आजकालची तरुण पिढी बघितली तर आळशी बनत चालली आहे. तरुण पिढीला फक्त आणि फक्त मोबाईल दिसत आहे. मोबाईलचा अतिवापर हा आपल्या आरोग्याचा खूप मोठा घात करत आहे हे अनेकांना समजत नाही. आता तुम्ही म्हणाल की मोबाईल कशाप्रकारे आपले आरोग्य बिघडतो तर. आम्ही तुम्हाला बेसिक अशा लहान-सहान गोष्टी सांगणार नाहीत तर मोबाईल मुळे तुम्ही जागरण क्षमता वाढत चालली आहे.
जवळपास 95 टक्के लोक हे मोबाईल मुळे पहिल्यापेक्षा आता उशिरा झोपत आहे. यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. जे वय स्वतःला सिद्ध करण्याचे असते, भरपूर मेहनत घेण्याची असते, आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचे असते, त्या वयामध्ये मुले मोबाईलच्या नादात वेडी झाली आहेत. रात्री उशिरा झोपल्यामुळे हे मुले सकाळी देखील उशिरा उठत असतात.
परंतु उशिरा उठणे हे आपल्यासाठी अत्यंत घातक आहे असे तुम्हाला माहिती आहे का. सकाळी जर तुम्ही चार वाजता उठल असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बाकीच्यांपेक्षा कितीतरी पटीने पुढे गेलेली असाल यात काही शंका नाही. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सकाळी चार वाजता उठल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे फायदे होतील हे सांगणार आहोत. हे फायदे तुमची भरपूर मदत करेल.
पहाटे चार वाजता उठणे ही तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची गोष्ट आहे यामुळे तुमची सकाळची सुरुवात फारच सुंदर होत असते पहाटेच्या शांततेमध्ये केलेला अभ्यास तसेच कोणतेही काम हे तुमच्यासाठी अत्यंत चांगले आहे. जर पहाटे उठून जर तुम्ही व्यायाम केला तसेच ध्यान केले तर यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले होते. सकाळची हवा अत्यंत शुद्ध असते. सकाळी उठून चालल्याने देखील भरपूर फायदा होतो.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर व्यायाम केला किंवा ध्यान केले तर यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्हाला ताजे तावाने वाटेल. जी लोक सकाळी उठून ऑफिसला जात असतात त्यांच्यासाठी तर हे खूप गरजेचे आहे. पण काही लोक हे रात्री उशिरापर्यंत काम करतात अशावेळी काय करायला हवे तर अशावेळी तुम्ही सकाळी सात किंवा सहाच्या वेळेस उठू शकता. आरोग्याच्या दृष्टीने कमीत कमी तुम्हाला सात ते आठ तास झोप असायलाच हवी.
चांगल्या प्रकारे शांत गाढ झोप घेतल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य आणखी सुधर होऊ शकतात. पहाटेच्या वेळी उठून जर तुम्ही पाणी पिला तर यामुळे देखील तुम्हाला भरपूर फायदा होतो. आणखी एक फायदा म्हणजे पार्टीच्या वेळी कोणीही उठलेले नसते त्यामुळे संपूर्ण क्षेत्र हे शांत असते अशावेळी तुम्ही भरपूर काही महत्त्वाची कामे देखील करू शकता यामुळे तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या देखील चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता.
पहाटे उठल्यानंतर तुम्हाला एक नियम नक्की फॉलो करायचा आहे तो म्हणजे सकाळी सात वाजेपर्यंत मोबाईलला हात पण लावायचा नाही. नाहीतर काही लोक सकाळी लवकर उठून मोबाईल बघत बसणार यामुळे आणखीनच तुम्हाला नुकसान होणार. उठल्यानंतर मोबाईल मधून निघणारे ब्ल्यू रेंज हे डोळ्यांसाठी अत्यंत घातक असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.