गॅस वर टाका इनो, या इनोची कमाल पाहून विश्वास बसणार नाही.. पैशांची होईल बचत.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, आजची पहिली ट्रिक आहे ती बॉलपेन विषयी. बऱ्याच वेळा मुल अभ्यास करत असताना किंवा आपण जरी बॉलपेन ने काही लिहित असू त्यावेळेस चुकून हातावरती या बॉलपेननी काहीतरी लिहिलं जातं किंवा या बॉलपेनची शाई आपल्या हाताला लागते आणि आता ही शाही साफ करणे आपल्याला खूपच किचकट वाट्त, कारण हे साफ करायला वेळ सुद्धा खूप लागतो. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत, ज्याने ही शाई पटकन क्लीन होईल.

यासाठी इथे आपल्याला कुठलाही सफेद टूथपेस्ट घ्यायची आहे आणि ही आपल्याला या शाईवरती लावायची आहे. अगदी मिनिटभरासाठी हे लावून हलक्या हाताने ही साफ करायची आहे, तर तुम्ही पहाल अगदी सहज ही बॉलपेनची शाई साफ होईल. आता स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा एखाद्या नॅपकिनने पुसून तुम्ही पहाल, अगदी काही मिनिटातच बॉलपेनची ही शाई साफ झालेली असेल.

किचन मध्ये रोज काम करत असताना मग ते कणिक भिजवायच असो किंवा भांडे वगैरे घासायचे असो, काही काम करत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की हातातल्या अंगठ्या किंवा ब्रेसलेट वगैरे काढून किचन ओट्यावरती, किचन मध्ये कुठेतरी ठेवायच. आता या अंगठ्या जिथे आपण ठेवल्यात बऱ्याच वेळ त्या कुठेतरी हरवतात, पटकन सापड्त सुद्धा नाही, तर यासाठी एक छान ट्रिक तुम्ही करू शकता.

फ्रीज वर किचन काउंटर वरती किंवा किचन मध्ये कुठेही तुम्ही एक सेल्फ अड्रेस हुक लावून ठेवू शकता आणि आता जर तुम्हाला अंगठी, ब्रेसलेट किंवा कुठल्याही वस्तू जर हँग करून ठेवायच्या असतील तर त्याव्या हुक तुम्ही अशाप्रकारे अडकून ठेवू शकता. त्यामुळे या अंगठ्या एकाच ठिकाणी राहतील त्या पटकन सापडतील आणि आता त्या हरवण्याची भीती सुद्धा राहणार नाही.

हे वाचा:   गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत कोबी मंचुरिअन बनवा तेही फक्त १५ रुपयांमध्ये.!

आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असे इलेक्ट्रिक सॉकेट, स्विचेस, प्लग वगैरे असतात. स्पेशली ज्या घरामध्ये लहान मुल आहेत, त्या मुलांना या सॉकेट पासून जरा काळजीपूर्वक लांबच ठेवायला लागत, अशा सॉकेट ला मुलं हात लावू नये यासाठी आपण नेहमी एखादा टेप वगैरे लावून हे सॉकेट्स कव्हर करतो. परंतु हे सेलोटेप लावल्यानंतर हे सॉकेट्स दिसायला सुद्धा छान दिसत नाही.

त्यासाठी तुम्ही एक छान ट्रिक करू शकता. तर इथे या सॉकेटला कव्हर करण्यासाठी तुम्ही सेफ्टी इलेक्ट्रिकल सॉकेट कव्हर वापरू शकता, जे तुम्हाला ऑनलाईन मिळेल. या सॉकेट मध्ये हे कव्हर आपल्याला इन्सर्ट करायच आहे. यामुळे हे सॉकेट छान कवर होत, ज्याला लहान मुलांनी हात जरी लावला तरी त्याची काही भीती आपल्याला राहणार नाही.

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही बऱ्याच वेळ पाहिलं असेल आपल्या किचनमध्ये असलेले हे जे तूप आहे ते अगदीच घट्ट होतं. जे इझिली कुठल्याही पदार्थावर आपल्याला घेता येत नाही. तर हे पटकन मेल्ट व्हावं अग्दी फास्ट आपल्याला हे मेल्ट झालेलं तूप मिळावं यासाठी तुम्ही एखादा चमचा घ्या आणि हा चमचा गॅसवरती थोडासा गरम करा. गरम झालेला हा चमचा आता या तुपामध्ये तुम्ही ऍड करा आणि हे तूप हलक मिक्स करा त्यानंतर ते तुम्ही पदार्थावरती सहज घेऊ शकाल.

आता जर आपल्याला आपले गॅसचे जे बर्नर आहेत ते स्वच्छ करायचे असतील, त्याची चमक जी आहे ती पूर्णपणे निघून गेलेली असेल तर त्यासाठी आपल्याला आधी थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहोत. तर आपल्याला आता या पाण्यामध्ये एक पॅकेट इनो टाकायचं आहे. तर पुढे हे बर्नर पाण्यात पूर्णपणे बुडतील इतपत् गरम पाणी घेऊन हे सगळे बर्नर्स त्यामधे ऍड करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हे गरम पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून टाकायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून हे इनोच पूर्ण पॅकेट आपल्याला यात ऍड करायच आहे.

हे वाचा:   5 मिनिटांत सर्व उंदीर पळून जातील; चहाची कमाल.! उंदीर घालवण्यासाठी घरगुती उपाय, फक्त एकदा वापरा.!

इनो ऍड केल्यानंतर हे पाणी तूम्ही कमीत कमी असच् एक तासभर ठेवू शकता, किंवा रात्रभर ठेवले तरीही चालेल. यानंतर आता एका सेपरेट भांड्यात हे बर्नर्स आपण बाजूला काढायचे आहेत. यानंतर आपल्याला लागेल एखादा जुना टूथ ब्रश आणि त्याच सोबत भांड्याच कुठलाही लिक्विड किंवा भांड्याचा कुठलाही साबण तुम्ही इथे वापरू शकता. तर या टूथ ब्रशच्या साहाय्याने किवा गरज पड्ल्यास एखाद्या स्क्रबर च्या साहाय्याने तुम्ही हे जे बर्नर्स आहे ते घासून घेऊ शकता. इथे आपल्याला खूप मेहनत करायची गरज पडत नाही, पाण्यात भिजत घातल्यामुळे यावरचे जेही डाग आहेत ते खूप इझीली क्लीन होतात.

अगदी थोड्‌याच वेळात हे बर्नर्स अगदी क्लीन होऊ लागतात. यानंतर आता हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. तर गॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की आपल्या इतर लेखांप्रमाने प्रमाणे आजचा हा लेख सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल, लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.