नमस्कार मंडळी, घरामध्ये चुकून जरी कथी पाल दिसली तर अगदी माझ्याप्रमाणे, तुमच्यापैकी सुद्धा बरीच जण ही पाल पाहून, आधी लांब पळत असतील. किळसवाणी वाटणारी ही पाल आपल्या अन्नपदार्थामध्ये जाऊन आपल्याला विषबाधा होऊ शकते म्हणून सुद्धा अनेक जन घाबरतच असतील आणि दुसर म्हणजे यामुळे आपण आजारी पडू नये यांची भीती सगळ्यांनाच असते. यामुळे चुकून जरी घरात एखादी पाल असली तर ही पाल घरातून कायमची दूर पळवून लावण्यासाठी चा अगदी सोपा असा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.
अगदी कित्तेक वर्षानुवर्ष हा उपाय आपल्या घरामधे केलेला तुम्ही पाहिलाही असेल, परंतु आजकाल मिळणाऱ्या केमिकल युक्त स्प्रे, औषधांच्या वापरामुळे हा उपाय आपण करणं विसरूनच गेलोय. तर असाच अगदी जुना असा उपाय या पालीनवरती आज आपण पाहणार आहोत. जो बनवणही अगदी सोप आहे, अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि तितकाच खात्रशीर असा हा पालीनवरती उपाय आहे. चला तर हा उपाय बनवायचा कसा? हे आपण पाहूया.
तर हा उपाय बनवण्यासाठी वापरात न येणार् एखादं भांड आपल्याला लागणार आहे. याऐवजी तुम्ही एखाद पेपर प्लेट असेल किंवा एखाद प्लास्टिकच झाकण असेल किंवा असे रियजेबुल प्लास्टिक डब्बे असतात त्याचा सुद्धा वापर इथे करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तंबाखू, कुठल्याही पान् शॉपमध्ये अगदी सहज 10 ते 15 रुपया मध्ये तंबाखूच हे पॅकेट आपल्याला मिळत.
हीच तंबाखू पूर्ण एक पॅकेट आपल्याली घ्यायची आहे. तर पहा एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये हे पूर्ण तंबाखूच पॅकेट इथे ओतून घ्यायच आहे. आता तंबाखू या नावावरूनच तुम्हाला कळल असेल की हा उपाय किती स्ट्राँग होणार आहे आणि तो पालीला नक्कीच घरातून दूर पळवून लावणार आहे.
यासोबतच आपल्याला लागणार आहे कॉफी पावडर, ज्या कुठल्या ब्रँडची कॉफी पावडर तुम्ही वापरत असाल, अगदी छोटेस पॅकेट सुद्धा आजकाल मार्केटमध्ये मिळतात, ते पॅकेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर दोन मोठे चमचे कॉफी पावडर यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. पहा तंबाखू, कॉफी याला स्वतःचा असा खूप स्ट्रॉग असा वास असतो, एक स्ट्रॉग असा फ्लेवर असतो.
आता तंबाखू बऱ्याचशा कीटकनाशकांना दूर करण्यासाठी अगदी पूर्वापारपासून वापरात येत आहे आणि त्यामुळेच या आजच्या उपायामध्ये सुद्धा आपण तंबाखूचा वापर केलाय. सगळ्यात आधी आता हे दोन्ही पदार्थ छान आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. आता याच्या छोट्या छोट्या अश्या गोळ्या आपण तयार करणार आहोत.
हे छान बाईंड व्हावं यासाठी थोडसं पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करायच आहे. खूप पाणी यामध्ये टाकू नका, अगदी लागेल तसं फक्त अर्धा ते एकच चमचा सफिशियंट आहे. इतपतच पाणी आपल्याला लागेल. थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करून याचे छोटेसे गोळे आपल्याला तयार करायचे आहे. पहा तंबाखू सोबतच आपण यामध्ये कॉफी पावडर सुद्धा मिक्स केलेली आहे, जी पाणी टाकतात छान चिकट होते आणि त्यामुळे तंबाखू आणि कॉफी पावडरचे असे गोळे त्यार होतात. आता सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण जरा कोरड वाटेल परंतु जशी जशी कॉफी पावडर भिजेल तशी या तंबाखूला सुद्धा ते छान बाईंड करते. आता या तयार गोळ्यांचा वापर कसा करायचा आहे?
तर पहा आपल्या किचनमध्ये आपल्या घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये जिथे सगळ्यात जास्त आपण सामान स्टोर करून ठेवतो किंवा आपला माळा असतो अशा ठिकाणी सगळ्यात जास्त पाली या येत राहतात, तर अशा वेळेस त्या ठिकाणी एक एक गोळा आपल्याला याचा ठेवायचा आहे. किचन मध्ये जर तुम्ही चुकून एखादी पाल पाहिली असेल तर रात्री झोपायच्या आधी आपल्याला हा गोळा किचनमध्ये ठेवायचा आहे किंवा सगळ्यात जास्त तुम्हाला वाटते की या ठिकाणी पाली येऊ शकतात तर तिथे हा गोळा आपल्याला ठेवायचा आहे.
आता ज्यांना तंबाखू सहज अवेलेबल होत नाहीय किंवा मिळणं मुश्किल झालय, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर अचानक एखादी पाल दिसली तर त्यावरती एखादा स्प्रे करून त्वरीत ही पाल सहज घरातून दूर पळविण्यासाठी सुद्धा हा पुढचा उपाय तितकाच फायदेशीर होणार आहे. पहा त्यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर, अखंड ज्या काळी मिरी असतात त्या इथे आपण घेतलेल्या आहेत.
मिक्सरमध्ये आपल्याला त्या फिरवून घ्यायच्यात, त्याची फाईन अशी आपल्याला पावडर करायची आहे, मार्केटमध्ये मिरपूड ही रेडीमेड सुद्धा मिळतेच त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. परंतु मार्केटमध्ये मिळणारे हे मिरपूड हे बरेच दिवस आधीच बनवून ठेवल्यामुळे बऱ्यापैकी त्याचा फ्लेवर किंवा तो वास आहे तो कमी झालेला असतो आणि पालीनवरती याचा इफेक्ट होईलच असं नाही, त्यामुळे जर शक्य असेल तर घरीच अशी जे मिरे आहेत ते मिक्सरला वाटून त्याची फ्रेश अशी मिरपूड बनवून वापरू शकता.
तर पहा एका भांड्यामध्ये, थोडीशी ही मिरपूड आपल्याला घ्यायची आणि त्यामध्ये साधच पाणी आपल्याला मिक्स करायच आहे, हे पाणी मिरपूड मध्ये छान मिक्स करायचे आहे. यासोबतच आपल्याला यामध्ये डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड् किंवा ज्या कुठल्या ब्रँडच तुमच्याकडे हे लिक्विड असेल ते घ्या आणि एक झाकण यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे.
हे सोल्युशन बनवत असतानाच याचा वास्, याचा फ्लेवर तुम्हाला लगेच समजेल, इतका तेज असा वास याचा असतो. ज्यावेळेस हे सोलुशन तुम्ही पालीवर स्प्रे करता तेव्हा हा वास पालींना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे हा उपाय तितकाच खात्रीशीर आहे, फायदेशीर आहे.