जेजुरीच्या खंडेरायाची ही आहे एक अद्भुत कहानी, कसे खंडेराय जुन्या गडावरून नव्या गडावर आले; आजही भक्तांना देतात त्या ठिकाणी दर्शन.!

अध्यात्म

आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण जेजुरीच्या खंडेरायाची मनोभावे पूजाअर्चा करतात. जेजुरीचा खंडेराया महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि प्रत्येक कार्यामध्ये आपण कुलदैवत आणि कुलस्वामिनी व श्री गणेश ना प्रथम मान देत असतो आणि त्यानंतरच अन्य देवी-देवता व कोणतेही कार्य हाती घेत असताना पूजा अर्चना देखील करत असतो. महाराष्ट्र हा संतांचा देश आहे.

या देशांमध्ये अनेक धर्म जाती पंथांचे लोक एकत्र राहतात त्याचबरोबर प्रत्येक जण सावळ्या विठ्ठलाची पूजा करतो तर कोणी ज्योतिबाची पूजा करतात कोणी जेजुरीच्या खंडोबाची पूजा देखील करत असतात पण तुम्हा सर्वांना जेजुरी बद्दल अनेक अशा काही माहिती गोष्टी असतात, त्या माहिती नसतात.आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या माहितीबद्दल जाणून घेणार आहोत.

आज आपण सध्याची जेजुरी पाहत आहात नवीन जेजुरी आहे परंतु पूर्वीच्या काळी एक जुनी जेजुरी देखील होती त्याबद्दल अनेकांना माहिती नाही. जुनी जेजुरी म्हणजे कडे पठारावरून देव नवीन जेजुरी वर कसे आले? याबद्दल अनेकांना कथा माहिती नसते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला नवीन जेजुरी बद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

ही गोष्ट फार पूर्वीची आहे. अनेक वर्षापूर्वी सोपे पार गणामध्ये खैरे नावाचे भक्त राहायचे आणि ते खंडोबा देवाचे भक्त होते. खंडोबा देवाची नेहमी पूजा-अर्चना करायचे आणि ते नेहमी पूजा अर्चना करण्यासाठी व पाणी नेण्यासाठी जुन्या गडावर म्हणजेच कडेपठारावर जात असे. देवाला नेहमी करेचे पाणी वाहत असे. देवाची पूजा करणे हा त्यांचा नित्य दिनक्रम असायचा आता त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना देव पूजा करण्यासाठी गडावर येणे जमत नसायचे त्यामुळे सेवेकरी एकदा पूजेसाठी गडावर गेल्यावर त्यांनी देवांना विनंती केली की देवा आता माझ्याकडून पूजा करणे शक्य होत नाही.वय साथ देत नाही.

हे वाचा:   का काही लोक गरीब राहतात व काही लोक खूप श्रीमंत होतात.? महालक्ष्मीने इंद्राला दिलेले उत्तर.!

देवांनी खैरे यांचे सर्व म्हणणे एकाग्र चित्ताने ऐकून घेतले त्यानंतर देव म्हणाले की ठीक आहे. तुला जर गडावर येणे शक्य होत नसेल तर मी तुझ्या सोबत येतो. आधी खैरेंना आश्चर्य वाटले परंतु नंतर देवाचे म्हणणे खरे वाटले. त्यानंतर देव सुद्धा खैरे यांच्या मागे जाऊ लागले परंतु देवाने सांगितले की, मी तुझ्यासोबत येईल परंतु तुझ्या मागे चालत असताना तू मला मागे वळून पाहायचे नाही.

जेथे तू मला मागे वळून पाहशील तेथेच मी थांबून जाईल. ही अट देवांनी घातली त्यानंतर खैरे पुढे आणि मागे असे प्रवास सुरू झाला. काही वेळानंतर खैरे यांच्या मनामध्ये शंका आली की देव खरंच आपल्या मागे येत आहेत ना म्हणून खैरेंनी मागे वळून पाहिले तर देव होते आणि अशा वेळी देव त्याच जागेवर थांबले. देव ज्या ठिकाणी थांबले ती जागा म्हणजे नवीन जेजुरी गड होय.

तेव्हापासूनच देव खंडोबा मल्हारी मार्तंड झाले.या जागेला नवीन जेजुरी असेदेखील म्हणण्यात आले आणि आजतागायत या जागेला नवीन जेजुरी असे संबोधले जाते. देवांच्या अवताराबद्दल अजून एक कथा प्रचलीत आहे.देव खंडोबा हे कडेपठारावर का आले? खंडोबाच महादेवाचा अवतार आहे का की अन्य देवाचा अवतार आहे ? या बद्दल ल कथा वेगवेगळ्या ग्रंथ पुराणामध्ये सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी लवथळेशवर याठिकाणी डोंगरावर मोठे ऋषीमुनी राहात असायचे आणि त्या ऋषीमुनींना दोन राक्षस आणि म्हणजेच मनी आणि मल्ल यांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्यामुळे ऋषींनी शंकराची आराधना केली.

हे वाचा:   घरामध्ये जर असेल कायमच आर्थिक चणचण तर वापरा या काही वास्तु टिप्स; घरामध्ये कधीही राहणार नाही पैशाची कमी.!

तेव्हा महादेव यांनी खंडोबा यांचा अवतार घेतला आणि त्या जागेवर प्रकट झाले त्यानंतर काळभैरवा चा अवतार खंडोबा यांनी घेतले आणि हाती खडगे घेतली व जुन्या पठारावर म्हणजेच कडेपठारावर राक्षसांचा वध केला त्यानंतर म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत आणि मणी व मल्ल दैत्यांचा वध केल्यामुळे मल्हारी ही नावे प्रचलित झालेली आहे.

काल भैरव म्हणजे मार्तंड भैरवाचा दोन पत्नी आहेत एक म्हाळसा जी लिंगायत समाजामधील नेवाशी गावातील सावकाराची मुलगी होती आणि दुसरी बाणाई . बाणाई धनगराची मुलगी होती. बाणाईला प्राप्त करण्यासाठी खंडोबा देवाने गुराख्याचे, धनगराचे रूप घेतले होते आणि कालांतराने बाणाईसोबत जेजुरी निवासी खंडोबाचे लग्न झाले होते आणि म्हणूनच कालांतराने म्हाळसा व बाणाई खंडोबा यांच्या धर्मपत्नी मानले जातात आज सुद्धा कडेपठारावर भगवान श्री जेजुरी आपल्या भक्तांना दर्शन देतात आणि याची प्रचिती प्रत्येक भगवंताला भगवंताची पूजा करणार्‍या भक्ताला जाणवत असते आज देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लग्न होते त्या लग्न झाल्यावर कुलदैवत खंडेरायाला भेट अवश्य दिली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.