खतरनाक टेस्टी.. गावरान पद्धतीने.. झणझणीत अंडा करी.. एकदा करून बघा.!

ट्रेंडिंग

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखात झटपट अशी तयार होणारी अंडा करी दाखवणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल आपण वाटण तयार करून घेऊ. वाटण करण्यासाठी मिडीयम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तीन चमचे किसलेल सुक खोबरं सोनेरी रंगावरती थोडं परतून घेतलेल आहे. अर्धा इंच आल्याचे तुकडे, पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडसं पाणी घालून बारीक अस वाटण तयार करून घेऊ. तर वाटण तयार झालेल आहे.

आता आपण अंडाकरी करायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेल आहे. तेल गरम झाल्यानंतर तयार केलेल वाटण घालू आणि चार ते पाच मिनिट वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ. यामध्ये कच्चा कांदा घातलेला आहे, त्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्च्या कांद्याची चव अंडाकरीला लागत नाही. तेलामध्ये चांगलं वाटण परतून घेतलेल आहे. आता यामधे थोडीशी हळद घालू, दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेल आहे.

हे वाचा:   पावसाळ्यात कांदे लवकर खराब होऊ नये म्हणुन ५ टिप्स, घरातील कांदा अजिबात सडणार नाही, फक्त करा हे काम.!

आता हे मसाले आणि लाल तिखट आपण वाटणासोबत थोडं परतून घेऊ. मसाले थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे मसाले सुद्धा करपत नाहीत आणि वाटण सुद्धा चांगल परतलं जातं. तर मस्त तेल सुटेपर्यंत मी चांगलं परतून घेतलेल आहे. जितका आपण वाटण चांगलं परतून घेऊ किंवा मसाला परतून घेऊ तेवढीच मस्त अशी चवीला अंडाकरी लागते. आता यामध्ये गरम पाणी घालू आणि तुम्ही जेवढी तुम्हाला ही अंडाकरी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याच प्रमाण कमी जास्त करू शकता.

आता अंडाकरीला थोड़ी थोडी अशी उकळी आलेली आहे. यामध्ये उकडलेली अंडी घालू. तर चार उकडलेली अंडी ती अशापकारे अर्धी अर्धी कट करून घातलेले आहेत अंडाकरीमध्ये. तुम्ही हवं तर उकडलेले अंडी कट न करता सुद्धा घालू शकता. आता अंडी घातल्यानंतर ते आपण थोडं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक चार ते पाच मिनिटासाठी. ही अंडाकरी मसाल्यामध्ये आपण चांगली शिजवून घेऊ म्हणजे अंड्याची चव अंडाकरीमध्ये चांगली अशी उतरते.

हे वाचा:   कुरकुरीत अळूवडी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.. रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स.!

तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त अशी झणजणीत आणि तरीदार अशी अंडाकरी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम् गरम भाकरी, चपाती भातासोबत खायला एक नंबर अशी लागते. हॉटेल पेक्षा अशी भारी, गावराण पद्धतीची ही झणझणीत अंडाकरी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एकदा घरी करून बघा. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून ते नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.