना लावताना एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे केसांच्या मुळापासून सुरू करून टॉपपर्यंत लावत यावे.
त्यानंतर आपले केस शॉवर कॅप किंवा प्लास्टिकच्या आवरणाने झाकून ठेवावे असे जवळपास तीस मिनिटांसाठी राहू द्यावे. त्यानंतर आपले केस हे शाम्पू ने चांगल्या प्रकारे धुवून घ्यावे. जर तुम्हाला केसांची सुंदरता प्रत्येक दिवशी चांगली ठेवायची असेल तर प्रत्येक आठवड्यात हा उपाय करायचा आहे. यामुळे केस हे सिल्की आणि खूप चांगले राहतात.
अनेक लोकांच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की अंड्यामध्ये असे काय असते ज्यामुळे केस खूप सुंदर होतात. तर मित्रांनो अंडी हा प्रथिनांचा खजिना आहे. यामध्ये केसांना मजबूत आणि निरोगी करण्याची खूप शक्ती आहे. अंड्यामध्ये असलेले प्रथिने केसांच्या पट्ट्या या मजबूत करत असतात. यामुळे केस तुटणे फार कमी होत असते.
याव्यतिरिक्त अंडी त्यामध्ये बायोटिन खूप प्रमाणात असते जे निरोगी केसांसाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे अंड्याचा वापर हा केसांची सुंदरता वाढवण्यासाठी करत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.