अंड्यामध्ये भरपुर प्रमाणामध्ये प्रोटीन असल्यामुळे अंड्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश सर्वच लोक करतात. नियमित अंडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खाण्याव्यतिरिक्त अंड्याचे अनेक बाकीचे फायदे देखील आहेत. अंडे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रोटीनची कमतरता भरून निघते व शरीरातील हाडांची झीज थांबते. हाडे मजबूत होतात व शरीर बांधणी करता अंड्याचे प्रोटीन उपयोग येते
आरोग्याची चांगले राखण्यासाठी व फिटनेस जपण्यासाठी लोक नियमित अंड्याचे सेवन करतात. रोज सकाळी नाश्त्याला उकडलेली अंडी खाल्ल्यामुळे शरीराची दिवसभराची प्रोटीनची कमतरता भरुन निघते. अंड्याचा वापर बऱ्याच प्रकारच्या स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये केला जातो.
केसांकरता बनवलेल्या अनेक प्रोडक्ट्समध्ये देखील अंड्याचा वापर केला जातो. याशिवाय केसांच्या व त्वचेच्या काळजी व निगा राखण्याकरता अंड्यापासुन अनेक घरगुती उपाय करता येतात. केस चमकदार व मुलायम राहण्याकरतादेखील अंड्याचा हेअरपॅक म्हणुन वापर केला जातो.
आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला अंड्याचा वापर करून चेहर्याकरता फेस पॅक बनवण्याची कृती व पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया ३ प्रकारचे अंड्याचे फेस पॅक बनवण्याची पद्धत –
अंडे आणि ओटमीलचा फेसपॅक – तेलकट त्वचेवर प्रदुषण व वातावरणातील उष्णतेचा खुप लवकर परिणाम होतो. तेलकट त्वचेवर रोमछिद्रांमध्ये माती धुळ जमा होऊन बॅक्टेरिअल इन्फेक्शन होते ज्यामुळे मुरुम, पुळ्या, ब्लॅकहेड्स अशा समस्या लगेच होतात. या करता हा उपाय व फेसपॅक खुप असरदार आहे.
कृती – एक चमचा ओटमिल घेऊन त्यामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग टाकावा. या दोन्हींना चांगले मिक्स करुन या दोन्हींचे मिश्रण करून चांगले फेटून घ्यावे. फेटून घेतलेले हे मिस्टर चेहऱ्यावर फेसपॅकसारखे लावावे. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा पूर्णपणे सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. या पॅकमुळे अॉईली स्किन असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील ऑईलचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे तेलकट त्वचेमुळे होणार्या समस्या कमी होतात.
अंड्याचा पिवळा बलक लिंबाचा रस आणि जैतून तेल – ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्याकरता हा फेसपॅक अतिशय उपयुक्त आहे. अंड्याचा पिवळा बलक काढावा त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा ऑलीव्ह ऑईल टाकावे. हे तिन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे एकत्र मिसळून घ्यावे व चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. यामुळे चेहरा मऊ नरम व चमकदार दिसु लागतो. अंडे व लिंबाच्या गुणांमुळेच चेहर्याचे रोमछिद्र बारीक होतात व लॉक होतात. कोरड्या त्वचेकरता हा फेसपॅक अतिशय उपयुक्त आहे.
अंडी, मध आणि दह्याचा फेसपॅक- आपल्याला चमकदार निरोगी व मुलायम त्वचा हवी असेल तर हा पॅक वापरणे आपल्याकरता बेस्ट ऑप्शन असेल. अंड्यातील पिवळा भाग काढावा. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा दही व एक चमचा मध टाकावे. मिश्रण चांगले एकजीव करून चेहऱ्यावर व मानेवर लावावे.
चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुऊन टाकावा. हा फेसपॅक वापरल्यामुळे चेहरा तरुण, तजेलदार आणि तेजस्वी होतो. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त फेसपॅकपेक्षा हा फेसपॅक तुम्ही घरच्या घरी बनवला व नियमितपणे वापरला तर आपल्या चेहर्यासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.