घराच्या घरी बनवा तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. पहिल्यांदा जरी बनवत असाल किंवा नारळाची वडी बनवताना तुमची चुकत असेल, व्यवस्थित त्याचा गोळा होत नाही, अशा छान वड्या होत नाही किंवा ती मऊसूत होत नाही, हे सगळं होत नसेल तर हा लेख अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा.

खाताना अगदी जिभेवर विरघळते आणि अगदी पेढ्यासारखी चव येते. लहानांपासून अगदी आजी आजोबा सुद्धा या वड्यांना अगदी सहज खातील आणि महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चला तर मग वेळ न घालवता या लेखाला सुरुवात करूया. नारळाची वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आहे. नारळाचे दोन भाग करून घ्यायचेत आणि याला तुकड्यांमध्ये आपण चिरून घेणार आहोत. असे तुकडे करून झाल्यानंतर बटाट्याच्या चाळणीने आपण याची साल काढून घेणार आहोत.

वड्या छान पांढऱ्या शुभ्र आणि मऊसूत होण्यासाठी फक्त आपल्याला हा पांढरा भाग घ्यायचा आहे. असा हा पांढरा भाग करून घेतल्यानंतर रफली आपण याचे तुकडे करून घेणार आहोत. आता इतक्या नारळाचे इतकी काप आपण तयार केलेली आहे. आता ही साल काढून घेतलेल्या नारळाची काप थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून घेणार आहोत आणि मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत तर अगदी पारंपारिक पद्धतीत विळीवर जसं आपण ओलं खोबरं खोवून घेतो अगदी तसच हे मिक्सरमध्ये आपण करून घेतलेल आहे. अगदी पाच सहा मिनिटात तुम्हाला अख्या नारळाचा असा क्रश तयार करता येईल तर नारळाची बर्फी किंवा वडी बनवण्यासाठी असा हा बेस आपला तयार झालाय असं हे तयार झालं की अगदी 10-12 मिनिटात तुम्हाला वड्या तयार करता येतील.

वड्या बनवण्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस एका वाटीने आपल्याला मोजून घ्यायची आहेत म्हणजे वड्या बनवताना त्या बिलकुल चुकणार नाही. घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा पेलाच तुम्हाला प्रमाण घ्यायच आहे. आता दोन वाटी हलक ओल्या खोबऱ्यासाठी एक वाटी भरून आपण इथे साखर घेतलेली आहे. इतकी साखर अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखरेच प्रमाण थोडसं वाढवू शकता किंवा कमी हव असेल तर थोडस कमी करू शकता.

आता ही एक वाटी भरून घेतलेली साखर मिक्सरला घालणार आहोत आणि याची आपण पिठीसाखर करून घेणार आहोत. अशी ही पिठीसाखर करून घेतल्यामुळे आपल्या वड्या बिलकुल चुकत नाही ते का ते पुढे या लेखात आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. तर अशी ही पिठीसाखर झालेली आहे.

हे वाचा:   प्लास्टिक च्या बादल्या किंवा मग एका मिनिटात चिटकवून टाका.! कुठलीही प्लास्टिक ची वस्तू आता दोनच मिनिटात होणार नवीन.!

छान फ्लेवर येण्यासाठी मी वेलची पूड घेणार आहे, त्यासाठी इथे आपण 50g या प्रमाणात हलकीशी भाजलेली वेलची घेतलेली आहे. वेलची पूड वर्षभर टिकावी त्यासाठी अशी ही वेलची हलकी फुलकी आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मध्यम आचेवर अगदी तळापासून ढवळत वेलची खरपूस अशी भाजून घ्यायच आहे. चांगली थंड करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. 50 g वेलचीसाठी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि मिक्सरला अगदी बारीक याची आपण पावडर करून घेतलेली आहे.

अशी ही बारीक वेलची पूड चाळणीवर आपण चाळून घेणार आहोत म्हणजे खाताना किंवा पदार्थामध्ये घालताना अशी याची साल येऊ नये. आता ही सालं सुद्धा आपण फेकून देणार नाही, कारण का तर याचा सुद्धा एक मस्त उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या सालीचा भाग चहा पावडर मध्ये आपल्याला घालता येतो. म्हणजे असं हे तुमचं वेलची युक्त चहा पावडर तयार झालेल आहे. म्हणजे तुमचं हे साल सुद्धा वाया जाणार नाही आणि चहाला सुद्धा अगदी मस्त वेलचीयुक्त असा फ्लेवर येईल.

आता या नारळाच्या बर्फीसाठी गॅसवर कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि दोन्हीही वाटी आपण खोवलेलं ओलं नारळ घातलेल आहे. अगदी मंद आचेवर एक दोन मिनिट थोडसं सुकेपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत. लगेचच यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचं नाही कारण यामध्ये थोडासा ओलावा असतो. असा थोडासा परतून घेतला अगदी मंद आचेवर तर हा अगदी कोरडा होतो. दोन मिनिटानंतर एक चमचाभर आपण इथे साजूक तूप घेतलेल आहे. तुम्हाला जर नसेल घालायचं याने काही तसा फरक पडत नाही.

फक्त बर्फी खाताना मस्त साजूक तुपाचा फ्लेवर आला की अगदी छान चव लागते. साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट अगदी मंद आचेवर अगदी तळापासून ढवळत नारळामधल पाणी सुकवत असं छान परतून घेणार आहोत. साधारणत पाच मिनिट आपण हे असं छान परतून घेतलेल आहे. थोडसं कोरडं झाल्यानंतर दळलेली पिठीसाखर घालणार आहोत आणि पिठीसाखर घातल्यानंतर, मंद आचेवरच आपण हे अगदी तळापासून ढवळत असं फिरवून घेतलय आणि लगेचच नारळामध्ये ही पिठीसाखर विरघळलेली आहे.

अशी ही पिठीसाखर घातल्यामुळे तुम्हाला खोबऱ्यामध्ये साखर विरघळावी लागत नाही किंवा करपण्याची भीती राहत नाही म्हणून अशी पिठीसाखर आपल्याला यामध्ये वापरायची आहे. पिठीसाखर संपूर्ण विरघळल्यानंतर इथे आपण चार चमचे किंवा अर्धी वाटी भरून मिल्क पावडर घालणार आहोत. सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे जी आपण आताच तयार केली होती.

हे वाचा:   पैज लावून सांगतो हे असे चिकन बनवले तर लोक बोट चाटून पुसून खातील.! अशी चिकनची रेसिपी कोणी नाही सांगणार.!

अगदी सुगंधीत मस्त वड्या तयार होतात. वेलची पूड तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आणि पुन्हा एक मिनिटभर आपण हे चांगल परतून घेतलय. सात ते आठ मिनिट हे परतून घेतल्यानंतर एक गोळा उचलून बघायचा आहे आणि असा असा छानसा गोळा झाला पाहिजे म्हणजे वड्या बनवण्यासाठी किंवा पेळे सुद्धा तुम्ही याचे बनवू शकता. त्यासाठी हे तयार झालेल आहे.

दुसऱ्या बाजूला एका ताटाला थोडस तूप आपण लावून घेतलेल आहे म्हणजे वड्या ताटाला चिकटणार नाही. आता सारण गरम असतानाच लगेच आपण या ताटावर काढून घेणार आहोत आणि घरातला पेला किंवा स्पेंचुलाने हे एकसारख आपण करून घेणार आहोत. अस हे गरम गरम असतानाच करायच बर का नाही तर ह्याचा घट्ट गोळा होतो. तर साधारणत एक मिनिटभर अस हे छान आपण पसरून घेतलय मस्त याला शायनिंग सुद्धा आलेली आहे आणि मिल्क पावडरमुळे अगदी पेढ्यासारख याला टेक्सचर सुद्धा आलेल आहे. या गोळ्याची तुम्ही बर्फी बनवू शकता किंवा पेढे सुद्धा तयार करू शकता. असं छान गरम असतानाच सुरीने आपल्याला याची काप करून घ्यायच आहे.

तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी काप करायची आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे काप करू शकता आणि शक्यतो उलथनानेच करा आणि त्याला असं थोडसं ना तूप लावून घ्या म्हणजे कापायला अगदी सोपं होतं. तर इथे आपण असे चौकोनी चौकोनी स्क्वेअर करून घेतलेत. आवडीनुसार थोडासा सुका मेवा तुम्ही यावर भुरभुरू शकता. म्हणजे दिसायलाही अगदी छान दिसतं.

असं छान झाल्यानंतर फ्रिजमध्ये अर्धा तासासाठी आपण हे ठेवून द्या. संपूर्ण थंड झाल्यानंतरच याच्या वड्या आपण कापून घेणार आहोत. बिलकुल गरम असताना करायचं नाही नाहीतर वड्या बिलकुल निघणार नाही. साधारणत अर्धा पाऊन तास मी फ्रिजमध्ये ठेवलेलं होतं, आता या वड्या तुमच्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि महिनाभर टिकणारी अशी ही मस्त मऊसुत अशी ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे.

वड्या संपूर्ण थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवा आणि या वड्या फ्रिजमध्ये अगदी महिनाभर व्यवस्थित राहतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि पेढ्याच्या चवीची ही बर्फी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा.