गाद्यांना झालेली ढेकण घालवण्यासाठी घरगुती उपाय; ढेकूण होतील कायमची गायब.!

ट्रेंडिंग

हॅलो, नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की उषा, चादरी, गादी, गोधडी किंवा मग आपल्याकडे असणाऱ्या अशा प्रकारच्या गाद्या ज्यांना आतमध्ये कापूस भरून बनवलेला आहे. या सगळ्यांना जर ढेकण होत असतील तर त्यावर आपण आज उपाय करणार आहोत. ढेकण नसतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून तुमच्या घरातील उषा चादरी गाद्यांना ढेकण होणार नाहीत. तर हा लेख जो आहे तो संपूर्ण वाचा.

घरातील गाद्यांना, उषांना जर ढेकणं झालेली असतील तर ते कंट्रोल करणं खूप अवघड जातं. तर आपण काय करायचं आहे? तर हे ढेकण होऊ नये किंवा झालेली असतील तर यावर एक घरगुती उपाय आपण बघत आहोत. सगळ्यात आधी सगळ्या आपल्या घरातील ज्या काही गाद्या आहेत त्या आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळत घालायच्या आहेत. जेणेकरून डायरेक्टली ऊन आपल्या या गाद्यांना किंवा उषांना लागेल अशापकारे त्यांना आपल्याला कडकडीत उन्हामध्ये सकाळपासून म्हणजेच दिवसभर वाळत घालायच आहे. ही पहिली स्टेप आहे. आपल्याला या गाद्या आहेत त्या उन्हामध्ये वाळत घालायच्या आहेत.

बाकीचे जे आपले अंथरून आहेत म्हणजे चादरी वगैरे असतील तर त्या पहिले धुऊन घ्या. धुतल्यानंतर त्यांना उन्हामध्ये वाळत घाला, तसच उषा आणि लोड जे आहेत त्यांचे कव्हर काढून त्यांनाही आपण वाळून घ्यायच आहे. सलग दोन-तीन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण उन्हामध्ये यांना वाळत घालायच आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ज्या उषा कडक उन्हामध्ये वाळलेल्या आहेत, या ज्या गाद्या आपण उन्हामध्ये कडक वाळून घेतलेले आहेत, यांना आपल्याला सेकंड ट्रीटमेंट द्यायची आहे.

हे वाचा:   घराच्या चारी कोपऱ्यात ही एक गोष्ट ठेवा एकही उंदीर घरात पाय सुद्धा ठेवणार नाही.! उंदरांना पळवण्याची सगळ्यात सोपी पद्धत.!

तर जी काही ढेकण झालेली असतात ती अशापकारे या गाद्यांच्या कोपऱ्यांना चिटकून बसलेली असतात किंवा तिथे अंडी घालतात, जिथे स्टीच केलेल असतं तिथे ते अंडी घालतात, तिथे लापून बसतात. तर इथे आपल्याला बेकिंग सोडा जो असतो तो टाकायचा आहे. तर इथे बेकिंग सोडा मी घेतलेला आहे, तर आपल्याला हा बेकिंग सोडा जो आहे, आपण जो स्वयंपाकासाठी वापरतो किंवा पदार्थ बनवण्यासाठी ज्याचा आपण वापर करतो तोच हा बेकिंग सोडा आहे. जसं की मगाशी मी तुम्हाला म्हटलं हे जे ढेकण असतात ते अशापकारे जिथे आपल्या गादीचं स्टिच केलेलं असतं अशा ठिकाणी जास्त होतात, शिवाय जिथे कोपरे आहेत गादीचे, त्या ठिकाणी पण ते अंडी देतात किंवा लपून बसतात.

तर आपल्याला सरळ त्या ठिकाणी अशापकारे थोडा थोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि तो तिथे चोळून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे गादीची जी मागची साईड आहे तिथे पण आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि थोडासा हाताने चोळून घ्यायचा आहे. आता गादीचे जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांना आपल्याला बेकिंग सोडा अशा प्रकारे टाकून थोडा चोळून घ्यायचा आहे.

हे वाचा:   फक्त ५ मिनिटांत जुन्या प्लास्टिक पिशवी पासून बनवा झेंडूची अशी फुलं, एकही रुपया खर्च न करता.!

इथे पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काही ढेकण असतात ती अंडी देतात किंवा तिथे लपून बसतात, तर गादीला, चादरींना किंवा बेडशीट तसच आपली जी पिलो कव्हर किंवा पिलोज असतात त्यांना आपल्याला सेम प्रकारे बेकिंग सोडा टाकून चोळून घ्यायच आहे.

आपण ज्यावेळेस गाध्या उन्हामध्ये वाळत घालतो, कडकडीत ऊन त्याला लागून गाद्या ज्या आहेत किंवा उषा ज्या आहेत त्या छान कडक होतात. त्यानंतर ह्या गाद्या ज्या आहेत त्या एखाद्या मोठ्या लाकडाने ठोकून घ्यायच्या आहेत. त्याने त्यातली असणारी धूळ जी आहे ती पूर्ण निघून जाते. अशाप्रकारे बेकिंग सोडा लावून गादी फोल्ड करून तुम्ही ठेवून द्या आणि ज्यावेळेस वापरायची असेल त्यावेळेस फक्त हा बेकिंग सोडा काढून टाका. याला बाकी काही करायची गरज नाही आणि ही प्रोसेस तुम्ही महिन्यातून एकदा रिपीट करू शकता.

अशाप्रकारे गाद्या, उषा, लोड यांची आपण काळजी घेतली तर ढेकण होणार नाहीत आणि जर झालेली असतील तर ती मरून जातील. अगदी सोपा उपाय आहे महिन्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही. आपल्या गाद्या, उषा ह्या ढेकनांपासून सुरक्षित राहतील. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल. लेख आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा.