ज्या घरात असतात या 3 वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीच सोडत नाही, नेहमीच समृद्धी आणि धनलाभ टिकून राहते.!

अध्यात्म

ज्या घरात असतात या 3 वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीही सोडत नाही. माता लक्ष्मीच्या आवडत्या अशा 3 वस्तू आहेत आणि या वस्तू मुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर होत असते आणि माता लक्ष्मीची कृपा जर आपल्यावर झाली तर मग आपल्या घरी कोणत्याही गोष्टींची कमी राहत नाही.

मग ते धान्य असुद्या मग ते धन असुद्या सुख असुद्या किंवा समृद्धी असुद्या सगळ काही मिळु लागत. यश आपल्या पदरी पडत असत म्हणून तुम्हीही या 3 गोष्टी तुमच्या घरात ठेवाव्यात या वस्तूनी आपल्या घरात सकारात्मकता येते शांती येते आनंद येतो. नकारात्मकता दुःख अडचणी घरातून कायम दूर होतात.

यातली पहिली वस्तू आहे पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा पंचमुखी हनुमानाच फोटो तुम्ही भरपूर घराच्या बाहेर बघितल असेल की मुख्य दरवाज्याच्या वर बाहेरून पंचमुखी हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती लावलेली असते आणि हे पंचमुखी हनुमान तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या वर लावल्या मुळे आपल्या घराचे रक्षण होते.

हे वाचा:   असा अंगठा असणारे लोक असतात खूपच चतुर; कधीच कोणत्याही गोष्टीत मागे पडत नाही.!

पंचमुखी हनुमानच यासाठी लावतात की आपल्या घरादाराचे रक्षण व्हावे कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती दुःख अडचणी किंवा कोणी काही केलेली बाधा आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून पंचमुखी हनुमान घराच्या बाहेरून मुख्य दरवाज्याच्या वर तुम्ही सुद्धा लावावा.

दुसरी वस्तू ती म्हणजे शंख माता लक्ष्मी आणि विष्णु भगवान यांची आवडती एकच वस्तू आहे ती म्हणजे शंख, शंख आपण आपल्या देवघरात ठेवावा. शंख घरात नसेल तर तुम्ही स्वामी केंद्रातून किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा सध्या ऑनलाइन सुध्दा शंख मिळतात.

तर शंख घेऊन त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करून हळदी, कुंकू, अक्षत टाकून पूजा करून तो शंख आपल्या देवघरात स्थापन करावा आणि दररोज शंखाची पूजा करावी या मूळे घरात शांती राहते कारण शंख हा शांतीचा प्रतीक आहे जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल, आवड असेल तर रोजसकाळी पूजा करते वेळेस शंख वाजवा.

हे वाचा:   तुमच्या जवळील या दोन वस्तू चुकूनही कुणाला दान करू नका, अन्यथा भविष्यात गंभीर समस्याला तोंड द्यावे लागेल.!

यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे पाण्याने भरलेला माठ आपल्या प्रत्येकाच्या घरी छोटासा का असेना पण पाण्यानी भरलेला माठ ठेवावा. मातीचा माठ आपण आपल्या घरात ठेवला पाहिजे खास करून स्वयंपाक घरात तो माठ ठेवावा कारण माठ हे माता लक्ष्मीचे आवडते प्रतीक म्हणून सुद्धा मानले जाते तर तुम्ही पण तुमच्या घरात पाण्यानी भरलेला माठ नक्की ठेवा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.