श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आज-काल जीवनामध्ये प्रत्येकाला जीवन जगत असताना काहीतरी अपेक्षा असते. मग ही अपेक्षा कशाचीही असू शकते. अनेक लोक हे अपेक्षित करतात की लोकांनी त्यांना मानसन्मान द्यावा. लोक त्यांच्याकडे आदर पूर्वक बघावे. परंतु असे होत नाही. काही लोक हे अनेक लोकांची तसेच जवळच्या लोकांची मन दुखावत असतात. अशावेळी आपण काय करायला हवे.
तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे. अनेक लोक हे आजार ग्रस्त असतात अशावेळी त्यांना लोकांकडून तिरस्कार प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या वेळामध्ये आपण इतरांशी चांगले बोलायला हवे. इतरांशी चांगले बोलल्याने देखील समाजामध्ये एक चांगला दृष्टिकोन निर्माण होत असतो. लोकांशी गोड बोलणे तसेच त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणे यामुळे देखील तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळू शकते.
अनेक लोक वायफळे चर्चा करण्याला पसंती देत असतात. वायफाय चर्चा करणाऱ्या लोकांकडे कोणताही मनुष्य लक्ष देत नसतो. अगदी कमी बोलायला हवे जेणेकरून समोरचे तुमच्या प्रत्येक शब्दाची वाट बघतील. अनेक लोक चर्चा करत असताना नको त्या विषयावर हात घालून त्याबद्दल चर्चा करत असतात. अशा प्रकारची वायफळ चर्चा तुम्हाला तसेच तुमच्या व्हॅल्यूला कमी करू शकते.
मित्रांनो नेहमी ऍक्टिव्ह राहणे हे देखील खूप गरजेचे आहे. जे लोक ऍक्टिव्ह नसतात त्यांच्या बाबत लोकांमध्ये नकारात्मकता निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऍक्टिव्ह असणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर अनेक लोक आपला पेहराव चांगला करत नाही. कुठलाही दिवस असो मग तो कार्यक्रमाचा असो किंवा साधा प्रत्येक दिवशी चांगले कपडे परिधान करणे खूप गरजेचे असते.
कारण कपड्यावरूनच तुम्हाला किती मान द्यायचा हे ठरवले जाते. तुम्ही तुमचा पेहराव चांगला ठेवला तुमचे शरीर स्वच्छ ठेवले तसेच तुमची वाणी चांगली ठेवली तर लोक तुमच्याकडे नक्कीच लक्ष देतील व तुम्हाला माणसान मान देतील. अनेक लोक आयुष्यामध्ये काहीही करत नाही म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एक स्पेसिफिक असा गोल नसतो. तुम्ही तुमचा गोल निश्चित करा. तुम्हाला नेमकी काय करायचे आहे हे तुमचे ध्येय ठरवा.
ध्येय नसलेला माणूस हा या समाजामध्ये व्हॅल्यू लेस आहे. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला समाजामध्ये नक्कीच मानसन्मान मिळेल. तर मित्रांनो अशा प्रकारच्या या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारच्या या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगला अनुभव तुम्हाला दिसून येईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.