वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा ठेवण्याची ही आहे योग्य जागा; लगेच पहा आणि बदल करा.!

अध्यात्म

आपला हिंदू धर्म शास्त्रामध्ये वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहे. आपण जेव्हा नवीन घर बांधतो तेव्हा वास्तुशास्त्राचा विचार करूनच घराची बांधणी करत असतो. आपल्या घरामध्ये कोणती वस्तू असायला हवी कोणती असावी कोणत्या जागेवर काय असायला हवे याबद्दल चे सगळे ज्ञान वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आलेले आहे. आपल्यापैकी अनेक जण घराची बांधणी वास्तुशास्त्राप्रमाणे करत असतात परंतु इतके सारे करून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी भांडण , वादविवाद होत असतात मग अशावेळी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो.

घराची बांधणी तर वास्तुशास्त्रानुसार केलेले आहे सगळे कोपरे मुख्य भाग या सर्वांची मांडणी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे केली आहे तरी या सगळ्या घटना आपल्या आयुष्यात का घडतात? तर तुमच्या मनामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण झाले असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार घर बांधून सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी ,भांडण होत असेल तर अशा वेळी आपल्या घरातील वस्तूंची आपल्याला करायला हवे. जर आपल्या घरातील वास्तू व त्यांची मांडणी चुकलेली असेल तर या सर्व गोष्टींचा देखील आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या वस्तूंच्या मांडणीचा परिणाम आपल्या घरातील अन्य सदस्यांच्या जीवनावर देखील होत असतो आणि म्हणूनच आपल्या घरात नेहमी अशांतता नांदत असते.आपल्या घरातील अशांतता दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तूंची मांडणी व्यवस्थित रित्या करायला पाहिजे.

आजच्या लेखामध्ये आपल्या घरातील कचरा चा डबा नेमक्या कोणत्या जागी असायला हवा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरी कचऱ्याचा डब्बा आवश्यक असतो. आपल्या घरातील केरकचरा आपण प्रत्येक जण कचरा च्या डब्या मध्ये टाकत असतो.आपल्या घराची स्वच्छता कशाप्रकारे राहील याची प्रत्येक महिला काळजी घेत असते. आपल्या घरातील अनेकदा महिला लादी पुसणे, झाडू मारणे यासारख्या गोष्टी करत असतात व जमा झालेला कचरा डब्बा मध्ये टाकत असतात. अनेक ठिकाणी घंटागाडी दिवसभरातून एकदा येत असल्याने दिवसभराचा कचरा हा आपण घरामध्ये जमा करून ठेवत असतो त्याचबरोबर प्रत्येक वेळी कचरा बाहेर घेऊन जाणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपण दिवसभरातून एकदा आपल्या घरात जमा झालेला कचरा बाहेर टाकत असतो.

हे वाचा:   लग्न झालेल्या स्त्रीने वर्षभराच्या आत गर्भधारणा का करू नये जाणून घ्या.!

हा सगळा कचरा आपण कोठे व तो त्याची जागा काय आहे कचऱ्याचा डबा नेमका कोणत्या ठिकाणी आहे याबद्दलची देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.कचऱ्याच्या डब्यात मध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर येत असते. आपल्या घरातील टॉयलेट बाथरूम अडगळीचे सामान भंगार या सर्व गोष्टींमधून भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर येत असते.या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम घरातील सदस्यांवर देखील होत असतो.ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये असते, त्या घरातील सदस्यांवर नेहमी चुकीच्या गोष्टींचा प्रभाव असतो.

त्या घरातील सदस्य नेहमी आजारी पडतात त्यांना कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये पैसा लवकर येत नाही, आलेला पैसा जास्त काळ टिकत नाही अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. आपल्या घराचे मुख्य द्वार पूर्व दिशेला असते. या मुख्य द्वारातून आज आपण घरामध्ये प्रवेश करत असतो तसेच माता महालक्ष्मी सुद्धा या दारातूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणूनच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा डब्बा ठेवू नये कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते.

मुख्य प्रवेशद्वाराजवळ कशासाठी ठेवल्याने आपल्या शेजार्‍यांसोबत नेहमी भांडण होते आणि म्हणूनच शेजारणी सोबत भांडण होऊ नये यासाठी कचऱ्याचा डबा घरामध्ये किंवा त्याची जागा नेहमी बदलायला हवी. कुबेर देवता यांना धनाची देवता मानले जाते. जगभरामध्ये जितके चांदी सोने आहे हे सर्व कुबेर देवता यांच्या कृपेमुळे मिळालेले आहे त्यांची दिशा ही उत्तर दिशा असते म्हणूनच जर तुमच्या जीवनामध्ये खूप अशांती असेल पैसा येत नसेल तर नसेल तर अशावेळी त्या व्यक्तीने उत्तर दिशा आला असणाऱ्या वस्तूंची विशेष काळजी घ्यायला पाहिजे व त्याचबरोबर कुबेर यांची पूजा करायला हवे म्हणून चुकूनसुद्धा उत्तर दिशेला कचरा डब्बा ठेवू नका, अन्यथा तुमच्या जीवनातील पैसा हळूहळू निघून जाईल. पूर्व-पश्चिम या दोघांमधील दिशा ईशान्य दिशा म्हणून ओळखले जाते.

हे वाचा:   या दिवशी नखे कापा, पैसा इतका येईल कि सांभाळणं देखील होईल अवघड.!

ही दिशा देवी-देवतांचे दिशा ओळखली जाते. या दिशेला देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच चुकून सुद्धा या दिशेला कचऱ्याचा डबा ठेवू नका अन्यथा तुमच्यावर देवी-देवतांचा रोष प्रकोप होऊ शकतो. जर तुम्हाला घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवायचा असेल तर अशा वेळी घरातील वायव्य दिशेला हा कचराचा डब्बा हा आपल्याला ठेवायला हवा. आपल्या घरातील कचऱ्याचा डबा ठेवण्याची ही उत्तम जागा मानली जाते. ही दिशा आपल्या कष्टाचे फळ देखील देत असते. ही दिशा लाभदायक देखील मानले जाते परंतु वास्तू शास्त्रा मध्ये या दिशेला कचऱ्याचा डबा ठेवणे उत्तम म्हटलेले आहे. या दिशेला कचऱ्याचा डबा असल्याने आपल्या मनामध्ये वायफळ खर्च होत नाही परिणामी धन बाहेर लवकर जात नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.