मित्रांनो आपल्याकडे आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून अनेक प्रकारच्या तेलांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ज्यामध्ये सर्वच आजारांमध्ये आराम पडणारे एक महत्वाचे तेल म्हणजे निलगिरीचे तेल होय. या तेलामध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात तसेच हे तेल एक अँटी सेप्टीक म्हणून देखील काम करते. तुम्ही आपल्या आजी-आजोबांकडे निलगिरीच्या तेलाची बाटली आवश्य बघितलीच असेल.
किंवा मेहंदी लावल्यानंतर त्यावर निलगिरीच्या तेलाने कापसाचा बोळा फिरवलेला आहे तुम्ही बघितला असेल. होय हेच ते निलगिरीचे तेल ज्याचे एक ना अनेक फायदे आहेत. सायनस, सर्दी, पडसे, खोकला, घसा खवखवणे, फ्लू, दमा अशा अनेक प्रकारच्या श्वसना संबंधीचा त्रासांमध्ये देखील निलगिरीचे तेल अत्यंत उपयुक्त ठरते. अनेक जण गरम पाण्यामध्ये या तेलाचे काही थेंब टाकून वाफ घेतात.
त्वचेचे कोणत्याही प्रकारचे संक्रमण असल्यास ते कमी करण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. त्वचा मऊ आणि डाग विरहित होते. तीव्र डोकेदुखी थकवा ताण तणाव असल्यास देखील या तेलाचा अत्यंत फायदा होतो. या मध्ये दोन थेंब तेल कपाळावर लावून हलक्या हाताने मालिश करा. अरोमा थेरपी मध्ये देखील मसाज करण्यासाठी हे तेल वापरले जाते.
आपल्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हे तेल दात आणि हिरड्या यामधील संक्रमण असल्यास दूर करते. आज-काल अनेक प्रकारच्या टूथपेस्ट आणि महत्वाच मध्ये देखील निलगिरीचे तेल वापरले जात असल्याचे बघायला मिळते. लक्षात घ्या निलगिरीचे तेल कधीही अन्नपदार्थ म्हणून वापरले जात नाही. परंतु या तेलामुळे ताप येत असेल तर तो देखील जातो. याकरता आपल्या हात पायाच्या तळव्यावर आणि कपाळावर हे तेल व्यवस्थित लावून चोळावे.
घाम येऊन ताप जातो. अनेक जणांना स्नायू दुखी संधिवात कंबर दुखी स्नायू आखडला जाळणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. कारण काहीही असू दे परंतु या प्रकारच्या दुखण्या मध्ये निलगिरीचे तेल लावून मालिश केल्याने निवेदनातून आराम मिळतो तसेच सूज असल्यास ती देखील ओसरते. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही परंतु आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी देखील निलगिरीचे तेल प्रचंड फायदेशीर आहे.
हे थंड असून डोकं शांत करणारे असते. यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन देखील मिळतो. निलगिरीच्या तिला सोबत कापूर वापरून केसांना लावल्याने केसांचे आरोग्य देखील चांगले राहते. चला तर मग वेळ न घालवता असे निलगिरीचे तेल घरी कसे बनवायचे ते पाहूयात. यासाठी तुम्हाला लागणार आहेत निलगिरीचे ताजी स्वच्छ धुऊन वाळवलेले पानं. ही पान मिक्सर मध्ये बारिक वाटून घ्या.
खूप बारीक नाही वाटले तरी चालेल. ही वाटलेली निलगिरीची पाने कोणत्याही एका लोखंडी भांड्यामध्ये घ्या. यामध्ये खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे मोहरीच्या तेलात देखील बनवू शकता. शक्यतो एक ग्लास ऑलिव्ह ऑइल वापरावे. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा. त्यामध्ये हे तेल घातले भांडे ठेवा. अशा डबल बॉईल पद्धतीने हे तेल आपण बनवणार आहोत.
सुमारे 40 ते 50 मिनिटे मंद आचेवर हे तेल बनते. गार झाल्यावर हे तेल काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. हे झाले तुमचे घरी निलगिरीचे अति लाभ देणारे तेल तयार! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.