आपल्या मुलांना मोबाईल खेळायला देण्याआधी हे वाचा.! मुलांना मोबाईल मुळे काय होऊ शकते.? थक्क करणारी माहिती समोर.!

आरोग्य

अलीकडच्या काळामध्ये मोबाईलचा वाढता उपयोग यामुळे तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. परंतु लहान मुलांना दिला जाणारा मोबाईल हा देखील एक चर्चेचा विषय बनत चालला आहे. अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसण्यासाठी किंवा फक्त खेळ म्हणून मोबाईल देतात. परंतु याचा कीती भयंकर परिणाम मुलांवर होऊ शकतो हे माहिती आहे का? अनेक पालकांना प्रश्न पडतो की मुलांना मोबाईल द्यावा की नाही?

तर मित्रांनो आपण या त आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत मोबाईल वापरण्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात. लहान मुलांना कशाप्रकारे मोबाईलचा वापर करायला द्यावा. म्हणजे त्याद्वारे त्यांना फायदा होईल आणि तोटे कमी होतील त्यामुळे मोबाईल देण्यापूर्वी मुलांना या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्यायला हवी.

अनेक पालकांची मुले हे बाहेरगावी राहत असतात त्यांच्यासोबत संपर्कात राहण्याचा अतिशय उत्तम मार्ग म्हणजे मोबाईल फोन आहे. विशेषतः काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर अशा ठिकाणी मोबाईलचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. मुले देखील त्यांचे मित्र तसेच शिक्षकांबरोबर सहजपणे संवाद देखील साधू शकतात.

हे वाचा:   हे पाच पदार्थ चहात टाका, चहाची चव दुप्पट वाढेल, पिणारा कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.!

मुले याद्वारे काही करमणूक देखील करू शकतात जेणेकरून अभ्यासापासून त्यांना विश्रांती मिळेल. मोबाईलचा सर्वात जास्त आणि महत्त्वाचा फायदा हा आहे की याद्वारे तुम्ही भरपूर काही शिकू शकता. मोबाईल खूप ज्ञानी व्यक्ती आहे. फक्त त्याचा वापर करता यायला हवा. कुठलाही मुलगा याद्वारे भरपूर गोष्टी आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करू शकतो.

मोबाईल मध्ये जीपीएस असते ज्याद्वारे मुलांना बरोबर ट्रेक केले जाऊ शकते. यामुळे मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न सुटला जाऊ शकतो. तसेच मुले याद्वारे विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करू शकतात. मुलींसाठी देखील या जीपीएस चा खूप फायदा होऊ शकतो यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न देखील थांबू शकतो.

जेवढे मोबाईलचे फायदे आहे त्यापेक्षा जास्त त्याचे नुकसान देखील आहे हे देखील आपण लक्षात ठेवायला हवे. जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे डोळे दुखी, डोकेदुखी, डोक्याला ताण येणे, झोपेत त्रास होणे यांसारख्या अनेक भयंकर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मोबाईल मध्ये असलेली ब्ल्यू रे हे डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय घातक मानले जातात.

हे वाचा:   ओला खोकला असूद्या किंवा कोरडा खोकला, हा काढा दोन मिनिटात त्याला पळवून लावेल, खोकल्याचे जालीम औषध.!

आजकाल सायबर बुलिंग खूप प्रमाणात होत आहे. इंटरनेट द्वारे अनेक निनावी लोकांकडून मुलांना संपर्क करून सायबर धमकी गुंतवून ते लोक आपली कामे करून घेत असतात. त्यामुळे मुले यामध्ये फसण्याची शक्यता असते. याबरोबरच यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील नकारात्मक प्रभाव पडू शकतो. मुले नैराश्यात जाऊ शकतात. तसेच एखाद्या गोष्टीच्या आहारी देखील जाऊ शकतात.

मोबाईल मध्ये नको त्या गोष्टी खूप प्रमाणात आढळतात. यावर सरकारद्वारे कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मुले नको त्या गोष्टीकडे जास्त जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या मुलांच्या मोबाईल मध्ये काय आहे. तो कुठल्या प्रकारच्या गोष्टी सर्च करतो आहे याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. यामुळे गुन्हेगारी प्रमाणही वाढण्याची शक्यता असते.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.