चपाती बनवण्या अगोदर गव्हाच्या पिठात टाका ही एक वस्तू, तासाभराची काम होतील एकदम चुटकीसरशी.!

ट्रेंडिंग

नमस्कार, आजच्या लेखात आपण कधीच न ऐकलेल्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला दररोजच्या कामामध्ये मदत होईल आणि भरपूर पैशांची बचत होईल. इथे आपली पहिली टिप कोणती आहे ते पाहूयात. तर आपल्याकडे अशा प्रकारच्या चांदीच्या ज्वेलरी नक्कीच असतात. हे जे चांदीचे दागिने असतात ते ठेवून ठेवूनच किंवा वापरामुळे काळे पडतात आणि याची पूर्ण चमक निघून जाते पण याला अगदी सहज आपण चमकवू शकतो. तेही न घासता न हात लावता.

तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत गोळ्याचे पाकीट. आता ही गोळ्याची जी पाकीट आहेत ते आपल्याला जास्त जाड असणारे युज करायचे नाही. थोडेफार लवचिक आणि सिल्वर कलरचे जे पाकीट असतात तेच युज करायचे आहेत. आता इथे आपल्याला एक मोठं भांड घ्यायच. त्यामध्ये आपल्याला एक ‌ग्लास पाणी घ्यायच आहे. दागिने किती आहेत त्यानुसार तुम्ही हे भांड आणि पाणी त्यामध्ये टाका. त्यानंतर आता ह्या पाकिटचे तुकडे करून यामध्ये टाका आणि त्यासोबतच दागिने देखील यामध्येच टाका आणि इथे आपल्याला टाकायचा आाहे थोडासा खायचा सोडा.

खायचा सोडा टाकून हे भांड आपण गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायच आहे. दागिन्यांमध्ये जी पण घान असते, मळ असतो किंवा जी माती असते ती पूर्णपणे बाहेर निघते. आपले हे जे दागिने आहेत ते खूप छान चमकायला लागतात. बऱ्याच वेळा पॉलिशिंग करायला गेल्यावर पैसेही जातात आणि दागिने देखील खराब होऊ शकतात, त्यामुळे घरच्या घरी याला अशाप्रकारे स्वच्छ करा. बऱ्याच वेळा आपण ब्रशने घासून याला स्वच्छ करायचा प्रयत्न करतो पण ते देखील व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत.

यानंतरची आपली टिप आहे आंब्यांसाठी. आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच आंबे खूप आवडतात. त्यामुळे आपण हे बरेचसे विकत घेतो पण हे लवकर पिकले की खराब देखील लवकर होतात. त्यामुळे यांना जर जास्त दिवस टिकवून ठेवायच असेल तर बरेच लोक याला फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रीजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत जर तुम्ही वापरली नाही तर हे आंबे चवीला देखील खूप वेगळे लागतात. त्यासोबतच हे लवकर खराब होतात.

हे वाचा:   घराच्या घरी बनवा तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी.!

जर तुम्ही ते दोन तीन दिवस फ्रिज मधे ठेवले तर व्यवस्थित राहतील पण अगदी आठ दहा दिवस 15 दिवस तुम्हाला याला फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर त्यासाठी एकतर तुम्ही इथे कापडी बॅग घ्या, कापडी पिशवी घ्यायची आहे. कापडी पिशवीमध्ये याला ठेवा किंवा एखादा कपड़ा घ्या आणि त्यामधे आंबे झाकून ठेवा. यामुळे काय होतं, आपले जे आंबे आहेत ते व्यवस्थित कव्हर होतात आणि जो फ्रिजमधील गॅस आहे तो जास्त याला डायरेक्ट असा लागत नाही. त्यामुळे आंबे चवीला देखील छान राहतात आणि भरपूर दिवस फ्रेश राहतात.

यानंतरची आपली टिप आहे काटीपीनसाठी किवा सुईसाठी. बऱ्याच वेळा शिलाई मशीनची जी सुई असते त्याच जर तुम्ही बघितलं तर समोरचं टोक खराब झालं असेल तर तो कप‌डा पूर्णपणे असा खराब होतो, त्यासोबतच साडीला आपण काटेंपीन लावतो आणि त्याचं टोक देखील असं वेडवाकड असेल तर साडी देखीले दोरा निघून खराब होऊ शकते. तर त्यामुळे याला लावण्या अगोदर जर असं तुम्हाला वाटलं की काटेपीन किंवा सुईच टोक खराब झालेला आहे तर ते एका स्टीलच्या गाळणीवरती घासून घ्या म्हणजे हे टोक व्यवस्थित होत. गाळणी वापरण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

बऱ्याच वेळा सुईचं किंवा काटेपिनच टोक खराब झालं की आपल्या कपड्याचे दोरे निघतात, कपडा खराब होतो आणि अगदी ते विसकटल्यासारखं होत, तुम्हाला याचा प्रॉब्लेम आलाच असेल पण यानंतर कधीच असा प्रॉब्लेम येणार नाही. अशापकारे तुम्ही याला व्यवस्थित करू शकता. खास करून तर शिलाई मशीनमध्ये देखील हा प्रॉब्लेम जास्त करून होतो. तर अशा प्रकारे त्याला सहज सुई न बदलता तुम्हाला दूर करता येईल.

हे वाचा:   माठात टाकायची ही एक सिक्रेट गोष्ट.! माठातले पाणी कधीच गरम होणार नाही.! आता फ्रीज पेक्षा जास्त थंड पाणी मिळवा.!

यानंतरची आपली जी टीप आहे यासाठी तुम्हाला गव्हाच पीठ लागणार आहे. तुम्ही, गव्हाच पीठ चाळून जे राहिलेल असत शिल्लक भाग जो आपण फेकून देतो ते देखील वापरू शकता. तर एक चमचा इथे मी घेतलेल आहे गव्हाच पीठ आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा शाम्पू आणि थोडसं पाणी टाकायच आहे. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये शॅम्पू वापरायचा नसेल तर तुम्ही इथे भांड्याची किंवा कपड्याची साबण देखील थोडीशी टाकू शकता. जास्त नाही अगदी थोडीशी टाका आणि त्यानंतर याला अशापकारे आपल्याला मिक्स करून घ्यायच आहे आणि इथे आपण याला जास्त पातळ किंवा घट्ट न करता मध्यम ठेवा.

आपल्याकडे जे जर्मलची भांडी असतात ते काही दिवसानंतर काळी पडतात आणि नंतर तुम्ही याला जर साबणाने घासायला गेलात तर ती स्वच्छही होत नाही पण या गव्हाच्या पिठाने आणि श्यामपूने ही भांडी खूप छान चमकायला लागतात, तेही कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये. तर इथे आपल्याला थोडसच पीठ लागणार आहे. फक्त हे थोडंसं पीठ लावून ही भांडी घासल्यानंतर याचा जो काळेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो.

फार पूर्वीपासून अशा प्रकारची भांडी स्वच्छ करण्यासाठी गव्हाच पीठ किंवा चाळून राहिलेला त्याचा भाग वापरला जातो आणि त्यामध्ये राख टाकली जायची. पण आता राख भेटत नाही त्यामुळे थोडासा शाम्पू टाका किंवा साबण टाका अशी भांडी खूप छान स्वच्छ होतात. तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा तसेच सर्वात जास्त तुम्हाला कोणती टीप आवडली ते सुद्धा नक्की सांगा.