घरच्या घरीच बनवा फक्त 20 मिनिटात हॉटेलसारखी पावभाजी; बोटं चाटतच राहाल.!

ट्रेंडिंग

मित्रांनो पावभाजी सगळ्यांनाच आवडते तर अगदी घरच्या घरी झटपट पावभाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. फूड कलर न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पावभाजी बनवली आहे. आवडली तर नक्की करून बघा. तर पाव भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिल मी भाज्या शिजवून घेणार आहे. तर भाज्यांमध्ये मी इथं एक वाटी ताजे वटाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक वाटी फ्लॉवरचे तुकडे, एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे किंवा ढोबळी मिरची, ढोबळी मिरची जास्त घालू नका नाहीतर पाव भाजीला थोडी कडवट अशी चव येते. त्याचबरोबर मी तीन मिडीयम आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत. वाटीने मोजलं तर तीन वाट्या फूल भरतील इतपत बटाटे चिरून घेतलेले आहेत.

आता आपण भाज्या शिजवून घेऊ त्यासाठी कुकरमध्ये थोडं तेल घेतलेल आहे. भाज्या शिजण्यापुरत थोडं तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर थोडं जिरं आणि थोडीशी हळद घालू. जिर चांगलं तडतडल्यानंतर आपण आता यामध्ये भाज्या घालू. हळद जास्त घालू नका नाहीतर पाव भाजीला पिवळसर असा कलर येतो. तर बटाटा, ताजे वटाणे, फ्लॉवरचे तुकडे आणि शिमला मिरची मी घातलेली आहे. आता या भाज्या चांगल्या आपण तेलामध्ये परतून घेऊ. एक ते दोन मिनिट भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. तुम्ही आवडीनुसार यामध्ये अजून भाज्या घालू शकता. अगदी झटपट भाज्या चांगल्या परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू.

भाज्या बुडतील इतपत पाणी घालायच आहे. पाणी जास्त घालू नका नाहीतर भाज्या शिजल्यानंतर पटकन मॅश होत नाहीत किंवा बारीक होत नाहीत. आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ आणि कुकरच झाकण लावून बारीक गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मस्त मऊसर अशा भाज्या शिजतात. भाज्या माऊसर अशा शिजलेल्या आहेत. पाणी सुद्धा भाज्यांमध्ये जास्त नाही त्यामुळे आता भाज्या पटकन मॅश होतील. तर इथं मी मॅशर घेतलेला आहे. मॅशरने भाज्या चांगल्या मॅश करून घेऊ.

हे वाचा:   महिलांनो स्वयंपाक घरातील या बारीक सारीक गोष्टी माहिती असू द्या.! यामुळे तुमचे कामे होतील झटपट.!

तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही ग्लास वापरू शकता. आता आपण पाव भाजी फोडणीला घालू. तर त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड मोठे चमचे तेल घेतलेल आहे. तुम्ही तेल किंवा बटर आवडीनुसार काहीही वापरू शकता. मी बटर पाव भाजीमध्ये नंतर घालते म्हणजे कांदा तेलामध्ये चांगला परतला जातो. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन असा भाजला जातो. तर मस्त सोनेरी रंगावरती मी कांदा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट परतून घेऊ.

आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे. आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू तर दोन मोठ्या टोमॅटोची प्युरी मी करून घेतलेली आहे. आता टोमॅटो प्युरी आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊ. टोमॅटो प्युरी घातल्यामुळे पटकन टोमॅटो भाजला जातो तेलामध्ये आणि पाव भाजी सुद्धा एकसारखी चांगली मिळून येते, टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत टोमॅटो प्यूरी मी तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे. आता यामध्ये दोन चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर घालू. काश्मिरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे लाल कलर घालायची गरज भासत नाही. मस्त असा पावभाजीला लालसर कलर येतो. त्याचबरोबर दोन चमचे मी एवरेस्टचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार थोडं मीठ अजून घातलेल आहे.

मीठ भाज्या शिजवताना सुद्धा मी घातलेलं त्यामुळे थोडच चवीनुसार आता घातलेल आहे. आता लाल तिखट आणि पावभाजी मसाला आपण थोडा मिक्स करून घेऊ किंवा परतून घेऊ. परतून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे लाल तिखट करपत नाही आणि पावभाजीचा हा मसाला चांगला परतला जातो. तर थोड्या वेळानंतर बघू शकता मस्त मसाल्याला कडेने तेल सुटलेल आहे. अशा पद्धतीने चांगला मसाला परतून घ्यायचा म्हणजे पावभाजी एकदम मस्त अशी चवीला लागते. आता या पावभाजीच्या मसाल्यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या किंवा मॅश केलेल्या भाज्या घालू आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ.

हे वाचा:   आपल्या मनात नेगेटिव्ह आणि वाईट विचार आल्यावर काय करायचे? फक्त करा या 3 गोष्टी.!

तुम्ही बघू शकता मस्त असा पावभाजीला लालसर कलर आलेला आहे. फूड कलर न वापरता काश्मिरी लाल मिरची पावडर घातली की मस्त असा लालसर कलर येतो त्यामुळे नक्की एकदा वापरून बघा. तर ही पावभाजी मिक्स करून घेतलेली आहे. थोडीशी अशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये थोडं अजून पाणी घालू. आता यामध्ये एक बटरचा क्यूब घालू तुम्हाला जितक बटर आवडतं तेवढ आवडीनुसार घालू शकता. मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करून यावरती सात ते आठ मिनिटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाल्यांची चव पाव भाजी मध्ये मस्त अशी उतरते. तर जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि बघू शकताय मस्त अशी पाव भाजी तयार झालेली आहे.

यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण पावभाजीच्या भाजी सोबत खायला बटर मध्ये पाव भाजून घेऊ त्यासाठी तव्यामध्ये मी थोडसं बटर घेतलेल आहे. यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने पावभाजीचे पाव मी मधून थोडेसे चिरून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी बटर मध्ये चांगले घोळवून भाजून घेतलेले आहेत. तर मस्त अशी हॉटेल पेक्षा भारी घरच्या घरी झटपट अशी पावभाजी तयार झालेली आहे. भाज्यांची जर पूर्व तयारी केली तर 20 मिनिटातच ही पावभाजी तयार होते आणि खायला तर एक नंबर लागते. मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.